आळशी पिंड भाग 2

marathi blog

तर अशी ही आपली 'आळशी पिंड' सोनी.  झाल काय की सोनी या आळशीपणामुळे लोकांपासून हळूहळू तुटत गेली. तिचा अबोलपणा वाढतच गेला. स्वतःतच मग्न होत गेली ती. आता 'आळशी पिंड' सोबत  'घुमी' असेही बिरुद लागले तिला .

एके दिवशी झाले काय, कसे कुणास ठाऊक पण एक कुत्र्याचे पिल्लू गाडीखाली येणार तोच आपल्या सोनीने त्याला वाचविले आणि घरी आणले.  ते मुके जनावर सतत सोनीची सोबत करु लागल, जीव वाचविल्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हाच एक मार्ग होता त्याच्या जवळ.

 सतत इकडून तिकडे अस सुरु असायच त्या पिल्लाच. जरा कुठे खुट्ट झाल की तो कान टवकारुन वेगात पळायचा. सोनीने त्याच नाव ठेवल 'फास्टर'. सोनी जरा पहुडली की फास्टर तिची चादर ओढायचा,  सतत तिच्या कानाशी कुई-कुई आवाज करायचा. 

एकदा अशीच आळसावलेली सोनी मस्त ताणून दयायच्या विचारात होती आणि फास्टर आला कुईकुई करत तिच्या जवळ. अचानक सोनीला जाणवले की फास्टर काहीतरी सांगतोय तिला, तिने त्याच्या कडे निरखून बघितले तर तिला जाणवले फास्टर म्हणतोय 'ऐ, झोपतेस काय यावेळेस? चल आपण खेळू.' तिला वाटले आपल्याला भास झाला असेल. पण असे वारंवार होत गेले. सकाळी सकाळी तो जणू काही आर्जव करायचा, 'चल ना ग बाहेर फिरुन येऊ'.  सोनीचे डोळे जणू खाडकन उघडलेच.  फास्टर ला काय म्हणायचे आहे ते तिला समजत होत. त्याच्या भावना वाचता येत होत्या.

आता एक नवा छंदच लागला तिला. रस्त्यावरची कुत्री, मांजरे यांच्याशी संवाद साधण्याचा. शेवटी हितगुज म्हणजे तरी काय जिवीचे सांगणेच. जमायला लागले ते तिला. रमायला पण लागली सोनी त्यात. माणसांपेक्षा या मुक्या जीवांशी बोलणे आवडे तिला. प्राण्यांना कळत तुमच्या मनात काय चाललय ते तसेच तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हालाही कळत त्यांच्या मनातल.

या छंदामुळे तिच्यात उत्साह संचारला. आळस तर पार पळालाच कारण तिला असे काही गवसले होते जिथे नव्हती स्पर्धा, असुया, मानापमान तर होते फक्त आणि फक्त निरपेक्ष प्रेम. आता तिला दिवस पुरेनासा झाला. 

पुढील भागात बघुया Animal Cummunicator म्हणून  सुरु झालेला सोनीचा प्रवास.

🎭 Series Post

View all