Login

आपली माणसं जाणिव नात्याची भाग दोन

लक्ष्मी आमच्यावर प्रसन्न होते आणि मी दोन्ही हाताने खर्च करत होते

आपली माणसं जाणिव नात्याची (भाग दोन)

‌एक दिवस अशोकला एक फोनआला. इन्स्पेक्टर राघव होते.. ,त्यांनी सांगितले राजू ने एका पब मध्ये दारू पिऊन गोंधळ घातला होता एका गुंडाच्या मुलाशी भांडला, मारामारी केली त्यामुळे पकडला गेलाय.

राजूला सोडवायला बराच पैसा चारावा लागला या सर्वांचा अशोक ला खूप मनस्ताप झाला मग आमच्या दोघात वाद झाला त्याच बीपी वाढल, पण तेव्हा तो काही न बोलता खोलीत जाऊन झोपला.
आमच्यात अबोला होता दोन दिवसांनी अशोक बिझनेस निमित्त बाहेर गावी गेला आणि तिथेच त्याला हार्ट अटॅक आला व सगळं संपलं.
बातमी ऐकून मला चक्करच आली कसेबसे मी स्वतःला सावरले. राजू यावेळीही घरी नव्हताच
दादा वहिनी आले, व अशोकचे क्रिया कर्म पार पडले. आता घरात मी व राजू व काम करणारे नोकर एवढेच होतो.
अशोकचा भाऊ सुरेश व बहिण उषाभेटायला आले. ते खूप रडले मला म्हणाले थोडे दिवस गावाला येऊन रहा चार जणात बरं वाटेल पण मी कोरडेपणाने नकार दिला.
राजू मध्ये काहीही सुधारणा दिसत नव्हती मला वाटले होते बाबा गेल्याने तो आपली जबाबदारी समजून मला आधार देईल पण झाले उलटच आता सर्व इस्टेट त्याने आपल्या नावाने मला कळू न देता माझी सही घेउन, करून घेतली.

माझी तब्येत ही आता शा बरी नसायची अशोकची कमतरता मला सतत जाणवायची. त्याचे किती प्रेम होते माझ्यावर पण् मी मात्र त्याच्या मनाप्रमाणे कधीच वागले नाही नेहमी आपलाच हेका चालवला, पण तरीही त्याने कधीच तक्रार केली नाही.
मी नेहमी राजूला पाठीशी घातले पण राजूला माझी काहीच किंमत नव्हती आताशा त्याला सट्टा लावायची ही सवय लागली होती. त्यात त्याने बराच पैसा घालवला मग तो माझ्याकडे दागिने मागू लागला मी त्याला समजावायचा बराच प्रयत्न केला पण ते सर्व निष्कळ ठरले.

आमच्याजवळ होते नव्हते ते सर्व त्याने उडवले. भर म्हणून त्यांनी इकडून तिकडून उधार ही घेतले कर्जाचे हप्ते द्यायला ही त्याच्याजवळ पैसे नसायचे मग तो घरातून गायब असायचा बरेच लोक आमच्या घरी पैसे मागायला, राजूला शोधत येत.
मी एकदा दादाकडे काही पैसे मागितले, घर खर्च चालवायलाही पैसे नव्हते. एक वेळा वहिनी ने दिले पण् उपकार केल्यासारखे, व बोलली ‘अहो नेहमी नेहमी नाही हं जमणार, आम्हालाही संसार आहे. “
तिचे ते बोलणे मला खूप झोंबले पण् नाईलाज होता .
मी माझ्या मैत्रिणींनाही फोन करून विचारले तेव्हा त्यांनीही हात वर केले वरून म्हणाल्या ‘अगं दिलेही असते पण तुझ्याकडून परत मिळण्याचे चान्स कमीच, ‘बाकी इतर कोणी असं नव्हतं.

रात्री मला काही केल्या झोप येत नव्हती, सारखे दार वाजल्याचा भास होत होता, एक दोनदा मी उठून जाऊन दाराशी चाहूल ही घेतली कोणीच नव्हते. पण मनाची तगमग काही थांबत नव्हती .
सारखं वाटत होतं ते गुंड पैसे वसूल करायचा येतील कारण मागच्या वेळी ते धमकी देत म्हणाले होते पैसे नाही दिले तर बंगला रिकामा करावा लागेल.
अशोकचे बोल सारखे आठवत होते” मधू ,”जपायला शिक–! पैसा आणि माणसंही” पण तेव्हा आपण आपल्याच गुर्मीत होतो .अशोक सारखा एवढा मोठा उद्योगपती नवरा असताना काय कमी आहे? लक्ष्मी आमच्या वरप्रसन्न होती आणि मी दोन्ही हाताने खर्च करत होते. आणि हीच सवय राजू ने उचलली. आणि आज ही वेळ आली. आज अशोक असता तर काहीतरी मार्ग काढला असता पण तो तर या सर्वाच्या पलीकडे निघून गेला

मधुला तिचे पूर्वा आयुष्य आठवले,
आई सर्वांना सांगायची मधु झाली आणि ह्यांचे प्रमोशन झाले चांगल्या पायगुणांची आहे म्हणून खूप कौतुक करायची, दिसायला सुंदर त्यामुळे मधुला लहानपणापासूनच स्वतःचा अभिमान होता ती स्वतः पुढे दुसऱ्याला काहीच समजत नसे, अभ्यासात मात्र यथा तथाच होती जेमतेम पास होत पुढे सरकत कॉलेजपर्यंत आली होती दादा मात्र खूप हुशार.
कॉलेजमध्ये ती नित्य नवी फॅशन करून जायची. पॉकेट मनी ही भरपूर असे, त्यामुळे मित्र-मैत्रिणींचा तिच्याभोवती नेहमीच गराडा असे, कधीतरी पिरेड बंक करून सिनेमालाही जात. पिकनिक पार्ट्या यामध्ये मधुचे दिवस आनंदात जात होेते.
क्रमशः
अशोक शी भेट कशी झाली?