Feb 23, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

आणि भेटायच राहूनच गेलं

Read Later
आणि भेटायच राहूनच गेलंत्याची आणि तिची ओळख फेसबुकवर झाली. त्याचे नाव रोहित आणि तिचे रुपाली. तो सांगलीत राहत असे आणि ती तिथेच एका शेजारच्या गावात मिरजला राहत असे. आधी ते फेसबुकवर बोलत असत नंतर त्यांच्या मोबाईल नंबरची अदलाबदली झाली. मग ते फोनवर बोलू लागले. व्हीडिओ कॉल वर बोलत होते पहिला तर एक मित्र मैत्रीण म्हणून बोलत होते. तो तिच्याशी पहिला चॅटिंगवर बोलत होते. मग एकदा ती त्याला म्हणते की बघू तरी तुम्ही कसे दिसता? पाठवा तुमचा एक फोटो. मग त्याने तिला त्याचे काही निवडक फोटो पाठवले. असंच बोलता बोलता त्यांच्यात घट्ट मैत्री होते. मग तिने त्याला फोन केला तेव्हा तो तिच्या आवाजाच्या प्रेमातच पडला. रोहित रुपालीच्या समोर आपल्या प्रेमाची काबुली देतो. तो रुपालीला म्हणतो की तू मला होकार दे किंवा नकार दे मी तुला कधी एकटे सोडणार नाही. तिने वेळ घेतला मग ते दोघे भेटायच ठरवतात. ठरल्याप्रमाणे ती त्याला भेटायला जाते. ती तिच्या गावातून म्हणजे मिरजहून सांगलीला जाते. आता ती सांगलीच्या बस स्टँडवर पोहोचते. एसटीमधून बाहेर पडताना तिला विचार करत असते की रोहितला आपण आज पहिल्यांदा भेटणार आहे त्यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल. त्यावेळी तो तिची वाट बघत उभा असतो. तिने तोंडाला स्कार्फ बांधलेला असतो तरीही तो तिला ओळखतो, कारण खूप प्रेम करत असतो तो तिच्यावर.
त्याची स्कूटी असते. ते दोघे त्याच्या स्कूटीवर बसले आणि गणपतीचे दर्शन घेऊन मंदिरातून निघाले. त्यानंतर ते हरीपुरला गेले. तिथे गेल्यावर तिने आपला स्कार्फ काढला आणि त्याच्यासमोर आली. तिचे ते पाठीवरती ओघळणारे काळेभोर केस,तिचे ते घारे डोळे, गुलाबी गाल, तिने ओठांवर मस्त लाल रंगाची लिपस्टिक लावलेली होती तिचे ते रूप पाहून तो तर तिच्याकडेच बघत राहिला एका क्षणी त्याला असे वाटले की तिला आपल्या मिठीत घ्यावी आणि तिला कधी आपल्या मिठीतून सोडूच नये. त्याच्या मनात हा विचार चालू असताना तिने त्याची तंद्री भंग केली आणि बोलली की, "रोहित कुठे हरवला तू?" त्यावर त्याने उत्तर दिले की काही नाही गं असचं विचार करत होतो.
मग अजून थोडे पुढे गेल्यावर तिथल्या बागेत जाऊन बसले. बोलताना तिला जोराचा ठसका लागला. रोहितने तिला पाणी दिले. मग तिथूनच एका चहावाल्याकडून साखर आणली आणि तिला दिली. मग तिला शांत केले. पावसात भिजलेली ती अगदीच सुंदर दिसत होती त्याला. तिथून ते तिथल्या बागेत जाऊन बसले. बागेत जास्त कोणी नव्हते त्यामुळे त्याला तिच्यासमोर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आरामदायक वाटत होते. तिथे त्याने तिला एक गुलाबाचे फूल दिले आणि आपले प्रेम व्यक्त केले. आणि तिला आवडते म्हणून एक खूप छान घड्याळ घेऊन आला होता. ते त्याने तिला भेट म्हणून दिले. तिला गुलाबाचे फूल देताना तो गुडघ्यावर बसला आणि म्हणाला रुपाली माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे देशील का साथ मला आयुष्यभर? तेव्हा तिने ही त्याला होकार दिला. आता निसर्गाला ही वाटले असावे ह्या दोघांनी आपले प्रेम व्यक्‍त केले एकमेकांसमोर तर आपणही वातावरण जरा करावं म्हणून निसर्ग देवतेने पाऊस पडला. त्यामुळे वातावरण इतकं रोमांचक झाल होते की ते दोघे एकमेकांच्या प्रेमात तर होतेच पण आता ते एकमेकांच्या मिठीत होते. तिथे त्यांना कोणी डिस्टर्ब करायला नव्हते. तिथे ते खूप वेळ बसले. आता ते तिथून घरी जायला निघणार की ईतक्यात खूप जोराचा पाऊस आला म्हणून ते दोघे एका चहाच्या टपरीवर थांबले होते तर तिथे एक मस्त हिंदी गाणं वाजत होते.

रिम झिम रिम झिम रुन झुन रुन झून
भीगीं भीगीं ऋत में हम तुम तुम हम

थोडा पाऊस कमी झाल्यावर ते तिथून निघाले. येताना अजून थोडे भिजले. ती त्याला गाडीवर मिठी मारून बसली होती. रोहितने तिला आपले जॅकेट दिले कारण ती जास्त पावसात भिजली तर आजारी पडेल. तो तिला बस स्टँडवर घेऊन आला. तिच्या गावची बस लागली होती ती त्यात बसली तेव्हा तो तिच्याकडे बघत होता. बस सुरू झाली आणि ती तिथून गेली.
त्या दोघांना अजून एकमेकांसोबत वेळ घालवायचा होता पण अचानक पाऊस आल्याने त्या दोघांची पहिली भेट अपूर्णच राहिली.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

@swapallu

Blogger

✍️Intention is very important in every action in my life ✍️

//