आपला मूड आपल्याच हातात

This blog explains the mood factor of human being..Do read in this blog

आपला मूड आपल्याच हातात:-

"आज माझा जाम मूड गेलाय.
काही करायची ईच्छा नाही आहे."
निलय मोठ्या आवाजात फोन वर बोलत होता...

"आज मला रेस्टॉरंट मध्ये जाऊन चायनीज खायचा मूड आहे..."
सविता ने आज घरात जाहीर केले...

"मला मस्तपैकी लॉंग राईड ला जायचा मूड आहे आज..कोण कोण येणार माझ्या बरोबर?"
सचिन व्हॉटस ऍप च्या ग्रुप वर सगळ्यांना विचारत होता.

मित्रांनो आजचा विषय खूप साधा सोपा पण तितकाच महत्वाचा आहे. सगळ्यांना हा विषय आत्तापर्यंत कळला असेलच ज्याला म्हणतात मूड!

अगदी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत हा शब्द आपण अनेक वेळा ऐकला आहे ' मूड नाही माझा'.
मूड म्हणजे काय नक्की? तो खरच चांगला किंवा वाईट असतो का? त्याच मुळात अस्तित्व तरी काय?
तर मूड म्हणजे वेगळी काही वस्तू आहे का?

प्रत्यक्षात मूड असे काहीच नसते! असतो तो फक्त विचारांचा खेळ!
प्रत्येक व्यक्ती मग ते अगदी लहान मुलं असो त्याला खाऊ मिळाला नाही किंवा मनासारखे नाही मिळाले किंवा सोबत कोणी खेळले नाही की गेला मूड. त्यांच्या मनासारख झाले नाही, मग रुसवा आला फुगुन बसला म्हणजे गेला मूड ! 
माणसाला प्रत्येक गोष्ट मनासारखी हवी आणि नाही झाली की त्याचा मूड बदलतो.

विचारांची शृंखला ही आपण कशी ठेऊ हे बरेचदा आपल्यावर असते आणि कधीतरी आजाउबाजूच्या परिस्थिती वर. 
पण परिस्थिती आपल्यावर वरचढ व्हावी की आपण त्यावर हे आपण ठरवले तर नक्कीच योग्य असेल.
आजची तरुण पिढी म्हणा किंवा टिन एज त्यांचे तर विश्व वेगळं, त्यात मित्र मैत्रिणी आल्या की सांभाळून घेणे हा प्रकार नसून अपेक्षा ठेवायची आणि ती पूर्ण झालीच पाहिजे हा हट्ट...
मग काय एकसारखा राहणार सो कॉल्ड मूड!

त्यात जर पेरेन्ट्स ने चांगले काही सुचवले की यांना वाटते जनरेशन गॅप म्हणजे हे चूकच आहे आणि आपलं ऐकणार नाहीच मग गेला मूड!
तर प्रत्येकाला आनंदी असण्याचा हक्क असला तरी काही गोष्टी ह्या समजून आणि उमजून घेतल्या तर तर आजूबाजूला पण आनंद पसरेल. आनंद म्हणजे तर आरोग्याची किल्ली आहे हे कायम लक्षात ठेवावे.

मूड या प्रकारच्या नादी लागून आपण आपलं खूप काही गमावतो. 
आपले ते क्षण जे दुर्मिळ असतात!
आपले ते जवळचे व्यक्ती आणि त्यांच्या भावना ज्या खऱ्या ठेव असतात ते ही कधी मूड मुळे गमावतो!
मिळणाऱ्या त्या गोष्टी ज्या खऱ्या अमूल्य आहेत पण तो आनंद त्या क्षणाला उपभोगता येत नाही!
मग जर आपण ह्या मूड प्रकाराला जर लांब केला आणि आपली विवेकबुद्धी जागी ठेवली तर योग्य होणार नाही का?
परिस्थिती जरी क्षणात नाही बदलता आली तरी ती सारखी कधीच राहत नाही मग थोडा पेशन्स ठेवला तर नक्कीच त्याचा रिझल्ट चांगला मिळेल.

म्हणूनच मूड ही मनाची एक अवस्था आहे असे मानुयात.
तुमच्या आयुष्यात घडणा-या घटनांमुळे तुमच्या मनात असंख्य भावना उत्पन्न होतात.
आपण आनंदी असतो त्यावेळी  आयुष्यातील दु:ख  विसरुन जाणे आणि दु:खी असताना तुमच्या जीवनात काहीच चांगली गोष्ट घडणार नाही हे फिलिंग येणे म्हणजेच मूड ची अवस्था नाही का.

कामामुळे किंवा कुठल्याही सक्रिय कार्यप्रणाली मध्ये ताण तणाव निर्माण होत असतो आणि हा ताण आपल्याकरिता हानिकारक असतो. यामुळे मूड बदलणे हे सहज घडू शकते अशावेळेस ध्यान आणि योगासने यांची असलेली सवय फार उपयुक्त ठरते.

चला तर मग आपल्या मूड ला आपल्या हातात ठेऊयात!

काळजी करू नका , काळजी घ्या!

©®अमित मेढेकर