आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 5

समलैंगिक प्रेमकथा
# उत्सव नात्यांचा थीमवर आधारित

आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 5

यश हिरव्या टीशर्टमध्ये खूप हँडसम दिसत होता. मी लगेच बेडरूमचे दार लावून त्याच्या घट्ट मिठीत शिरलो.

" थँक्स इकडची स्वारी ! दीदीला मस्त समजवले. आज मस्तपैकी सॉर्ट आउट झाले त्यांचे !" मी म्हणालो.

" माझे गिफ्ट ?" यश जवळ येत म्हणाला.

मी त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. आम्ही एकमेकांच्या मिठीत विरघळलो.

दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी होती. मी आणि यशने प्लॅन केला की सर्वाना गिफ्ट्स द्यायची. आम्ही गिफ्ट आणायला बाहेर पडलो आणि घरी रौनकचे वेगळे प्रताप सुरू झाले. आईने त्याला सांगितले की मी लहानपणी किल्ले बनवायचो म्हणून त्याने पण यशच्या पप्पासोबत किल्ले बनवण्याचा घाट घातला. मी सर्वांसाठी गिफ्ट्स घेऊन घरी आलो. गार्डनमध्येच मला दादी रौनक आणि यशच्या पप्पाना ओरडताना दिसली. दोघांचे अंग चिखलाने माखले होते.

" डुग्गू तर लहान आहे. पण तू साठ वर्षाचा म्हातारा असून चिखलात खेळतो ?" दादीने रागाने भरलेला एक बाण यशच्या वडिलांवर टाकला.

" दादी , माझ्या आजोबांना म्हातारा म्हणायचे नाही. " रौनक ओरडला.

मी आणि यश दुरूनच हे दृश्य पाहून हसत होतो. नंतर आम्ही जवळ गेलो.

" हे बघ ना पार्थ. आजोबा नातवाने मिळून गार्डनची काय हालत केली ?" दादी त्रासिक मुद्रा करत मला म्हणाली.

मी क्षणभर भूतकाळात हरवलो. आजोबांसोबत मी पण असेच किल्ले बनवायचो. आईला अजिबात आवडायचे नाही पण आजोबांना काही बोलण्याची तिच्यात हिंमत नव्हती.

" रौनक , कोणता किल्ला बनवला आहे तू ?" मी विचारले.

" बाबा , मी चित्तोड आणि रायगड बनवला आहे. " रौनक अभिमानाने म्हणाला.

रौनकने मातीचे दोन ढीग रचले होते. त्याच्यावर दोन किल्ले बनवले होते.

" सकाळपासून उद्योग सुरू आहे. काल रात्रीच दोघांनी जुन्या रजिस्टरचे कव्हर , पुष्ठे , बॉक्सेस , पेंट सर्वकाही जमा करून ठेवले होते. " दादी म्हणाली.

यशच्या पप्पांचा चेहरा तर टिचर रागवल्यावर लहान मुलाचा होतो तसा झाला होता.

" पण रौनक , तुला हे कुणी शिकवले ?" यश म्हणाला.

" पप्पा आजकाल युट्युबवर सर्वकाही भेटते. मी रायगडसाठी ब्लॅक पेंट युज केलाय आणि चित्तोडसाठी गोल्डन. आणि आम्ही सिंहासनपण बनवले आहे. तोफखाना सर्वात वरती ठेवल्या आहेत म्हणजे शत्रू आले की लगेच धडलधडल तो तिथेच मरून जाईल. आत पाणी आहे ते तुम्हाला वाटत असेल मी चुकून सांडले पण ती विहीर आहे. म्हणजे आत राहणाऱ्या लोकांना तहान नको ना लागायला. " रौनक खूप उत्साहाने सर्वकाही सांगत होता. मी आणि यश सर्वकाही मन लावून ऐकत होतो. दादी डोके आपटून घरी गेली.

" व्हेरी गुड बेटा. खूप सुंदर किल्ले बनवले आहेस तू. प्राउड ऑफ यु. आता आम्ही थोडे डेकोरेट करतो. पप्पा तुम्ही फ्रेश व्हा आणि जेवण करून आराम करा. " यश पप्पांना म्हणाला.

" नाही मला पबजी खेळायचे आहे आणि डुग्गूला हरवायचे आहे. " पप्पा म्हणाले.

" आजोबा , मला कुणीच हरवू शकत नाही. आज तर तुमची हॅटट्रिक होणार हरण्याची!" रौनक इतके म्हणून पळाला.

" बदमाश !" आजोबा त्याच्या मागे त्याला मारायला पळाले.

मी आणि यशने किल्ला अजून डेकोरेट केला.

" नकटु , काय झाले ? तू मध्येच युट्यूबसारखे बफरिंग का होतो ?" यश म्हणाला.

" अरे आजोबांची आठवण आली माझ्या. आम्ही लहानपणी असाच प्रतापगड रायगड बनवायचो. " मी म्हणलो.

" कोई नि. आज आपला मुलगा डेन्मार्कमध्ये राहूनही किल्ले बनवतोय ही किती अभिमानाची गोष्ट आहे. नाही का ? " यश म्हणाला.

" हो यशू. चल सेल्फी काढू किल्ल्यासोबत. पोस्ट पण करू. माझ्या डुग्गूने बनवलेला पहिला किल्ला. या छोट्या मावळ्याला वरतून आजोबा नक्कीच आशीर्वाद देत असतील. " मी म्हणालो.

आम्ही सेल्फी काढली. लगेच रौनक आणि यशचे पप्पा पण सेल्फीत घुसले.

मग घरी धनत्रयोदशीची पूजा होती. आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी धनत्रयोदशी / धनतेरस हा सण साजरा केला जातो. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी लक्ष्मी मातेसोबत पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

धनत्रयोदशी या सणामागे अजून एक दंतकथाही आहे. असे म्हणतात की हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगुन जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अश्याप्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणुनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधि होण्याचा संभव नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

भारतात काही ठिकाणी धनतेरसच्या दिवशी लोक सोने-चांदीची भांडी, नाणी, आभूषण इ. खरेदी करतात. असो.

दादीच्या इच्छेनुसार माझ्या आणि यशच्या हातून पार पाडली. संध्याकाळी झाडूची पूजा करून तिथे आम्ही तिथे पेटता दिवा ठेवला. हॉलमध्ये घरचे सर्वजण जमा झाले. सर्वाना आधीच वॉर्निंग दिली होती की गिफ्ट फक्त आम्हीच खरेदी करणार. त्यामुळे जो तो खूप उत्सुक होता की त्याला कोणते गिफ्ट भेटणार.

" सो गाईज , सर्वांच्या आवडीनिवडीनुसार आम्ही काही गिफ्ट्स आणली आहेत. " यश म्हणाला.

" आधी माझे गिफ्ट. मी सर्वात मोठी आहे. " दादी म्हणाली.

" अरे हे काय ? सर्वात छोटा मी आहे तर मला आधी गिफ्ट भेटायला हवे. " रौनक चिडला.

" सर्वात क्युट मी आहे. सो आधी मला. " प्रीती म्हणाली.

" क्युट नाही इरीटेंटिंग आहेस तू. " पुष्कर हळू आवाजात म्हणाला.

" काय बोललास ? बघतेच तुला. " प्रीती रागाने पुष्करला म्हणाली.

सर्वजण हसले.

" अरे प्लिज शांत व्हा. सर्वाना गिफ्ट भेटतील. " मी म्हणालो.

" महेशजीजू , आधी तुम्हाला गिफ्ट. हे प्रोटिन शेक आणि जिमचे शूज. तुमचे वजन खूप वाढले आहे. त्यामुळे आता रोज जिम आणि प्रोटिन. " यश म्हणाला.

" छान गिफ्ट दिले यश. आता बघतेच पुढच्या दिवाळीपर्यंत हाथी भाईचे पोपटलाल कसे बनत नाहीत ते. " निवूदी म्हणाली.

" हे प्रोटिन शेक माझ्या मसालेदार पदार्थांवर ताव मारण्याच्या सवयीवर शेक करेल वाटते. " महेश जीजू म्हणाले.

" नकटु , एक एक्सट्रा प्रोटिन शेक तुझ्यासाठी पण घेतला आहे बर. डेन्मार्कला स्ट्रिकट डाएट आहे लक्षात आहे ना ?" यशू माझ्या कानात म्हणाला.

मी त्याच्याकडे रागाने बघितले. नंतर अद्वैतकडे वळलो.

" ही पेन मला माझ्या आजोबांनी दिली होती दहावीच्या परीक्षेवेळी. मला नायनटी सेव्हन पडले होते. ही पेन तुझ्या दहावीच्या वेळेस तुला देतोय. ऑल द बेस्ट. " मी अद्वैतच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो.

" थँक्स मामा. मी माझे फुल इफर्ट देईल आणि फोकस करून अभ्यास करेल. " अद्वैत मला मिठी मारत म्हणाला.

" आई , हे ज्ञानेश्वरी तुझ्यासाठी !" यश माझ्या आईला म्हणाला.

" खूप धन्यवाद तुमचे !" आई म्हणाली.

" माझ्या बहिणींसाठी हिऱ्याचे कानातले !" मी निवेदितादी आणि प्रीतीला म्हणालो.

प्रीतीने तर लगेच सेल्फी काढून पोस्टपण केली. ती खूप खुश होती. निवूदी पण खूप आनंदी होती.

" छोटे , तुझ्यासाठी लेटेस्ट स्मार्टफोन. " यश पुष्करला म्हणाला.

" व्वा भाई. अनफोल्ड गॅलकसी लेटेस्ट मॉडेल. थँक्स भाई. " पुष्करने यशला मिठी मारली.

" पप्पा , तुमच्यासाठी आयुर्वेदिक तेल आणले आहे. तुम्ही सांगत नाही पण तुमचे गुडघे दुखतात माहिती आहे आम्हाला. आता दिवाळी संपेपर्यंत आम्ही रोज मालिश करणार तुमची !" मी म्हणालो.

" थँक्स बेटा!" यशचे पप्पा म्हणाले.

" अरे डुग्गू आणि दादी कुठे गेले ?" यश म्हणाला.

खूपवेळ शोधल्यावर दोघे गच्चीवर आढळले.

" दादी , मी तर लहान आहे पण तू मोठी असून तुला गिफ्ट आधी नाही दिले. " रौनक हळू आवाजात म्हणाला.

" बघ ना. आता मी बोलतच नाही. " दादी नाक मुरडत लटक्या स्वरात म्हणाली.

" दादी , खाली चल ना!" मी म्हणालो.

" दादी , कुणाशीच बोलणार नाही. डिस्टर्ब नका करू." रौनक म्हणजे दादीचा प्रतिनिधी मला म्हणाला.

मला टेन्शन आले पण यशने इशाऱ्यानेच मी सांभाळतो असे म्हणले.

" ही नारंगी पैठणी कुणाला नकोय का ? आणि हे व्हिडिओ गेम आणले होते पण जाऊदे पार्थ आपण कुणाला दुसऱ्याला देऊ. " यश मोठ्याने ओरडला.

" मला व्हिडीओ गेम पाहिजे. दादी रुसलीय मी नाही." रौनक लगेच ओरडला.

" ठिके. ही पैठणी कामवाल्या बाईला देतो. " यश म्हणाला.

" खबरदार जर माझ्या साडीला हात जरी लावला तर." दादी उठून उभी राहिली.

मी आणि यशसमवेत सर्वजण हसले. रात्री मस्त पावभाजीचा बेत होता. गरम गरम पावभाजी खाऊन आम्ही झोपी गेलो.

क्रमश..

🎭 Series Post

View all