आपला तो बाळ्या दुसऱ्याचे ते कारटे (अंतिम )

Marathi Story
आपला तो बाळ्या दुसऱ्याचे ते कारटे

मागच्या भागात आपण वाचले प्रशांत यशला ओरडला आणि ते यशच्या आईने ऐकले आता पुढे

"काय झाले,काय केले यशने ?"...(यश ची आई प्रियांका)

"अहो तो गाड्यांच्या मधून सायकल घेऊन गेला, सायकलचा हँडल गाडीला घासला .
हे बघा किती मोठी क्रॅश पडली."........... प्रशांत

"अहो लहान मुलगा आहे तो, त्याला काय समजते.
चुकून लागले असेल त्याच्याकडून मुद्दाम थोडचं केलं का त्याने. किती मोठ्याने ओरडले तुम्हीं."....... प्रियांका

"ठीक आहे, प्रशांत जरा जास्त ओरडला पण तुम्हीच बघा गाडीला किती मोठी क्रश केली आहे ती.".... जागृती


" तुम्ही उभे होता ना इथे तुम्ही सांगायला पाहिजे होते त्याला इथे खेळू नकोस म्हणून"...... प्रशांत

"असं कसं म्हणता तुम्ही. बरोबर आहे तुम्हाला अजून मुलं नाही ना म्हणून बोलताय"........ प्रियांका

"अहो काहीतरीच काय बोलताय?".....जागृती

"अहो , इथे त्याच्या सायकलच्या हँडल मुळे गाडीला क्रॅश गेली आहे ती नीट करून घ्यायला किती खर्च येईल तुम्हाला माहिती आहे का काही."........ प्रशांत

"अरे म्हणजे काय आमच्या मुलांनी खेळायचे नाही का?
आणि कशावरून त्याच्याच सायकलच्या हँडलमुळे क्रॅश पडली. तुमच्या गाडीला ती आधीपासूनच असेल.".....................प्रियांका

"तुम्हाला काय म्हणायचे मी खोटं बोलतोय का ?आत्ता आमच्यासमोर सायकलचा हँडल गाडीला घासला आणि तरीही तुम्ही म्हणता कशावरून? हद्द आहे आता."
असे म्हणून प्रशांतने डोक्याला हात लावला.

"काय हद्द आहे बरोबरच बोलते मी."
प्रियंका तिचा हेका सोडायला तयार नव्हती.

यावर प्रशांत अजून काहीतरी बोलणार तोच जागृती म्हणाली

" प्रशांत निघू आपण बोलून उपयोग नाही."

"हो म्हणे बोलून उपयोग नाही ,चल रे यश आधीच कुठेतरी लागलं असेल आणि लहान मुलांवर आरोप लावतात."
प्रियंका ने जाता जाता ही आपलेच म्हणणे खरे केले.

जागृती आणि प्रशांतने एकमेकांकडे बघितले

"कठीण आहे."....... जागृती

"अग साधं त्या सॉरी सुद्धा म्हणाल्या नाहीत. मी काय लगेच पैसे घेणार होतो का त्यांच्याकडून."

"अरे त्यांनी मान्य केले तर सॉरी म्हणतील ना."

*************
काही दिवसांनी,
संध्याकाळची वेळ
प्रियंका तिची एक्टिवा स्टार्ट करत होती.
तेवढ्यात आर्यनचा (5 ते 6 वर्षांचा मुलगा ) फुटबॉल तिच्या गाडीच्या आरशावर लागला आणि आरसा खाली पडला.

अचानक बॉल लागल्याने पहिल्यांदा प्रियंका गडबडली नंतर तिच्या लक्षात आले आर्यनच्या बॉलमुळे आरसा पडला त्यावर ती लगेच स्कुटी वरून उतरली आणि...

"अरे ही काय बॉल खेळायची जागा आहे का? आरसा तुटला ना माझ्या गाडीचा."
प्रियंका मोठ्याने आर्यनवर ओरडली.

तिच्या आवाजाला घाबरून आर्यन त्याच्याबरोबर असलेल्या त्याच्या आजीला बिलगला.

" सॉरी हां , अहो मी गार्डन मध्येच घेऊन चालले होते त्याला पण जाता जाता त्यांने बॉल फेकला."

"काय सॉरी तुमच्या सॉरी म्हंटल्यावर आरसा बसणार आहे का?"

तेवढ्यात तिथे प्रशांत आणि जागृती आले
काय झाले काकू.... प्रशांत

"अरे आर्यनने बॉल फेकला आणि यांच्या गाडीचा आरसा तुटला."...... आजी

"मी त्याचे वडील आले की बोलते आणि तुमचा काय खर्च होईल तो द्यायला सांगते."
आर्यन ची आजी प्रियंकाला म्हणाली.

यावर लगेचच प्रशांत,

"अहो काकू कशाला पैसे ?
लहान मुलगा आहे तो. चुकून लागला असेल त्याच्याकडून त्यात काय एवढं तुटला तर तुटला आरसा.
काय ओ यशच्या आई बरोबर बोलतोय ना मी"


यावर प्रियांका ओशाळली. काहीच न बोलता निघून गेली.

इकडे आर्यनला त्याची आजी रागावली तर ,
"जाऊ द्या काकू कशाला रागवता त्याला उलट आज त्याच्यामुळे कोणालातरी चांगली अद्दल घडली.
जा तुम्ही गार्डनमध्ये."

"बघितलस जागृती
त्या दिवशी यशला ओरडलो तर मला म्हणाल्या लहान आहे तो.आता आर्यन नाही का लहान."

"अरे यालाच तर म्हणतात ना आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचे ते कारटे.
स्वतःच्या मुलांच्या चुका दोष याकडे दुर्लक्ष करायचे, त्याच्यावर पांघरून घालायचे आणि दुसऱ्याच्या मुलांनी चूक केली का लगेच त्यांच्यावर धावून जायचे. त्यांना नाव ठेवायचे."........ जागृती

"बघूया आता तरी त्यांच्यात काही फरक पडतो का?
शेवटी काय सगळ्यांनीच समजदार पणा दाखवला तर कधीही पार्किंग मध्ये नोटीस लावण्याची गरज पडणार नाही.
आणि कोणाच्या गाडीचेही नुकसान होणार नाही."..... प्रशांत

समाप्त.
*************
सुजाता इथापे.







🎭 Series Post

View all