Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कविता

आपण दोघे

Read Later
आपण दोघे


राज्य करंडक स्पर्धा कविता फेरी
विषय - दोन ध्रुवांवर दोघे आपण

कवितेचे नाव - दोन ध्रुवांवर दोघे आपण

कसे कधी नकळतं कोरले
नात्यावरी दुराव्याचे कोंदण
एक होता जिथे विसावा ,
आता दोन ध्रुवांवर दोघे आपण

लक्तरे निघाली विश्वासाची
अशी उसवत गेली विण
विचारांचे तुटले बंधन
का ,दोन ध्रुवांवर दोघे आपण ?

स्पर्श खुंटला प्रीतीचा
ओस पडले हृदयांगण
सुकून गेला पारिजात
मोगरा करे मुक आक्रंदन

मनी अहंकाराचे कुंपण
कसे घालावे भेगेत लिंपण
माजले विचारांचे रणकंदन
दोन ध्रुवांवर दोघे आपण

विवेकाचे करू आचरण
दुःखावर घालून मायेची पखरण
थोडी तडजोड घेऊनी आंदण
आनंदाची करूया लावण

दोन पावलांचा प्रवास मिटवू
एकाने मागे एकाने पुढे येऊन
तरच थांबेल वाळवंटी वणवण
बरसेल संसारी सुखाचा श्रावण.

©®मृणालिनी पाटील - खोत
कोल्हापूर ( इचलकरंजी )

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//