आपला तो बाळ्या दुसऱ्याचे ते कारटे- भाग १

Marathi Story
आपला तो बाळ्या दुसऱ्याचे ते कारटे - भाग १

काय एक एक प्रकारची माणसं असतात. काय केले पाहिजे काय नाही कोणाला समजतच नाही.
प्रशांत प तन- तन करतच घरात आला.

काय झालं ?ऑफिसमध्ये बॉस काही बोलला का तुला?
जागृतीने (प्रशांत ची बायको)चिडविण्याच्या दृष्टीने विचारले.

हो .इथे मी वैतागलोय आणि तुला चेष्टा सुचतीये.

वाटलं होतं मोठी सोसायटी आहे .सगळं कसं व्यवस्थित असेल, पण छे कसलं काय?

त्याला मधीच थांबवत जागृतीने विचारलं...

आता सोसायटीत काय झाले?

अग ती लहान मुलं किती खेळतात पार्किंग मध्ये. नुसतं गाड्यांच्या मधून पळत असतात.
आज अगदी अचानक एक छोटा मुलगा गाडी समोर आला माझ्या .पटकन ब्रेक लावला. बापरे काय घाबरलो मी.
थोडा तरी धक्का लागला असताना...
विचारच करवत नाही मला.


काय?
अरे बाबा ,हळूच येत जा जरा. छोटी छोटी लेकरं आहेत ती .काय बोलणार त्यांना ते खेळणारच.

अगं खेळू दे ना .खेळायला काही म्हणतच नाही मी आणि मुलांना तर नाहीच नाही.
पण त्याची आई अगदी मख्ख बसलेली होती गप्पा मारत.

अरे ती काय बसायची जागा आहे का ?पार्किंग आहे. येता जाता गाड्या येतात मुलांना तर देतात सोडून पण लक्षही ठेवत नाही.
मुलांकडे लक्ष नको का द्यायला .तूच सांग आता.

ते काही नाही मी उद्या आधी सोसायटीच्या सेक्रेटरी ला भेटायला जातो.
*****
नमस्कार भिडे साहेब,
मी इथे सी बिल्डिंग मध्ये राहतो.
जरा एक प्रॉब्लेम होता त्याविषयी जरा बोलायचे तुमच्याशी......... प्रशांत

हो ,बोला ना.........भिडे

अहो इथे मुलं पार्किंग मध्ये खेळतात .काल तर एक मुलगा अचानक गाडी समोर आला माझ्या .प्लीज तुम्ही एक नोटीस लावाल का पार्किंग मध्ये खेळू नये म्हणून.


तुम्ही नवीनच आलेल्या दिसतात राहिला इथे.
हो म्हणजे सहा महिने होतील येऊन.

म्हणूनच...

काय म्हणूनच?

अहो दोनदा नोटीस लावून झाली आहे पण तरीही एक दोन दिवस फरक पडतो परत जैसे थे चालूच.

अहो पण असं कसं काहीतरी तर केले पाहिजे ना.

ठीक आहे परत एकदा सांगतो नोटीस लावायला.
यावेळेस प्रत्येक पार्किंग मध्ये नोटीस लावायला सांगतो

थँक्यू......प्रशांत
*****
थोड्या दिवसांनी......

जागृती ,बरोबर बोलले होते भिडे.

नोटीस चा काहीही उपयोग नाही.

जाऊ दे ना. असेही आपण दिवसभर कुठे असतो इथे..... जागृती

तुला माहितीये अग अक्षरशः गाड्यांच्या मधून सायकल चालवतात ही मुले.

गाडीला लागलं म्हणजे
अरे हो ,तुझी तर जीव की प्राण तुझी गाडी.

हो तर आहेच.

बर जाऊदे तो विषय आता.
उद्या संडे आहे,मूवी बघायला जाऊया का खूप दिवस झाले गेलोच नाही.

ओके....... प्रशांत

*****
दुसऱ्या दिवशी सकाळी, स्थळ पार्किंग

ए अरे यश ,गाडी जवळ नका जाऊ.

इथे सायकल चालवायची जागा आहे का?

प्रशांतला असे म्हणे पर्यंत यश (सात ते आठ वर्षांचा मुलगा) सायकल घेऊन तडक गाडीच्या मधून घुसला आणि त्याच्या सायकलच्या हँडल ने प्रशांतच्या कुल, स्वीट ,रेड क्रेटाला मोठी क्रश गेली.

ते बघून प्रशांतचा चेहरा अगदी टोमॅटो सारखा लाल झाला आणि तो जोरात ओरडला...

यश अरे गाडीला लागला ना हँडल.

सांगत होतो ना ,जाऊ नकोस म्हणून.

जागृती तर क्षणभर फ्रिजच झाली.
प्रशांतचं बोलणं तिथेच गप्पा मारत उभी असणाऱ्या यशच्या आईने ऐकले.

******
क्रमशः

आता काय होईल पुढे वाचू पुढच्या भागात.


🎭 Series Post

View all