Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

आणि ती शेवटची हसली...

Read Later
आणि ती शेवटची हसली...


 

कथेचे शिर्षक - आणि ती हसली

विषय - आणि ती शेवटचं हसली...

फेरी - राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धावडगावच्या रस्त्यावर एक अँम्ब्युलंस सायरन वाजवत जोरात पळत होती. काही क्षणातच ती अँम्ब्युलंस सरकारी हॉस्पिटलच्या गेटवरयेऊन उभी राहिली. अँम्ब्युलंसच्या पुढेच एक पोलिस जीप तिथे आली होती. त्या जीपमधून पोलिस निरीक्षक प्रशांत उतरले आणिरिसेप्शन काऊंटरवर जाऊन काहीतरी बोलले. त्यांच्यासोबत बोलल्यावर रिसेप्शनवरील लेडीज रिसेप्शनिस्ट सिस्टर आणि वॉर्डबॉयलाआवाज देऊ लागल्या.


"सिस्टर... वॉर्डबॉय! लवकर स्ट्रेचर आणा. बर्निंगची एक इमर्जन्सी केस आली आहे."


तेवढ्यात एका नर्सने लगबगीने डॉक्टरांना बोलावून आणले. डॉक्टरांना बघून पोलिस निरीक्षक प्रशांत डॉक्टरांकडे गेले.


"डॉक्टर, एक इमर्जन्सी केस आहे बर्निंगची. एक मुलगी अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडली आहे. श्वास चालू होता म्हणून त्वरित इथेघेऊन आलो. उपचार सुरू करा. आमची फॉर्म्यालिटी करून झाली आहे."


"लगेच उपचार सुरू करतो." असे सांगून डॉक्टर इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये निघून गेले.


जवळपास दोन तास गेले पण पेशंटची कंडिशन कशी आहे याची काहीच माहिती मिळेना. नर्स बाहेर येत होत्या आणि जरुरीचे सामानआतमध्ये घेऊन जात होत्या. दोन तासानंतर डॉक्टर बाहेर आले आणि पोलिस निरीक्षक प्रशांत यांना म्हणाले,

"प्लीज माझ्या केबिनमध्ये या"


केबिन मध्ये गेल्यावर डॉक्टर म्हणाले, "जवळपास ७०% भाजली आहे ही मुलगी. चेहऱ्यापासून कमरेपर्यंतचा भाग जास्त जळालेलाआहे. वेदनाशामक देऊन आम्ही उपचार सुरू केले आहेत.पण वाचण्याची शक्यता खूप कमी वाटते. मला एक सांगा हे सुसाईड केस आहेकी अटेंप्ट टू मर्डरची ?""प्रथम दर्शनी पाहता सुसाईड केस नाही वाटत. अटेंप्ट टू मर्डरची शक्यता जास्त आहे. कारण सुसाईड नोट कुठेही सापडली नाही आणिही मुलगी आम्हाला जिथे सापडली तो भाग थोडा आऊटसाईडला आहे आणि पंचनामा केल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की त्यामुलीला जबरदस्ती तिथे आणलेलं असणार. कारण तिच्या जवळच्या वस्तू जागोजागी पडलेल्या होत्या." पोलिस निरीक्षक प्रशांत यांनीमाहिती दिली.


"साहेब ही फक्त मर्डरची केस नाही आहे. तर रेप अँड अटेंप्ट टू मर्डरची केस आहे. तिची तपासणी करताना आम्हाला तिचा रेप झालाय हेआढळून आले आणि अजूनही बऱ्याच काही गोष्टी आढळून आल्या आहेत त्या मी रिपोर्टमध्ये मेंशन करेनच." डॉक्टर म्हणाले.


"ओह! ठीक आहे डॉक्टर! तुम्ही तुमचे उपचार सुरू ठेवा. आम्ही आमचा तपास सुरू करतो. मुलीच्या घरच्यांचा अजून काही संपर्कझालेला नाही आहे. लवकरच तो होईल अशी अपेक्षा आहे." पोलिस निरीक्षक प्रशांत म्हणाले.पोलिस निरीक्षक प्रशांतला वडगाव पोलीस स्टेशनमधून कॉल येतो. पोलीस स्टेशनमध्ये एक काळे नावाचं एक दांपत्य आपल्याहरवलेल्या मुलीची कम्प्लेंट नोंदवायला आले होते. हॉस्पिटलमध्ये आणलेल्या या मुलीच्या घटनास्थळी सापडलेल्या वस्तू दाखवून हीचमुलगी त्या जोडप्याची हरवलेली मुलगी आहे हे पोलिस स्टेशनमध्ये हजर असलेल्या हवालदार जाधवांनी कन्फर्म करून घेतले. इन्स्पेक्टरप्रशांतनी हवालदार जाधव यांना त्या जोडप्याला हॉस्पिटलला घेऊन यायला सांगितले. थोड्या वेळातच हवालदार जाधव त्या जोडप्यालाहॉस्पिटलला घेऊन आले. त्यांच्यासोबत एक तरुण मुलगा देखील होता.


"साहेब कुठे आहे आमची मुलगी ? कशी आहे ती ? या हवालदार साहेबांना विचारलं तर काहीच सांगायला तयार नाही, इथे घेऊन आलेसरळ" काळे दांपत्य हात जोडून रडत म्हणाले.


"सांगतो... हे कोण आहेत तुमच्या सोबत ?" पोलीस निरीक्षक प्रशांत यांनी विचारले,


"तो विशाल आहे आमचा शेजारी. आमच्या मुलासारखाच आहे आम्हाला. खूप वेळ झाला आमची मृण्मयी घरी आली नाही म्हणून मगयाला घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो. सांगा ना साहेब आमची मृण्मयी कशी आहे ?" मिसेस काळे रडत रडत म्हणाल्या.


"तुम्ही आधी या बाकावर बसा मिस्टर अँड मिसेस काळे. हे बघा मी जे सांगतोय ते शांतपणे ऐका. तुमच्या मुलीच्या सामानाची तुम्हीओळख पटवली आहेच. वडगाव रोडला एक थोडासा आऊट साईडला एक सुनसान एरिया लागतो तिथे आम्हाला तुमची मुलगी अर्धवटजळालेल्या अवस्थेत सापडली. तिला आम्ही तडक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू झाले आहेत आणि अजून एकमहत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या मुलीवर बलात्कार झालेला आहे आणि तिला जाळून मारण्याचा प्रयत्न झालेला आहे." पोलीस निरीक्षकप्रशांत यांनी सांगितले.


हे ऐकून मुलीच्या आई-वडिलांना प्रचंड धक्का बसला.


"नाही नाही! हे खरं नाही …माझ्या सोन्यासारख्या मृण्मयी सोबत असं होऊ शकत नाही. नक्कीच तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहेसाहेब. ती माझी मुलगी नसेल. आम्हाला त्या मुलीला बघायचंय." त्या मुलीचे आई-वडील म्हणाले.


पोलीस निरीक्षक प्रशांत त्यांना डॉक्टरांची परमिशन काढून इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये घेऊन गेले. मुलीची अवस्था बघून तिच्या आईनेकिंकाळीच फोडली. तिचे वडील जागीच मटकन खाली बसले. चेहरा जरी जळालेला होता तरी आपल्या पोटच्या गोळ्याला कुठले आई-वडील ओळखणार नाहीत.


"तिला आपल्या आवाजाचा त्रास व्हायला नको. सध्या वेदनाशामक देऊन तिच्या शरीराच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न डॉक्टरांनीकेला आहे. तिला आराम करू दे. तुम्ही बाहेर या." पोलीस निरीक्षक प्रशांत यांनी तिच्या आई-वडिलांना बाहेर नेले.


तिच्या आईच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. वडील तर शून्यात नजर लावून बसलेले. विशालला समजत नव्हते कुणाला आधी धीरद्यावा. तो दोघांनाही सावरत होता.


"सर हे सर्व कुणी केलं काही समजलं का? कोण आहे तो विकृत ज्याने आमच्या फुलासारख्या मृण्मयीची ही अवस्था केली. अशानराधमांना जगण्याचा अधिकार नाही." विशाल प्रशांत साहेबांना म्हणाला.


"अजून काहीच समजलं नाही जोपर्यंत मृण्मयी शुद्धीवर येत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही." पोलीस निरीक्षक प्रशांत म्हणाले.


पोलीस निरीक्षक प्रशांत हे काळे दांपत्याजवळ जाऊन म्हणाले, "खरंतर हा तुमच्यासाठी खूप मोठा शॉक आहे. पण तुमच्या मृण्मयीच्यागुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी मला तुमची मदत अपेक्षित आहे. तुमचा कोणावर संशय आहे का ?मृण्मयीला कोणी कॉलेजमध्ये त्रासदेत होतं का? ती तुम्हाला कधी काही याविषयी कोणाबद्दल बोलली आहे का ? अगदी सगळं डिटेल मध्ये मला सांगा."


"नाही हो सर! ती कधीच काही बोलली नाही. माझी मृण्मयी अगदी नाकासमोर चालणारी मुलगी. कुणाच्या अध्यात मध्यात नाही तीकधीच. काही बोलली नाही तिला कोणी त्रास देतोय का ते. हो पण हल्ली काही दिवसांपासून ती जरा गप्प गप्प राहत होती. मी तिच्याबाबांनी तिला विचारण्याचा खूप वेळा प्रयत्न केला. पण नेहमी ती काहीच नाही हे उत्तर द्यायची. आमच्या शेजारचा विशाल तिचाबालमित्र त्याला देखील आम्ही विचारायला सांगितलं होतं. आम्हाला नाही निदान त्याच्याजवळ तरी ती तिचं मन मोकळं करेल. पणत्याला देखील तिने काहीच सांगितलं नाही." मृण्मयीच्या आईने माहिती पुरवली.


"बरं ठीक आहे, आम्ही आता निघतो. ही बातमी पत्रकारांपर्यंत पोहोचली आहे .पोलीस स्टेशनला बरेच पत्रकार जमले आहेत. मलातिकडे जावं लागेल. तुम्ही टेन्शन नका घेऊ तुमच्या मुलीचं नाव बाहेर येणार नाही. लवकरात लवकर ही केस सोडवण्याचा प्रयत्न करूआणि स्वतःला सावरा. दोन हवालदार तिच्या सिक्युरिटीसाठी इथे ठेवून जातोय. विशाल तू मला पोलीस स्टेशनला येऊन भेट. तुमच्यासर्वांचे मोबाईल नंबर ऍड्रेस संपर्कासाठी देऊन जा." पोलीस निरीक्षक प्रशांत म्हणाले आणि तिथून निघून गेले.


एका कॉलेजवयीन युवतीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरलीहोती. या मन सुन्न करणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ शहरात अनेक मोर्चे निघाले. लवकरात लवकर आरोपींचा शोध लागावा याची मागणीजोर धरू लागली. पोलीस निरीक्षक प्रशांत आणि त्यांच्या टीमवर वरिष्ठांकडून लवकरात लवकर आरोपींचा शोध घेतला जावा यासाठीदबाव निर्माण होऊ लागला.


इकडे मृण्मयीची हालत दिवसेंदिवस खराब होऊ लागली होती. तिचा डोळ्यांखालचा चेहरा ते पोटापर्यंतचा भाग जळाल्यामुळे तिचेस्वरयंत्र निकामी झाले होते. हृदय देखील २०% काम करत होते. वेदनाशामक देऊन डॉक्टर तिच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करतहोते. तरीही जीवघेण्या वेदना तिला जाणवत होत्या. दुर्दैव असं की वेदनेने तिला ओरडताही येईना. डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्याहोत्या. तिची ही अवस्था बघून तिच्या आई-वडिलांचे हृदय तीळ तीळ तुटत होतं. तिथे असलेल्या डॉक्टर आणि नर्सेसचीही काही वेगळीअवस्था नव्हती. त्यांना देखील मृण्मयीची ही अवस्था बघवत नव्हती. तिची ती अवस्था बघून तिचे आई वडील रोज देवाला प्रार्थना करतहोते.

"देवा काय अवस्था केली आहे आमच्या फुलासारख्या मुलीची. सदैव हसतमुख असणारी आमची मृण्मयी वेदनेने सतत कळवळत असते. रडत असते. नाही बघवत आता तिचा त्रास. एक तर आमच्या मृण्मयीला बरं तरी कर नाहीतर हे या सर्वातून एकदाचं सोडव. रोज रोजतिला असं तीळ तीळ मरताना नाही बघवत."


एक दिवस मृण्मयी जवळ तिचे आई-बाबा आणि विशाल बसले होते. तेवढ्यात पोलीस निरीक्षक प्रशांत तिथे आले आणि विशाललाअटक करून आपल्या सोबत पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ लागले.


"अहो साहेब काय केलं विशालने ? का त्याला घेऊन जात आहात?" मृण्मयीचे बाबा विचारू लागले.


"लवकरच तुम्हाला समजेल मिस्टर काळे!" एवढे बोलून पोलीस निरीक्षक प्रशांत विशालला घेऊन गेले.


"मला सोडा! मी काही केलं नाही. मी निर्दोष आहे." हॉस्पिटलपासून पोलीस स्टेशनपर्यंत विशाल सतत एकच वाक्य बोलत होता.


पोलीस स्टेशनला गेल्यावर विशालला लॉकअपमध्ये टाकण्यात आले. प्रशांतसाहेब देखील हवालदार जाधव सोबत लॉकअपमध्ये गेले.


"साहेब सोडा मला! मी काही नाही केलं. का मला पकडून आणले आहे तुम्ही ?" विशाल म्हणाला


"सांगतो ना... तू काय केलंस ते" प्रशांत साहेबांनी विशालचा एक सणसणीत कानाखाली मारली.


"ओ साहेब गरीब आहे म्हणून काहीही करणार का तुम्ही. माझा काही गुन्हा नसताना तुम्ही मला इथे पकडून आणला आहेत आणि आतामारत आहात." विशाल गालावर हात ठेवत म्हणाला.


"तू स्वतःच्या मनाला विचार तू काय केलेस. बऱ्या बोलाने कबूल कर की मृण्मयी सोबत जे दुष्कृत्य घडलंय ते तूच केलं आहेस. तुला मीपोलीस स्टेशनला भेटायला बोलवलं तेव्हाच मला तुझ्यावर संशय आला होता. म्हणून मी तुझी चौकशी केली." पोलीस निरीक्षक प्रशांतम्हणाले.


"काही काय बोलता साहेब तुम्ही. ती माझी बालमैत्रीण आहे. मी तिच्यासोबत असं का करेन ?" विशाल म्हणाला.


"हे बघ विशाल तुझ्या विरोधातले सर्व पुरावे मला मिळाले आहेत. मृण्मयीच्या नखांमध्ये तुझी त्वचा सापडली आहे. हॉस्पिटलमध्ये तुलाब्लड डोनेट करायला सांगून मी तुझ्या रक्ताचे सॅम्पल घेऊन मृण्मयीच्या नखात सापडलेल्या त्वचेसोबत आम्ही तुझे डीएनए मॅच केलेआहेत . यावरून सिद्ध होतं की मृण्मयीच्या नखांमध्ये सापडलेली स्कीन तुझी होती. तुझे कॉल डिटेल्स आम्ही चेक केले. गेल्या एकामहिन्यापासून तू मृण्मयीला रोज किमान दहा वेळा तरी कॉल करत होतास. आम्ही मृण्मयीचा मोबाईल देखील चेक केलाय. तिने तुलासोशल मीडियावर ब्लॉक केलेला होतं. तिने तुझा नंबर देखील ब्लॉक केला होता. तर तू दुसऱ्या नंबर वरून तिला फोन करून त्रास देतहोतास. आता बऱ्या बोलाने काय काय कसं कसं घडलं आणि आणि तू मृण्मयी सोबत हे दुष्कृत्य का केलंस हे सर्व खरं खरं सांग.आमच्याकडे तुला बोलतं करण्याचे अजूनही उपाय आहेत. आम्हाला ते उपाय वापरायला भाग पाडू नकोस. पटापट बोल." पोलीसनिरीक्षक प्रशांत दरडावून म्हणाले.


आपला गुन्हा कबूल केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे विशालला कळून चुकले.


"सांगतो साहेब मारू नका मृण्मयी आणि मी खूप वर्षापासून एकमेकांचे शेजारी आहोत. लहानपणी आम्ही एकत्र खेळलो एकत्रचलहानाचे मोठे झालो. पण जसं वयात आलो माझ्या मनात तिच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं. मी चोरून चोरून तिला स्पर्श करण्याचाप्रयत्न करायचो. पण तिला माझं असं स्पर्श करणं आवडायचं नाही. ती मला झिडकारून टाकायची. त्यामुळे कुठेतरी माझ्या पुरुषीअहंकाराला ठेच लागली आणि माझ्या मनात दिवसेंदिवस तिला मिळवायची इच्छा तीव्र होत गेली. मी रोज तिला फोन करायचो. रोजतिचा पाठलाग करायचो. पण ती मात्र माझ्याकडे सतत दुर्लक्ष करायची. तिने मला सगळीकडे ब्लॉक करून टाकलं, एवढेच नाही तरतिचा कॉलेजला जायचा रस्ता देखील तिने बदलला. वैतागून त्या दिवशी मी तिचं कॉलेज सुटायच्या वेळेत तिथे लपून उभा राहिलो आणितिथे कॉलेज सुटल्यावर तिच्या मागे मागे गेलो. कॉलेज पासून थोडे अंतरावर गेल्यावर मी तिला आवाज दिला. परंतु तिने मला साधीओळख देखील दाखवली नाही आणि पुढे पुढे चालत राहिली. मग माझं डोकं सटकलं. एवढा कसला माज! मग जाऊन सरळ तिचा हातपकडला आणि कमी वर्दळीच्या ठिकाणी घेऊन गेलो. तिथे गेल्यावर देखील माझे दोन शब्द ती ऐकून घेईना. तरी मी तिला माझ्यामनातलं बोलून दाखवलं. पण तिने माझ्या कानाखाली मारली. गप्प मी म्हणतो तसं ऐकलं असतं तर ह्या कानाचं त्या कानाला देखीलकळालं नसतं. पण तिला सभ्यपणाचा आव आणायचा होता. तिने माझ्या कानाखाली खेचल्यामुळे माझं डोकं फिरलं. अशी नाही ऐकततर मग मी जबरदस्ती करून माझी इच्छा पूर्ण केली. पण ती अजून ओरडायला लागली. पोलिसात जाईन मला धमकी द्यायला लागली. मग मी माझ्या बाईक मधलं पेट्रोल काढलं. तिच्या अंगावर टाकलं आणि दिली माचीसची काडी ओढून तिच्या अंगावर टाकली आणितिथून निघून गेलो."अरे नालायक माणसा तुझ्या क्षणिक हवसपायी तू एका निष्पाप जीवावर अत्याचार केलास आणि तिला मरणाच्या दारात नेऊन सोडलं. एवढं सर्व करून तुझ्या चेहऱ्यावर त्याचा जराही पश्चाताप नाही. तू माणूस नाही आहेस. हैवान आहेस हैवान.. मनात येतंय की आत्ताच्याआत्ता हे माझ्या हातात भरलेलं रिवाल्वर जसच्या तसं तुझ्या डोक्यात रिकामं करावं. पण कायद्याने आमचे हात बांधले आहेत. चल तुझाकबुली जवाब लिहून दे. "पोलीस निरीक्षक प्रशांत त्याला भरलेलं रिवाल्वर दाखवत म्हणाले.


हवालदार जाधवांनी विशालच्या समोर पेपर आणि पेन ठेवला. तेवढ्यात विशालने प्रशांत साहेबांच्या हातातील रिवाल्वर खेचून घेतलीआणि त्यांच्यावरच रोखली.


"मला जाऊ द्या सर."


"रिवाल्वर परत दे विशाल. तुला काय वाटलं तू इथून पळू शकशील. तू कुठेही गेलास तरी आम्ही तुला पकडून आणू आणि तुझ्याविरोधात इतके सबळ पुरावे आहेत की तुला शिक्षा होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही." प्रशांत साहेब तिथे हजर असणाऱ्या सबइन्स्पेक्टरकडचं रिवाल्वर हातात घेऊन विशाल वर रोखत म्हणाले.


"अरे हाट! कुणी माझ्या केसाला धक्का लावू शकत नाही" विशाल गुर्मीत म्हणाला.


"तू इथून जाऊ नाही शकत विशाल. तू जर इथून पळून जायचा प्रयत्न केला तर मी तुझ्यावर गोळी झाडेन." प्रशांत साहेब म्हणाले.


"तुम्ही काय माझ्यावर गोळी झाडताय. बघा मीच काय करतो आता." असं म्हणून विशालने प्रशांत साहेबांवर गोळी झाडली व ती गोळीप्रशांत साहेबांच्या दंडाला चाटून गेली. आता मात्र प्रशांत साहेबांनी हातातल्या रिवाल्वर मधली गोळी विशालच्या बरोबर कपाळावर नेमधरून मारली. विशाल जागीच कोसळला.


"याला उचला रे ! हॉस्पिटलला घेऊन चला." प्रशांत साहेब म्हणाले.


"साहेब तुम्हाला पण उपचारांची गरज आहे. तुमच्या हातातून रक्त येत आहे." हवालदार जाधव म्हणाले.


"काळजी नका करू जाधव. गोळी फक्त चाटून गेली. मृण्मयीला झालेला वेदनांच्या पुढे मला झालेल्या वेदना अगदीच क्षुल्लक आहेत." प्रशांत साहेब म्हणाले.


"साहेब राग येणार नसेल तर एक विचारू?" हवालदार जाधव म्हणाले.


"अहो जाधव विचारा की बिनधास्त!" प्रशांत साहेब म्हणाले.


"साहेब तुम्ही मुद्दाम विशालला रिवाल्वर दाखवलं ना." हवालदार जाधव यांनी विचारले.


"पोलिसांच्या हातातली बंदूक खेचून आरोपीने पोलिसांवरच गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल पोलीस निरीक्षक प्रशांत यांनीआरोपीवर गोळी चालवली आणि त्यातच आरोपीचा मृत्यू झाला. हे सर्वांनी डोक्यात फिक्स करून ठेवा आणि हेच घडलंय." पोलीसनिरीक्षक प्रशांत म्हणाले.

तसं तिथे असलेल्या सर्वांनी एका सुरात "येस सर!" असे म्हटले.


विशालला हॉस्पिटलला नेईपर्यंत वाटेतच त्याचा मृत्यू झाला.


सरकारी हॉस्पिटलमध्ये पोलीस निरीक्षक प्रशांत यांनी जखमेवर डॉक्टरांकडून मलमपट्टी करून घेतली. मलमपट्टी केल्यानंतर प्रशांतसाहेब सरळ मृण्मयीच्या रूममध्ये गेले. तिथे गेल्यावर प्रशांत साहेबांना मृण्मयीचे आई-बाबा विचारू लागले.


"इन्स्पेक्टर साहेब नक्की काय झालं ? तुम्ही विशालला का घेऊन गेला होता. आणि तुमच्या हाताला काय झालं आहे ."


"विशाल!!! तोच खरा गुन्हेगार आहे मृण्मयीचा. त्याचाच आता एन्काऊंटर झाला आहे. त्याने माझ्यावर गोळी झाडली. त्याला उत्तरम्हणून मी त्याच्यावर गोळी झाडली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला." प्रशांत साहेबांनी विशालने मृण्मयीला कसा त्रास दिला सर्व काहीसांगितले.


"देवा परमेश्वरा ! कोणावर विश्वास ठेवायचा आजकालच्या दुनियेत. जे विश्वासाचे वाटतात तेच केसाने गळा कापतात हल्ली. कधीवाटलं नव्हतं विशाल असं करेल. त्या नालायकाने माझ्या पोरीची काय अवस्था करून ठेवली आहे. नालायकाच्या आत्म्याला शांतीलाभणार नाही. भटकत राहील तो मोक्षप्राप्तीसाठी पण त्याला मोक्ष मिळणार नाही." मृण्मयीची आई रडून रडून बोलू लागली.


"शांत हो ! त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली आहे. वाईट आपल्या लेकीचं वाटतं की तिचा काही दोष नसताना ती एवढ्या मरणयातना सहन करतेय." मृण्मयीचे बाबा तिच्या आईला सावरत म्हणाले.


मृण्मयीची आई मृण्मयीजवळ गेली आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली" मृण्मयी बाळा! शेवटी तुझ्या गुन्हेगाराला मृत्यूचीशिक्षा मिळाली. तुझा गुन्हेगार हे जग सोडून गेला आहे. तो नालायक विशाल मेला आहे. देवाने न्याय केला."


आईचं बोलणं मृण्मयीने ऐकलं आणि मरण यातनेने त्रासलेल्या तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले.


"अहो! बघा इतके दिवस वेदनेने व्हिवळणारी आपली लेक आज हसली. किती दिवसांनी मी माझ्या गोडुलीच्या चेहऱ्यावर हसू बघितलंय. साहेब तुम्ही पण बघा. ए बाळा ... मृण्मयी!!!" मृण्मयीची आई तिला हाक मारू लागली.


परंतु मृण्मयीचा प्रतिसाद बंद झाला होता. तिचे आई-वडील घाबरले. प्रशांत साहेबांनी डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी तिला तपासलं आणि म्हणाले.


"मुक्त झाली ती या मरण यातनेतून. हसता हसता जीव गेला तिचा. मरनयातनेने व्हिवळणारी मृण्मयी.. जाताना ती शेवटचं हसली. "


लेखिका - माधवी पंकज

जिल्हा - ठाणे

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

माधवी

House Wife

I Am Special

//