आपली माणसं? (भाग २)

नातं हे दोघांनी सांभाळलं तर फुलतं आणि टिकतं.


भाग २

***************************
तिला बघून सासूबाई म्हणाल्या,

" काय गं फक्त तीन महिने झाले तुला दिवस गेले, झाले का नाटक सुरू तुझे.मी गरोदर होती तेव्हा नवव्या महिन्यापर्यंत खटल्याच काम करायची. आता नशीब चागलं की तुमच्या वेळी खटल नाही. काय केलं असतं काय माहित?
नीता दे बाई तिला काही तरी  गिळायला नाही नाहीतर उगाच मी बदनाम होईल."


नीरजा काहीही बोलली नाही मात्र तिला जे खायला दिलं ते ही शिळ रात्रीच दिलं पण काय भूक लागली म्हटल्यावर तिने कसलाही विचार नाही केला.


दोन दिवसानंतर निखिलचं ऑफिसचं काम संपलं  म्हणून गावावरून परत आला. त्याने बघितलं त्याची आई आणि वहिनी मस्त टिव्ही बघत बसल्या होत्या आणि नीरजा मात्र काम करत होती. एक काम झालं आणि दुसर हाती घेतलं ते बघून निखिल तिच्या जवळ गेला.


"एक ग्लास पाणी मिळेल का?"

ती हसली .

"हो..हो..कधी आलात?"


"बराच वेळ झाला आलो,पण तुझं लक्ष तर हवे ना!"


तेवढ्यात सासूबाई आल्या आणि म्हणाल्या...

" काय कुजबुज चालू आहे नवऱ्याजवळ?"


" काही नाही गं आई...असं का वाटत तुला की ती नेहमी मला काही सांगत असेल? खरं तर ती कधीच काही सांगत नाही मात्र मला सगळं दिसत."


आई हे ऐकल्यावर काहीच बोलली नाही आणि निघून गेली.


हळू हळू निरीजाचं पोट दिसू लागलं. आता तिला बसायला उठायला त्रास होऊ लागला. पण घरची काम काही सुटली नाही.गरोदर असतांना खूप काम करावी म्हणजे डिलिवरी मध्ये त्रास होत नाही असं म्हणून सासू तिच्याकडून सगळी कामं करून घायची. ती एवढी थकायची की ती न जेवता, न काही खाता झोपी जायची.


हे घरातलं वातावरण बघून निखिलला वाईट वाटायचं की आई अशी का वागते? पण तो तरी काय बोलणार शेवटी आईचं त्याची.


निरिजाला सातवा महिना लागला होता.

"नीरजा, अगं तू माहेरी जाते का या महिन्यात?"


"नाही... नाही... मग तुमचं कोण करेल.?"


"तू माझी काळजी करू नको. तू स्वतःची आणि आपल्या बाळाची काळजी घे."

काही दिवसांनी ती माहेरी निघून गेली. इकडे सासूबाई निखिलला म्हटल्या,

" हे बघ आता तिला चागलं चार सहा महिने राहू दे. बाळ मोठ्ठ झाल्याशिवाय आणु नको. कारण इकडे कोण करेल तीच आता?"


निखिल काहीही बोलला नाही त्यान आईकडे बघितलं आणि कामावर निघून गेला.

आता निरीजाला नववा महिना लागला आणि एक दिवस अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं तिला दवाखान्यात घेऊन गेले.

तिच्या माहेरच्या लोकांनी निखिलला फोन करून सांगितले की तिला अॅडमीट  केले, डिलिवरी कधीही होऊ शकते.

त्याने निरीजाला कॉल केला.


" नीरजा आता निघतो मी. काळजी करू नको सगळं काही ठीक होईल.

" आता नका निघू डॉक्टर म्हणाले आज तर नाही होणार नाही पुढच्या काही तासात होऊ शकते."

"नाही गं माझे मन नाही लागत इकडे आता."

"बरं!!! या मग तुम्ही."


निखिलने बॅग भरली आणि तो निघाला.


" हे काय कुठे निघाला एवढ्या रात्री? ते ही न सांगता."


" मला आतच समजलं..मी सांगणार होतो तुला अगं निरजाला दवाखान्यात भरती केलं आहे. आता डिलिवरी केव्हाही होऊ शकते.मग मी नको का जायला?"


" कशाला? सकाळी जा. एवढ्या रात्री. तिची काळजी घ्यायला बरीच माणसं आहेत.तिला काही फरक पडणार नाही, तू गेलास काय नाही नाही गेलास काय."


" आई अशी कशी बोलू शकतेस तू? यावेळी तर तिला खरी गरज आहे आपल्या माणसांची. तीच्या माहेरची माणसं  जरी तिची असली तरीही आपली कुणीच नाही का ती?"

आई यावर काहीही बोलली नाही.

निखिल जाईल  का निरिजाकडे  की घरीच थांबेल? बघा पुढच्या भागात.
धन्यवाद!

क्रमशः...
©®कल्पना सावळे


🎭 Series Post

View all