आशेचा किरण

आशेचा किरण घेऊन आलेली नवी पहाट
आली नवी पहाट

आशेचा किरणांनी सजून
आली नवी पहाट
आनंद मनामध्ये झाला
सरली सारी धुळवाट

सोडून देऊ कटू आठवणी
नव्याने आयुष्य सुरु करु
नवीन दिवसासोबत
उत्साहाची कास धरू

झाल्या जखमा खोलवर
त्यांना विसरुन जाऊन
आनंदाचे सोहाळे करु
हर्ष उल्हासीत होऊन

ऋणानुबंध आपले जपू
साथ एकमेकांना देऊया
सुख समाधानाने राहून
जीवन सार्थकी लावुया

©® परवीन कौसर
बेंगलोर