आपली माणसं?(भाग ३)

नातं हे दोघांनी सांभाळलं तर ते फुलतं आणि टिकतं.


भाग ३

******************************
निखिल आत गेला, पाच दहा मिनिट वेळ घेतला, विचार केला आणि बाहेर आला.
" आई येतो गं मी."


एवढं बोलून निघून गेला.

इकडे निरजाची जाऊ नीता सासूबाईंना  म्हणाली,

" बघा ना! कसा हातचा करून ठेवला आहे. इथे तुम्ही जीव तोडून सांगत आहात की जाऊ नको मात्र त्यांना फक्त निरजाची पडली आहे. एवढं आहारी जाऊ नये एखाद्याच्या."


सासूबाईंनी नीताकडे बघितलं आणि आत निघून गेली.

इकडे मात्र निखिल जायच्या आत तिला कळा सुरू झाल्या आणि डिलिवरी सुद्धा झाली. तिला एक गोंडस मुलगा झाला. दोघांची तब्बेत एकदम ओके होती.

नीरजाच्या घरच्यांनी निखिलला बऱ्याच वेळा फोन केले पण त्याचा फोन लागत नव्हता. म्हणून त्यांनी त्याच्या घरी फोन लावला.


" निखिल यांचा फोन लागत नाही.आहेत का घरी?"

" तो कशाला असेल घरी तुम्हीच नाही का बोलावणं पाठवलं, असेल अर्ध्या रस्त्यात."


"अहो त्यांचा फोन लागत नाही. बहुतेक बॅटरी डाऊन  झाली असेल असं वाटत आहे."


" एवढी काय घाई झाली तुम्हाला, येईल उद्या सकाळी तो."

" हो..हो... बरं अभिनंदन तुमचे तुम्ही आजी आणि मी मामा झालो."

" हो का!!!...बरे आहेत ना दोघे. मुलगा झाला की मुलगी."

" अहो मस्त मुलगा झाला,आता पेढे वाटा पेढ़े."


" त्यात काय एवढं....काही तरी होणारचं होत ना!!!!"


हे ऐकून भावाला वेगळचं वाटलं त्याने फोन ठेवला.


इकडे नीरजा शुध्दीवर नव्हती. बाळ आईकडे दिलं. अख्खी रात्र बाळ रडत होतं आणि निरजाची आई त्याला सांभाळत होती.


दुसऱ्या दिवशी सकाळीच निखिल पोहचला. सर्वात आधी बायकोजवळ गेला आणि म्हणाला,


" बरी आहेस ना! खूप त्रास होत आहे का?"


तिने मान हलवली. त्याने तिचा हात हातात घेतला काहीही काळजी करू नको सगळं काही ठीक होईल विचार करू नकोस कुठल्याही गोष्टीचा."


तिच्या चेहर्यावर एक हलकीशी स्माईल आली.

निखिल मग बाळाकडे वळला. इवलेसे हात, पाय , इवलंसं नाक, ओठ बघून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.


" जावाईबापू घेता येत असेल तर देऊ का बाळाला?"


" अहो...हे काय विचारणं झालं?.नाही घेता आलं तरीही सवय करेल मी."

आई हसली आणि बाळाला निखिल जवळ दिलं.


" नीरजा मी येऊ का बाळा जरा घरी जाऊन, दादा आणि जावईबापू आहेत. अशी जाते आणि अशी येत बघ."


" हो.. हो.. जा निवांत मी आहे आता इथे काळजी करू नका."

साधारण चार दिवसांनी तिला सुटी होणार होती. मात्र निखिलला एवढ्या दिवसाची सुटी नाही मिळाली म्हणून तो दुसऱ्या दिवशी निघून गेला.

निखिल घरी पोहचला आणि जातांना एक मोठा डब्बा मिठाईचा घेऊन गेला.


घरी गेल्यावर...,

" आई!!!! मी बाबा झालो!!...तू आजी आणि बाबा आजोबा...वहिनी अगं तू काकू झालीस.."


"अरे बस!!! बस!!!! किती तो तांडव आणि एवढी पिशवी भरून काय आणलं?"


" अग थांब!!! पेढे आहेत ते, घे ना आणि अख्ख्या कॉलनीला वाटणार आहे मी."


"अरे उगाच कशाला खर्च केलास?"


निखिल रूममधे गेला, फ्रेश झाला आणि सर्वांना पेढे वाटून घरी निघून गेला.

"अगं कित्ती !!!? आनंदात आहे ना आज निखील!!...तुला आठवत आहे आपल्याला पहिल्यांदा बाळ झालं तेव्हा असाच आनंद माझ्या चेहऱ्यावर झळकत होता."


" पुरे झालं कौतुक आता....उगाच खर्च केला एवढ्या पेढ्याचा. जरा पैसे वाचवायला शिकवायला हवं."

काही वेळाने निखिल घरी आला.


सगळी मंडळी जेवायला बसली.

" आता तुमच्या राणी साहेब कधी येणार आहेत? जरा लवकर आणा नाही तर आधीच स्लो,  मग आळशी होऊन जाईल आयत खाऊन ती."
निखिल शांतपणे ऐकत होता.

"भाऊजी अहो निरजा  कधी येनार आहे?"

" आणतो ना! ...थांबा जरा!!दोन महिने
"


" बापरे! एवढे दिवस मग घराचं कोण करेल? आता नीता पण जाणार आहे तिच्या नवऱ्या सोबत त्याचा कामाच्या  ठिकाणी कारण बंटीची एडमिशन झाली तिकडे."

"बरं बघतो आणि विचारतो तिला तसं."


निखिल जाईल का लवकर नीरजाला आणायला की नाही?
बघू  या पुढच्या भागात. धन्यवाद!
क्रमशः...
©®कल्पना सावळे


🎭 Series Post

View all