आम्हीच आमचे शिल्पकार - कविता

आम्हीच आमचे शिल्पकार
कवितेचे नाव- आम्हीच आमचे शिल्पकार

कवितेचा विषय - मी माझा शिल्पकार

जिल्हास्तरीय कविता स्पर्धा फेरी - २

आम्ही सगळ्यांसाठी केले रान जीवाचे
तरी आमचे प्रेम कवडीमोलाचे
सारं काही विसरून नातेवाईक उलटले
आमचे मार्ग मग आम्ही निवडले
पण जिव्हारी लागले फार
आम्हीच आमचे शिल्पकार

देव देव करत
आम्ही स्तोम नाही माजवत
कोणी मागितला मदतीचा हात
बघत नाही गरीब सावकार
माणुसकीधर्माचा आम्ही करतो प्रचार
आम्हीच आमचे शिल्पकार

नाही आमच्याकडे अंधश्रद्धेला थारा
नाही मानत आम्ही जाचक रुढीपरंपरा
नाही जपत मासिकधर्माचार
मातापित्यांचे श्राद्ध घालण्यापेक्षा
त्यांना जिवंतपणी द्या आधार
आम्हीच आमचे शिल्पकार

असत्याची नाही धरत कास
प्रामाणिकपणे हाकतो जीवनप्रवास
नाही सहन होत कोणावरील अत्याचार
जपतो उदारमतवादी विचार
आम्हीच घडवले आमच्यावर संस्कार
आम्हीच आमचे शिल्पकार

सौ. नेहा उजाळे

ठाणे जिल्हा विभाग