सारिका - ( भाग - 1 )

Sarika


लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे. 

 ( राहणार - देवरुख - रत्नागिरी )

( कथेचे नाव - सारिका  )


        सारिका एका मिडल क्लास कुटुंबातील मुलगी, घरी वडील नोकरी करणारे, आई - सध्या गृहिणी होती, आणि सारिका ला दोन भाऊ, त्यातला एक शेवट  चा भाऊ मतिमंद होता आणि आजी - आजोबा असं सगळे मिळून सात जणांचे हे परब कुटुंब. गिरगांव मधल्या चाळीत राहात असे.

           सारिका ची आई शिक्षिका होती. पण तिसरं अपत्य मतिमंद झाल्यावर त्याचं सगळंच करावं लागत असल्यामुळे तिने तिची नोकरी सोडली, पण मग ती संध्याकाळच्या वेळेत दोन तास घरी पहिली ते दहावी च्या मुलांचे क्लासेस घेऊ लागली. हुशार असल्यामुळे तिच्याकडे बरेच विद्यार्थी क्लास ला येत असत.

           श्रीमंत, गरीब, अशी सगळ्या श्रेणी ची मुलं क्लास ला येत असत, त्यांचा क्लास तसा फेमस होता. सारिका मोठी होत होती, तीला का कोण जाणे पण आपल्या मतिमंद भावाची लाज वाटायची, तीला तो आवडत नसे, त्याला त्याच्या शरीरावर कंट्रोल नसल्याने तो जेवताना सर्व सांडत असे, त्याची कधीतरी तोंडातून लाळ गळत असे. तीला हे सर्व कसं तरीच वाटत असे.

       सारिका बघता बघता पंधरावी झाली, आणि पुढच्या सहा महिन्यात नोकरीला लागली.  चांगली नोकरी मिळाली. पगार पण बऱ्यापैकी होती. एक वर्षात तिच्यात खूप बदल झाला. ती आता एकदम छान  राहू लागली, इस्त्री केलेले वेगवेगळे ड्रेस घालू लागली.  आई ला थोडा संशय येऊ लागला होता कि आजकाल ही अशी छान तयार होऊन का ऑफिस ला जाते, तिने सारिका ला एक - दोनदा विचारलं ही तर ती म्हणाली, आई मोठ्या कंपनी मध्ये कामं करायचं म्हणजे व्यवस्थित राहावं लागत.

      आई ला पण वाटले कि, ही बोलतेय तसं असेलही कदाचित, आई ने तीला विचारणे सोडून दिले. अशीच मध्ये तीन वर्ष गेली आणि एक दिवस संध्याकाळी सारिका ने घरी कॉल करून कळवलं कि आई मी लग्न केले आहे, आई रडून बोलू लागली कि अग पण कोणाबरोबर, तर सारिका जे, बोलली ते ऐकून आई अवाक चं झाली. सारिका ने जास्त न बोलता एवढं चं बोलून फोन ठेवला आई रडू लागली.

         घरी क्लास ला बरेच वर्षांपूर्वी एक मुलगा येत होता योगेश सावंत नाव त्याचं....त्याच्याबरोबर सारिका ने लग्न केलं होत. तो मुलगा श्रीमंत होता, आई - वडील दोघे ही कामावर जायचे, त्यातून घरची परिस्थिती पण छान  त्यामुळे मुलगा अतिशय लाडवलेला  होता, बाकीच्या क्लास मधल्या मुलांशी तो हटकून चं वागत असे, अभ्यासात ही ढ होता तसा.

          पण दहावी ला नशिबाने बेचाळीस टक्के मिळवून पास झाला होता. पण त्याला त्या कमी टक्क्याचं पण काहीच वाटल नाही, पेढे द्यायला घरी आला होता तेव्हाच आई च्या मनात आले होते अरे एवढे कमी टक्के असून पण हा आनंदी आहे. कदाचित  त्याला स्वतः ला पण वाटलं नसावं कि तो पास होईल असं. पेढे द्यायला आला होता तेव्हा सारिका च्या आई ने विचारलं होत कि आई - बाबा ओरडले का रे, टक्के कमी बघून तर तो म्हणाला नाही मॅडम, काहीच बोलले नाहीत.

       आई च्या डोळ्यासमोरून पटकन ह्या सगळ्या गोष्टी सरकून गेल्या, सारिका चा फोन येऊन गेल्यावर, आई ने तिच्या बाबांना फोन करून घरी बोलवून घेतले, आणि हे सगळं सांगितले, सगळेच काळजीत पडले, कि हा मुलगा पुढे किती शिकला कि नाही काय माहिती, अभ्यासात ढ  असल्यामुळे शिक्षण किती झाले आता काय करतो, अशी सर्वांना घरात काळजी वाटू लागली.

        सर्व पुन्हा सारिका चा फोन लावायचा प्रयत्न करू लागले, पण फोन लागेचना, तिने बहुतेक भीतीने फोन ऑफ करून ठेवला होता. आई घाबरून रडू लागली, तिचे बाबा आई ला समजावू लागले अग ती आता पंचवीस वर्षाची आहे तिने विचार करून निर्णय घेतला असेल, कदाचित काळजीच कारण नसेलही. तो मुलगा तसा श्रीमंत होता, आता पुढे काय शिकला ते आपल्याला माहित नाही आहे, किंवा आता काय करतो ते पण कळत नाही आहे.

       पाच दिवसांनी सारिका ने फोन चालू केला, बाबांनी फोन केल्यावर तिने सांगितले कि सगळं व्यवस्थित आहे, मी आनंदात आहे, बाबा बोलले अग एकदा बोलून तरी बघायचस ना, हे सर्व आम्ही लग्न लावून दिले असते, सारिका बोलली त्याच्या घरचे तयार नव्हते म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न करायचा निर्णय घेतला.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत -  सारिका ने सांगितलेली परिस्थिती खरंच सत्य होती का...)

( कथा आवडल्यास जरूर लाईक आणि कमेंट करा.

( लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ) ( देवरुख - रत्नागिरी )

      

      

   

🎭 Series Post

View all