आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 11

समलैंगिक प्रेमकथा
आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 11

गमुचे घरी अनपेक्षितपणे जंगी स्वागत झाले. दादीने दारातच आमचे औक्षण केले. रौनक पण खूप खुश होता.

" वाह पप्पा , हे बेबी किती क्युट आहे ना !" रौनक बाळाला बघून खूप खुश झाला.

" ऐन लक्ष्मीपूजनला मुलगी सापडली आहे. देवीचा प्रसादच आहे. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घरी आलीय. मला ही लक्ष्मीची पावले नोंदवून ठेवायची आहेत. " दादी आनंदाने म्हणली.

मग प्रीतीने एक मोठा कार्डबोर्ड आणला. एका ताटलीत पाण्यात कुंकू मिसळले होते. दादीने गमुचे पाय त्या ताटलीत बुडवून तिच्या हातापायांचे ठशे कागदावर उमटवले.

" हे फ्रेम करून ठेव !" दादी प्रीतीला म्हणली.

" आता तुम्ही फ्रेश व्हा. नाश्ता करा. आणि आराम करा !" यशचे वडील म्हणाले.

घरी सर्वांमध्ये गमुला घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली. त्यादिवशी पाडवा होता. माझ्या आईने शेणाने पाच पांडव आणि एक द्रौपदी बनवले. प्रीती-पुष्करने त्याची पूजा केली. दिवाळीत येणारी ही तिथी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा असे म्हणतात. या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन अनाठायी औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीराजाला कपटाने जमिनीत म्हणजे पाताळात गाडले. बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले अशी आख्यायिका आहे. बलिप्रतिपदेतला बळिराजा हा शेतकरी राजा होता. त्याला तीन पावले जमिन दान स्वरुपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले. हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी म्हण रूढ आहे. पौराणिक महत्व असलेला आणि कृषिप्रधान संस्कृतीचं प्रतिबिंब दाखवणारा कार्तिक महिन्याचा हा आरंभदिन आणखीही एका दृष्टीनं महत्वाचा आहे . परंपरेनुसार पती आणि पत्नी यांनी परस्परांविषयी कृतज्ञता व्यक्त करून आपल्या नात्याला एक नवं , अर्थपूर्ण वळण देण्याचा हा दिवस आहे .यादिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात. दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. त्यांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता इत्यादी वाहून त्यांची पूजा होते.
असो. गमुला दादीकडे सोपवून यश बाहेर गेला. थोड्यावेळाने त्याने गमूसाठी नवीन कपडे आणि खेळण्या आणल्या. यश खूप हौशेने गमूसाठी करत होता. गमूपण यशकडे गेल्यावर लगेच शांत व्हायची. बेडरूममध्ये यश गमुचे डायपर बदलत होता. रौनक आणि पुष्कर पण सोबत बसले होते.

" उफ. आता मी माझ्या गमुचे डायपर बदलणार आणि मग मी प्रिन्सेसला नवीन कपडे घालणार. " यश लडिवाळपणे गमुला म्हणाला.

" पप्पा , मी पण लहानपणी पॉटी करायचो ?" रौनकने विचारले.

" बेटा सर्वच करतात. " यश म्हणाला.

" दादा , तुला हे घाण नाही वाटत ?" पुष्करने विचारले.

" यार यात घाण काय ? सुरुवातीला वाटायचे ऑड पण बाळाची गोड स्माईल पाहीली की खूप छान फिलिंग येते. आणि आपल्याही आईवडीलांनी कधीतरी हे केलेच असेल. पुन्हा मोठेपणी भांडायला पॉईंट भेटतो की आम्ही लहानपणी तुमचे डायपर बदललेत म्हणून. " यश म्हणाला.

सर्वजण हसले. दूरून निवेदितादिदी हे सर्व पाहत होती. तिने मला तिच्या खोलीत बोलावले.

" काय झाले दीदी ? अद्वैतसोबत काही बिनसले का ?" मी विचारले.

" नाही. यशसोबत काहीतरी बिनसले आहे असे वाटत आहे मला. " निवूदी म्हणाली.

" म्हणजे ?" मी विचारले.

" तो गमुसोबत जास्तच गुंततोय अस वाटतय मला. आठवते ना दिल्लीत काय झाले ते ? आम्हाला परत तुम्हाला रडताना नाही बघायचे. " निवेदितादी म्हणाली.

" दीदी , तुझे म्हणणे पटत आहे मला. पण यशला आधीपासूनच मुली खूप आवडतात. दिल्लीत एक काव्या नावाची मुलगी होती तिच्यावरही असाच जीव लावला होता त्याने. तरीही मी समजवतो यशला. आज न उद्या गमुचे आईवडील येतीलच. तेव्हा यशला त्रास नको व्हायला. " मी म्हणालो.

रात्री मी माझ्या बेडरूममध्ये गेलो. यश गमूसोबत खेळत होता. त्याच्या हातात गिटार होती.

" आज माझ्यासाठी गाणे गाणारे का ?" मी विचारले.

" नाही. माझ्या प्रिन्सेस गमूसाठी. गमूला माझे गायलेले गीत खूप आवडते. " यश म्हणाला.

" काही पण. " मी म्हणालो.

" अरे खरच. थांब. " यश म्हणाला.

यशने " ओ मेरी जान " गाणे गायले. तेव्हा गमू खळखळून हसू लागली.

" यश , छान केमिस्ट्री जुळली आहे दोघांमध्ये. पोलीस काही म्हणले का ?" मी विचारले.

" नाही. " यश म्हणाला.

" यश , जरा स्पष्टच म्हणतो. तुझा गमुवर फार जीव आहे ते कळत आहे मला. पण उद्या हिचे खरे आईवडील आले तर प्लिज तू इमोशनल नको होऊ. " मी धाडस करून बोललो.

यशने एकटक गमूकडे पाहिले.

" पुढचे पुन्हा बघू !" यश म्हणाला.

इतके बोलून यश किंचित रागातच झोपी गेला. मला यशची काळजी वाटू लागली. रात्री यशच्या चिंतेत असतानाच मी पाणी प्यायला उठलो. टेबलावर असलेल्या जारमधले पाणी संपले होते. मी खाली किचनकडे गेलो. मला हॉलमध्ये सोफ्यावर बसून प्रीती रडताना दिसली.

क्रमश..


🎭 Series Post

View all