आई तुझं घर कुठे आहे ?

“चालती हो, माझ्या घरातून आत्ताच !” .... राजेशने तीला हाताला पकडून दरवाज्याच्या बाहेर ढकललं . "मी जाणार नाही. हे माझं सुदधा घर आहे."
आई तुझं घर कुठे आहे?

 
“चालती हो, माझ्या घरातून आत्ताच !” राजेशने तीला हाताला पकडून दरवाज्याच्या बाहेर ढकललं . 
"मी जाणार नाही. हे माझं सुदधा घर आहे." 
मीरा आणि राजेश पाच वर्ष झाली यांच्या लग्नाला परिसारखी एक मुलगी श्रीशा. राजेशचा संशयी स्वभाव, कोणासोबत बोलणं नाही की बाहेर पडणं नाही. राजेश गेटला कुलूप लावून बाहेर निघत होता. कोणत्याही गोष्टीचा राग आला की मारहाण चालू व्हायची. खूप कंटाळली होती त्याच्या स्वभावाला, तरीही त्याच्यासोबत संसार करत होती. फोनवर बोलणे ही नाही, जर बोलायच म्हटलं की समोर असतांना बोलायचं.
कोणासोबत बोलली तर का बोलली? हसली तर का हसली? आज ही तेच कारण मिळालं त्याला, मद्यपान करून मारहाण करत होता आणि आज तर हद्द पार केली त्याने, बेल्ट ने तीला जनावरासारखे मारले. श्रीशा तर घाबरून थंडीगार पडली. मीराने श्रीशाला उचलून छातीशी कवटाळले. ती खूप घाबरली होती. तिला पाणी पाजले.आज तर त्याने कहरच केला होता.
 मीरा रडतच अंगणात कितीवेळ बसली .
"स्वतः हाकलून देताय नं त्यांच्या घरातून, मी परत येणार 
नाही." तिने तिच्या मनाचा पक्का निर्णय केला. ती अंगणात बसलेली उठली , सरळ घरात जाऊन तीने तिच्या बॅगमध्ये तीचे आणि श्रीशा चे कपडे भरले आवश्यक कागदपत्र घेतली आणि सरळ बस मध्ये बसून ती तिच्या माहेरी गेली. घरी गेल्यावर आईच्या गळ्यात पडून रडू लागली. आई ने तिला पाहिलं तीच्या अंगावर खूप लाल अन काही जखामांचे डाग होते. कानाला दुखापत झाली होती. ते व्रण जखमा पाहून आई सुद्धा रडायला लागली ..  

“किती मारलं आहे गं, त्या माणसाने एखाद्या ढोराला ही कोणी मारणार नाही ..” तिने सर्व घडलेली घटना सांगून दिली.
"आई मी जाणार नाही,ते माझं घर नाही."

 “ठिक आहे नको जाऊस,मी ही जाऊ देणार नाही. मी तुझ्यासोबत आहे.” आई 

असेच दिवस जात होते पण मीराचं रडण थांबत नव्हतं दोन ते तीन महिने होऊ गेलेत. शरीराच्या वरच्या जखमा हळूहळू भरत होत्या पण मनाच्या जखमांच काय? कायमची येथे राहायला आली ही तीच्या वहिनीने नाकतोड मुरडलं. हळूहळू तीच्या वहिनी ने संगीताने कुरबूर करायला सुरूवात केली. भावाच्या कानात बहिणीविषयी काहीबाही सांगू लागली . तो नेहमी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा त्याला माहित होत त्याची बहिण कशी आहे. खूप वेळा त्याने ऐकून घेतलं पण एक दिवस त्याने तिला संतापात एक कानाखाली मारली. 

 किती दुख झाले,त्या बहिणीला "माझ्यामुळे याने आज वहिनीवर हात उचलला .. ती रडत बसली इथेही माझी चूक आहे का? हक्काचं माहेर ही परकेपणाच घर झालं. इथे आपण परके आहे अस वाटायला लागलं येथे ही जास्त दिवस नाही राहू शकत माझ्यामुळे त्यांच्या संसारात अडचण नको." 
 श्रीशा येऊन म्हणाली, ” आई तुझं घर कुठेयं गं?"
"का गं काय झालं?"

“दिदी म्हणते हे तुझं घर नाही. मग तुझं, माझं आपलं दोघाचं घर कुठे आहे गं.” श्रीशा.

काय सांगू तिला हे ही घर तिचं नाही ती विचार करू लागली.
 \"लग्नाआधी सर्व म्हणायचे, तुला दुसऱ्यांच्या घरी जायचं आहे तुझ्या घरी जे घर तुझं असेल आणि लग्न झाल्यावर नवर्‍याने आयुष्यभारी सोबत घेऊन एक मिनिटच्या आत घरातून हाकलून दिलं. थोडाही विचार केला नाही. मग माझं हक्काचं घर कुठेयं? कुठे आहे?\" ही तिला प्रश्न पडला.

मीराला तिच्या प्रश्नांच उत्तर मिळेल का?

क्रमश ..
©® धनदिपा


🎭 Series Post

View all