Mar 04, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

आपल्या सगळ्यांचा गुरु

Read Later
आपल्या सगळ्यांचा गुरु

  "ए आजी काय भारी आहेस तू,तुझ्याजवळ पण स्मार्टफोन आणि हे काय तू सर्च करतीये त्यावर? " सुट्टीला घरी आलेल्या नातीने आजीला प्रश्न विचारला...

   "अगं तो वेद आहे ना सुमा मावशीचा त्याने मागच्या वेळी सुट्टीत घरी आल्यावर, मला स्मार्टफोन कसा वापरायचा आणि काहीही अडचण आली किंवा काही प्रश्न पडले तर त्याची सगळी उत्तरे गुगल सर्च केल्यावर कशी मिळतात हे शिकवलं आणि गुगलला मी माझे गुरु मानून घेतले"...

     "खरंच गुगल आहेच आजकालच्या पिठीतला आपलासा वाटणारा गुरु.आम्ही म्हणतो ना की आजकाल सगळं कसं वन क्लिक वर आहे ते गुगलमुळेच".श्रेया कौतुकाने आजीला सांगत होती.

   "जुनी नवीन वेगवेगळ्या भाषेतील गाणी असो,भजन असो,मुव्ही असो,कोणतं ठिकाण  की कोणती रेसिपी सगळं सगळं कसं त्यावर लगेच सापडतं. माणसाला काही प्रश्न पडावे  आणि आपण त्यावर टाईप करायची देरी असते की लगेच उत्तरं तयार असतात ह्या गुगल गुरुकडे...जादूची कांडी फिरवावी तसेच वाटतं ग मला हे "असं आजी श्रेयाला आश्चर्याने म्हणत होती.

     "जग खूप जवळ आलय असं उगाच का म्हणतात त्यात ह्या गुगल गुरूचा सिंहाचा वाटा आहे बरं का?" श्रेया म्हटली.

    "माझं भजनी मंडळ आहे...भगवंताच्या नामस्मरणात माझे मन रमते म्हणून मी रोज हरिपाठाला जाते.तिथे मनाला शांती मिळते.दिवसभरात वेळ मिळाला की मी गुगलवर सर्च करून वेगवेगळी भजने लिहून काढते.मंदिरात हरिपाठाच्या वेळी ती मी चालित म्हणते तेव्हा माझ्या मैत्रिणी माझं कौतुक करत चाट पडतात".
आजीचं ऐकून श्रेयाला भारी वाटत होतं.

   "अगं आजी,मलाही माझे शाळेतील वेगवेगळ्या विषयांचे प्रोजेक्ट्स बनवायचे असले की मला गुगलकडून खूप गोष्टी शिकायला मिळतात...जसं की नवनवीन कल्पना,त्याबद्दलची माहिती,त्याचा इतिहास आणि अजून काय काय करता येईल असं बरंच काही".श्रेयानेही मनोमन गुगलला आपला गुरु मानलं होतं.
    "आईला तिच्या वेगवेगळ्या रेसिपीज शोधायला,मॅचिंग ज्वेलरी,कपडे,ब्युटी टिप्स गुगल गुरूंकडून मिळतात तसं बाबांना त्यांच्या रोजच्या बातम्या,टेक्निकल गोष्टी शिकायलाहि गुगल सर्च इंजिनचा खूप उपयोग होतो" श्रेया आजीला सांगत होती.

   खरचं ग लहान असो की मोठा प्रत्येकाला हा गुगल गुरु आपलासा वाटतो.कारण तो प्रत्येकाला पडणाऱ्या प्रश्नांची समजेल अश्या भाषेत उत्तरे देतो.जो आपल्याला पावलोपावली बऱ्याच गोष्टी शिकायला मदत करतो आणि आपल्या ज्ञानात भर घालतो असा हा गुगल गुरु नाही का?
श्रेया आजीला मनातलं सांगत होती.
    आजीनेही ह्यावर नातीच्या हातावर टाळी देत,हसत सहमती दर्शविली.बदललेल्या पिढीनुसार तंत्रज्ञान सगळ्यांनी आत्मसाद करून जुन्या नव्या पिढीतील अंतर कमी करत ज्ञान संपादन केलं पाहिजे हे दोघींनाही मनापासून पटले होते.

     वाचकहो,आपल्याला जन्माला आल्यापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यँत वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे गुरु भेटत असतात.गुरूंकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात.आपले आई वडील,मित्रमंडळी,आजूबाजूचे लोक आणि हो अगदी लहान मुले सुद्धा आपल्याला बरंच काही शिकवून जातात.ह्यासगळ्यात आपल्या सगळ्यांच्या जवळचा आणि नेहमीच आपल्याला ज्ञानदान करणारा नि मदत करणारा असा गुरु म्हणजे गुगल गुरु.गुगल गुरूने लहान मोठे सगळ्यांनाचं एका नॉलेज शेअरिंगच्या धाग्यात गुंफले आहे बरोबर ना...
   
©®सुप्रिया शिंदे महादेवकर

धन्यवाद
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Supriya Vikram Mahadevkar

Professor

मी कविता,चारोळ्या,अभंग,कथा लिहिते.मला नवनवीन गोष्टी सतत शिकायला आवडतात.मी इंजिनियरिंग कॉलेजला प्रोफेसर आहे.कॉम्प्युटर इंजिनियरिंग मध्ये सध्या phd करत आहे.

//