आपल्या मानलेल्या भावाच्या वाढदिवसा निमीत्त

भावासाठी बहिणी च एक पत्र
प्रिय अनय...
सर्व प्रथम तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुला आठवतय आपण एकाच वर्गात असताना एकदा बाईंनी आपल्याला कार्यानुभव मध्ये राखी तयार करायला शिकवलं होत आणि तीच राखी आम्ही मुलींनी तुम्हाला बांधायची होती.
पण त्यावेळी तुला मात्र कुणीच राखी बांधली नव्हती.
तुला कुणीही राखी बांधली नाही म्हणून किती रडवेला झाला होतास तु? शेवटी मी तुझ्या जवळ येऊन तुझे डोळे पुसले आणि तुला राखी बांधली. सगळ्यांनी आपलं किती कौतुक केलं होतं.
होता होता आपण दोघ ही आज मोठे झालो कमावू लागलो. आज पर्यंत तु लहानपणी बांधलं गेलेल हे नात निभावत आला आहेस तू कधी ही मला कुठल्याही गोष्टींची कमी कधीच जाणवू दिली नाहीस कदाचीत हीच आपल्या या नात्याची पोच पावती आहे.
हो न! आणि आज माझ्या याच भावाचा वाढदिवस आहे.
वाढदिवस म्हणलं की, कस घरात रेलचेल असते लोकांचे आपल्या प्रियजनांचे फोन येत असतात घरात गोड धोड बनत असत.
पण तू मात्र या पासून नेहमीच लांब राहिलास तुला एखाद्याचा फोन आला तर. "यात काय विशेष" एवढच बोलून टाळत आलास.
पण आईनी खास तुझ्यासाठी बनवलेल्या लाडू ला तु कधीच विसरला नाहीस मला आठवत तुझ्या वाढदिवसा निमीत्त आईनी तुझ्यासाठी लाडू बनवले तर कसा पळत घरी यायचा तु.
आज तुझा वाढदिवस पण यावेळेस मायेने लाडूचा घास भरवायला मात्र आई नाही.
पण तू काळजी करू नकोस ह अगदीच आईसारखे नाही पण तुला आवडतील अगदी तसेच ही तुझी बहीण तुझ्यासाठी लाडू नक्कीच बनवेल.
मला माहीत आहे सांगत जरी नसलास तरी मी समजू शकते तुला परदेशात आमची सगळ्यांची किती आठवण येत असेल पण तू काळजी करू नकोस कामावर लक्ष दे आपल स्वप्न पूर्ण कर. आता तरी थोडस स्वतःसाठी जग स्वतःची काळजी घे कधी ही स्वतःला एकट समजू नकोस कायम लक्षात ठेव तु किती ही लांब असलास तरी तुझी ही बहीण कायम तुझ्या बरोबर आहे.
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझीच बहीण
अवंती

नोट: पात्र काल्पनिक आहेत.

🎭 Series Post

View all