आळशी कुठली

AAlshi Kuthli
सीमा आज माझी सुट्टी आहे ,आज ना मी खूप आराम करणार आहे, आज हे पण घरी नाहीत,चिऊ पण राधा कडे गेली आहे...मग मी आज ठरवलंय आरामच आराम करायचा नुसता आराम आणि वाटलं तर आवडीचे एखादे पुस्तक वाचणार ." कविता आपल्या मैत्रिणीला सांगत होती

आज कविताला सुट्टी होतीच त्यात आज घरी कोणी ही नव्हते..तिचा नवरा ही बाहेर गेला होता आणि मुलगी ही मावशीकडे गेली होती... आज फक्त आराम करायचा हे तिने ठरवले होते...नाहीतर दरवेळी सासूबाई असल्या की तिला जरा ही आराम म्हणून नसायचा...ऑफिस आणि घर,या इ सुट्टी असली की सगळ्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करण्यातच वेळ जाई... मग दिवसभर शिणलेली ती जरा उसंत म्हणून झोपायला गेली तर लगेच मुलं आणि सासूबाई तिला आवाज देऊन उठवत...अर्ध्या झोपेत उठावे आणि परत कामाला लागे...

सासूबाई मात्र खूप कडक त्यांना सतत काही ना काही हाताशी लागायचे,पुस्तक, पाणी, चहा, रिमोट, मग कधी माळ आणि नेमके त्यांना कुठे काय ठेवले हे आठवत नसत,मग कोण असायचे हक्कच तर सून बाई, जोपर्यंत ती येऊन हातात काही देत नाही तोपर्यंत कटकट असायची..अग कविता माझे मोजे कुठय, माझी काठी कुठेय, मला जरा शेक घ्यायचा आहे पाठीला मला पाणी गरम करून दे, ती पूजेची पुस्तक दे, असे सारखे काही ना काही चालूच असायचे..कविता मात्र जणू त्यांच्या दिमतीला असायची सारखी...नवरा सांगूनच गेला होता माझी आई जे सांगेन ते तिच्या जवळ ठेव..अति लाडावून ठेवू नकोस आईला नाहीतर तुझा पिच्छा सोडणार नाही ती...आणि तू देत राहिलीस तर तुला जरा ही आराम मिळणार नाही...


कविता नवऱ्याचा ह्या सांगण्याचा मनावर न घेता सासूच्या हर एक गोष्टी कडे तिचे कर्तव्य म्हणून बघत, पण ते जरा अति होत होते हे तिला ही काही दिवसांनी समजले...आता तिला ही वया नुसार झेपत नाही...जितकी धावपळ होते तितका आराम ही हवा म्हणजे जोमाने काम ही होतील...

कविता,अग तू खूप दमतेस तुला आता आधी सारखी धावपळ होत नाही तू उगाच नको तिथे आईच्या पुढे पुढे करत जाऊ नकोस ,कधी कधी नकार ,किंवा नाही म्हणायला शिक, अगदीच तूच केले पाहिजे असे ही नाही, कधी कधी समोर वस्तू असते आणि ती घेऊ शकते पण ती तुलाच बोलवते हे तिच्यासाठी ही बरोबर नाही आणि तुझ्या साठी ही.. तू थकत असतेस, थकलेली असतेस, आणि तिची जरा ही हालचाल होत नाही हे दोघींसाठी ही योग्य नाही, तू जरा काही दिवस आराम कर मी आईला दादाकडे सोडून येणार आहे...आधी जशी तू आळशी पणा करायची तेव्हा त्या निमित्ताने तुझा आराम व्हायचा आणि आता आई तुला नको ते बोलून गेली, तुझी गार्हाणे सगळी कडे करत राहिली तर तू तुझा स्वतःचा विचारच करणे सोडून दिले आहेस.. म्हणू दे तिला तू आळशी कुठली पण आराम तुला ही महत्वाचा आहे...कविताचा नवरा समजदार होता ,त्याला तिची होणारी दगदग ,त्यातून तिला होणारा त्रास जाणवत होता.. त्यात आईचा स्वभाव हेकेखोर हे माहीत होते...

कविता, "आहो होईल आराम पण मला फार काही जास्त आराम नको मी हा एक दिवस आराम केला तरी मी energetic फिल करेन, हो पण आईना दादाकडे असा आळशीपणा नाही भोगायला मिळणार, वहिनी नाही लक्ष देऊ शकणार त्यांच्या कडे...जास्तीतजास्त दोनचार दिवस राहू द्या पण त्यांना पुन्हा घरी घेऊन या...नाहीतर मी खरच आळशी होईल..त्या आहेत तर थोडं चपळपणा आणते कुठंही पण जर त्या नसतीलतर मुलांना ही घरी करमणार नाही.."


बघ बाई नाहीतर आई पुन्हा सांगत बसायची माझी सून सगळ्या दुनियेची आळशी आहे ,चालेल ना..?

माझी काही हरकत नाही, हो पण मला हे दोन दिवस टोटल आळशीपणा हवाय ,अगदी कोणी ही तो भंग करणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे,...कविता नवऱ्याला हसत सांगत होती..

कधी कधी बायकांनी ही आपला असा हक्काचा ,आरमाचा,आळशी होण्यासाठी चा एक दिवस राखून ठेवायला हवा...नेहमीच ती धावपळ, सगळ्यांसाठी सतत हरज रहाणे, गुणी होऊन रहाणे यात मज्जा नाही, थोडा स्वतःचा ही लाड पुरवावा... काय बरोबर ना...?म्हणूद्या कोणी ही खुशाल मग आळशी कुठली..
©®अनुराधा आंधळे पालवे