आली नवी पहाट.....

आली नवी पहाट इडा पिडा जाऊदे


बांधावरती बसून देवा
मारू किती हाका
लई दुःख दिलं
आता अंत पाहू नका

बंद केलं जग सारं
पाहुण्या कोरूना ने येऊन
राहिलं सायलं समदं
गेला ओला दुष्काळ घेऊन

साल सरलं मागं पडलं
व्हायचं ते होऊन गेलं गेलं
आस मनात लागून राहिली
आता नक्की होणार भलं

आली नवी पहाट
आता इडा पिडा जाऊदे
बळीराजाचा घरात
धनधान्य भरून वाहू दे
Khushi kamble