Login

आनंद शोधते आनंदात तुझ्या...

तुझ्या आनंदात...
तुझ्या आनंदात
आनंद मी शोधते
तू असता सुखी
मी ही सुखी राहते...

जेव्हा हसतो तू
लहरीत आनंदाच्या
समाधान जागते
कोपर्‍यात मनाच्या...

नाही भागीदार फक्त
तुझ्या आनंदाची
नेहमीच सोसत राहीन
झळ तुझ्या दुःखाची...

असता तू आनंदी
जग हे आनंदी भासे
टाकू नकोस देवा
कधी दुःखाचे फासे...

व्यक्त होत जा
हक्काने जवळ माझ्या
मी ही शोधते आनंद
आनंदात तुझ्या...