Feb 25, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

आपले गुरू..

Read Later
आपले गुरू..


गोष्ट छोटी डोंगराएवढी.... 


गुरूने दिला ज्ञानरूपी वसा.. गुरू शिष्यांचे नाते हजारो वर्षांपासूनची अखंडीत पंरपरा आहे. पहिला गुरू म्हणजे आपले आईवडील आणि दुसरे गुरू म्हणजे आपले शिक्षक.. 


आई वडील हे आपण जन्माला आल्यापासूनचे गुरू असतात, तर आपले शिक्षक आपले जीवनाचे मार्गदर्शक असतात. 

आई वडील आपल्या चालायला बोलायला शिकवतात, त्याप्रमाणे आपले शिक्षक आपल्याला लिहायला वाचायला शिकवतात.


शिकण्याला वय नसतं त्यामुळे आयुष्यत प्रत्येक टप्प्यावर आपल्या गुरू लाभत असतात, कधी वयाने मोठे, तर कधी वयाने लहान पण बुध्दीने महान असे गुरू देखील आपल्याला भेटतात. मुळात गुरू होत किंवा गुरू मिळण हे वयावर अवलंबून नसतं. आता हेच बघा ना, सात वर्षाचा लहान नातू आपल्या आजी आजोंबाना स्मार्टफोन कसा वापरायचा हे शिकवतो म्हणजे एक तो प्रकारे तो त्याचा गुरुच झाला ना. 


आणि त्याहून महत्त्वाचा आपला तिसरा गुरू म्हणजे आपला अनुभव.आपल्याकडे अनुभव असेल तर आपण प्रत्येक गोष्ट साध्य करू शकतो. जर आयुष्य एकदा गोष्टीचा अनुभव असेल तर दुसऱ्या तीच गोष्ट करताना,भूतकाळातील चूक लक्षात घेऊन तु सुधारण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून यावेळी पुन्हा तीच चूक आपल्याकडून घडू नये.


आयुष्यात रोज आपण जर नीट चौकस रित्या बघितल आपल्या निरनिराळे लोक भेटतात, खुप काही गोष्ट सांगतात, त्यातल्या फायद्याच्या आपण घेतो गोष्टी पण, तर निरुपयोगी गोष्टी सोडून देतो, मग हे लोक सुध्दा एक प्रकारे आपले गुरूच झाले. 


एका शिक्षकाच कर्तव्य असत, ते म्हणजे विद्यार्थी तयार करणे त्याला घडवणे, त्याला चांगल्या वाईटाचे ज्ञान देणे, भविष्यातील आवाहनसाठी मानसिकरित्या तयार करणे.

गुरुला ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे हवी, कारण कोणताच स्वतःहून तुमच्या कडे येत नाही तर आपल्याला त्याच्या कडे जावे, त्याच्या कडून त्याच्या कडील ज्ञान आत्मसात करून घ्यावे लागते. जर आपण ते ज्ञान काळजीपूर्वक घेतल तर आपल्या भविष्याचा मार्ग सुक्कर करण्याचे मार्ग सापडतील. 

आयुष्यात गुरू आपल्या कधी कोणत्या रुपात मिळेल हे कोणीच नाही ठरवु शकत, फक्त त्या गुरुकडून आपल्या विद्या मात्र अवगत करता आली पाहिजे. 


धन्यवाद

✍✍©® अमृता कुलकर्णी. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//