आपला संघर्ष खरच मोठा आहे??

आपण आपला संघर्ष मोठा बोलत त्याला कवटाळून बसतो, पण आपल्या संघर्षाला शेवट तरी असतो. त्यांच्या तर मृत्युलाही नाव भेटत नाही.

“आउउंउंउंउउंउं” कुत्रा केकाटण्याचा आवाज आला.

रॉनी आणि शेरा सावध झाले.

“देख कौन आया है, ये साला कुत्ता कहा से आया?” रॉनी त्याच्या साथीदाराला सांगतो.

एकाला दोरीने बांधून ठेवले असते. जसा कुत्रा केकाटण्याचा आवाज येतो. तस त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते.

“इन्सानो की समझदारी की दुनियाँ मे

वफादार वो बेजुबाँ निकला” तो

“साला, मौत सामने है, फिर भी हस रहा है, शायरी सुझ रही है” रॉनी चिडून बोलला. त्याची ती स्माईल रॉनी ला डिवचुन गेली होती.

“बाहरका निपट लु, फिर तुझे देखता हु” रॉनी पण बाहेर निघुन गेला.

बाहेरच्या बाजुला.

“लोकेशन?” चार्ली

“अॅप्रोक्स १० मिटर सर” तरल

“मुव्ह मुव्ह” चार्ली ने आपल्या साथीदारांना पुढे चालण्याचा इशारा केला.

“टॅंगो, गेट बॅक” चार्ली ने त्याच्या कुत्र्याला मागे यायला सांगीतल. तसा तो मागे येउन थांबला.

“तरी त्याला बोललो होतो, असा एकटाच उडत उडत नको जाउन, पण नाही, सगळ्यांचा जिव टांगणीला लावतो” चार्ली मनातच बोलतो.

फायरिंग सुरू होते. आत मधुन रॉनी आणि त्याच्या साथीदारांनीही फायरिंग सुरू केली.

बाहेरून जशी फायरिंग सुरू होते, तशी त्याने पण स्वतः ला सोडवून घेत आतमध्ये अटॅक केलेला असतो.

रॉनी चे बरेचसे साथीदार आडवे झाले. शेराने तिथुन पळ काढला. रॉनी मात्र सापडला.

शेवटी आपल्या मिलीटरी रेजिमेंट पुढे किती वेळ त्यांचा निभाव लागला असता.

त्यानेही कपडे त्या रॉनी च्या माणसांप्रमाणे घातले असल्याने. रेजिमेंटच्या काही जवानांनी त्याच्यावरही बंदुक तानली.

“ऑफीसर्स होल्ड” चार्ली धावत आत आला.

सगळे थांबतात.

“ही इज इंडीयन रॉ एजंट माईक” चार्ली ने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

“बंदुकीच्या गोळी त्याच्या पर्यंत पोहोचण्याआधी तुम्ही ढगात जाल” चार्ली हसत बोलला. तसे बाकी सगळे ऑफीसर्स शांत झाले.

त्यांनीही माईक च नाव खुप ऐकल होत पण कधीच बघीतल नव्हत. आज पहील्यांदा त्याला बघत होते.

सगळे कॅम्पवर परत आले.

त्या रॉनी आणि शेराने रचलेला कट माईकने ब-यापैकी उधळला होता. बंदी केलेल्या माणसांना त्याने सोडवल होत. त्यांना त्याच्या साथीदाराच्या हवाली करत. तो त्या दहशतवाद्यांच्या गुहेत एकटाच गेला.

बंदी तुन सोडवीलेल्या माणसांनी त्याला सांगुन पण पाहीले, की आतमध्ये त्यांची संख्या जास्त आहे. पण बाकी फोर्स येईपर्यंत उशीर होईल बोलत माईक हसत आत गेला. सगळे त्याच्याकडे बघत राहिले.

त्याच मिशन पुर्ण होणार होत, पण त्याच्याच साथीदाराने पाठीत खंजीर खुपसला. तो पकडला गेला.

त्याच्या मनाला इतकच समाधान होत की, दहशतवाद्यांचा कट उधळला गेला होता. आता येणाऱ्या मृत्युलाही तो हसत सामोरे जाणार होता.

त्याचा १० वर्षाचा झंझावात, त्याचा पडद्यामागचा संघर्ष आज तो स्वतः हुन शांत करणार होता. दुश्मनाच्या हातुन मरण्यापेक्षा स्वतः तो मृत्यू ला जवळ करणार होता. बाकी एजंट सारखा एक निनावी मृत्यू.

पण त्याच्या मित्र चार्ली, रेजिमेंटचा कमांडर त्याचा जो कुत्रा होता, त्याने बरोबर माग काढत त्याच्यापर्यंत पोहोचवले होते.

जसा त्याला त्या कुत्र्याचा आवाज आला त्याला समजुन गेल, मिलिटरी रेजिमेंट येउन पोहोचली आहे. स्वतः ला संपविण्यासाठी पाठीत खुपसलेला खंजीर त्याने काढाला होता. त्याच काढलेल्या खंजीरने त्याने त्याची दोरी कापली. जखमी असुन सुद्धा ३ ते ४ जणांना त्याने यमसदनी धाडले.

कॅम्पवर परत आल्यावर चार्ली ने माईक ला पहीले मिठी मारली.

“भावनाओं में बेहना

हमारा काम नहीं,

देश से बढकर और कुछ नहीं”

माईक त्याच्या शैलीत चार्ली ला बोलला.

माईकवर उपचार झाल्यानंतर तो पुन्हा उभा राहीला, पुन्हा त्या संघर्षासाठी, नवीन मिशनसाठी.

मागच्या वेळेस तरी, मदतीसाठी रेजिमेंट पोहोचली होती, पण प्रत्येक वेळेस ती पोहोचेलच अस नाही.

त्यांनाही ते माहीती असत. पण त्या वेड्यांना देशसेवेशिवाय दुसरे तरी काय दिसत???

आपण आपला संघर्ष मोठा बोलत त्याला कवटाळून बसतो, पण आपल्या संघर्षाला शेवट तरी असतो.

त्यांच्या तर मृत्युलाही नाव भेटत नाही.


~ महेश गायकवाड ~