आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 10

समलैंगिक प्रेमकथा
#उत्सव नात्यांचा थीमवर आधारित

आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 10

" पार्थ , घाबरू नको !" यश म्हणाला.

त्याने त्या श्वानाच्या माथ्यावरून हात फिरवला. पण असे वाटत होते की श्वानाला यशला काहीतरी दाखवायचे होते. श्वानाने यशचा शर्ट सोडला आणि तो मंदिराकडे धावू लागला. मी आणि यश त्या प्राण्याचा मूक इशारा समजून मंदिराच्या दिशेने गेलो. मंदीरात एक बाळ रडत होते. काही श्वानांनी त्या बाळाला घेरले होते. पण कुणीही त्या बाळाला इजा पोहोचवत नव्हते. मला जो रडण्याचा आवाज तो याच बाळाचा होता. आम्ही येताच बाळाच्या अवतीभवती असलेले सारे श्वान बाजूला सरले. यशने लगेच त्या बाळाला उचलले. यशच्या कुशीत येताच ते बाळ शांत झाले. यशकडे पाहून गालात खुदकन हसले.

" कोणाचे असेल हे बाळ ?" यश म्हणला.

" माझे !" एक व्यक्ती जो कदाचित तिथेच लपलेला असावा अचानक समोर आला. त्याच्या पायाला जखमा झाल्या होत्या.

" मी दूध आणायला गेलो होतो. बाळाला इथे ठेवले होते. प्लिज माझ्या बाळाला द्या. " तो गयावया करू लागला.

पण कुत्रे त्याला भुंकू लागली. मला त्या माणसावर संशय येऊ लागला.

" हे बाळ मुलगा आहे की मुलगी ?" मी विचारले.

" मुलगा !" तो घाबरतच म्हणाला.

यशने तपासले तर ते बाळ कन्यारत्न होते.

" चल पोलीसस्टेशनमध्ये. तिथेच देतो तुला बाळ. " यश म्हणाला.

" ठेवा तुमच्याकडेच !" असे बोलून तो व्यक्ती पळून गेला.

" जेव्हा माणसे माणुसकी सोडून देतात तेव्हा प्राणी माणुसकी जपतात. या प्राण्यांनी बाळाचे रक्षण केलेच आणि बाळावर वाईट नजर टाकणाऱ्या लोकांनाही धडा शिकवला. " यश म्हणाला.

" यश , मला वाटते या बाळाला ताप आलाय. आधी हॉस्पिटलमध्ये जाऊ मग पोलिसांकडे जाऊ. " मी म्हणालो.

" मी जाऊ का हॉस्पिटलमध्ये ? तू इथेच थांब. कुणी आले तर शोधत. " यश म्हणाला.

" हा ठिके. नीट जा. " मी म्हणालो.

यश त्या बाळाला घेऊन गेला. मी मंदिरात बसलो. देवीकडे त्या बाळाच्या आरोग्याची प्रार्थना केली. वेळ जावा म्हणून मी माझीच जुनी कथा "दिलबरो" वाचत बसलो. इकडे यशने त्या बाळाला डॉक्टरला दाखवले.

" क्या बात है मिस्टर यश सोनी. एका रात्रीत दोन केसेस आणल्या तुम्ही ? दिवाळीत दिवाळे निघालेत का ?" डॉक्टर हसत म्हणले.

" योगायोग डॉक्टर. गमू कशी आहे ?" यशने विचारले.

" कोण गमू ?" डॉक्टरने विचारले.

" मी त्या बाळाचे नाव गमू ठेवले आहे. " यश म्हणाला.

" ओह. बाळ सध्या ओके आहे. आश्चर्य आहे की प्रीमॅच्युरड बर्थ असूनही इतक्या कडाकाच्या थंडीत ते बाळ सुरक्षित राहिले. देवीची कृपा आहे. " डॉक्टर म्हणाले.

" बाळ , प्रीमॅच्युरड जन्मलेले आहे ? डॉक्टर , मंदिरात सापडले म्हणजे जन्म पण जवळच्याच हॉस्पिटलमध्ये जन्मलेला असेल ना. " यशने विचारले.

" हम्म. बाळाच्या गळ्यात हे लक्ष्मीचे लॉकेट सापडले आहे. बाकी पोलीस शोधतीलच. जोपर्यंत बाळाचे खरे आईवडील भेटत नाहीत तोपर्यंत तुम्हीच काळजी घ्या. मला नाही वाटत या बाळाला तिचे आईवडील भेटतील कारण या भागात असे केसेस खूप घडतात. मुली नको असतात. मग जन्म होताच मंदिरात , कचरा कुंडीत सोडून देतात. " डॉक्टर म्हणाले.

यशला वाईट वाटले. पहाटे त्याने मला फोन केला.

" पार्थ , कुणी आले होते का मंदीरात ?" यशने मला विचारले.

" नाही यार. बाळ कसे आहे ? " मी सांगितले.

" सुदैवाने चांगले आहे. बर तू ये इकडे हॉस्पिटलमध्ये." यश म्हणाला.

त्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये आलो.

" कशी गेली रात्र माझ्या नकटुची ?" यशने माझ्या गालावर हात ठेवत विचारले.

" यार यक्षिणी ही ऑडिओ कथा ऐकली. जाम फाटली होती. " मी म्हणालो.

यश हसला आणि त्याने त्याच्या पायाच्या चपला काढल्या.

" नकटु मी त्या देवीला नवस मागितला होता की जर बाळ वाचले तर अनवाणी दर्शनासाठी येईल. " यशने सांगितले.

" यश , इतक्या लहान गोष्टीसाठी तू नवस मागितले ?" मी म्हणालो.

" पार्थ अरे माझ्या कुशीत तिला काही झाले असते तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. चल मी येतो. " यश म्हणाला.

मी यशच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच बसलो. घरी सर्वकाही कळवले. थोड्या वेळाने यश परत आला. ते बाळ अंडर ऑब्झरवेशन होते. काही वेळाने सकाळ झाली. माझ्या आयुष्यातली सर्वात कठीण रात्र सरली होती. सुदैवाने कौतुक शुद्धीवर आला. त्याच्या आईला आकाश ठेंगणे झाले. पोलीस पण आले.

" कसा आहेस कौतुक ? आम्ही रौनकचे पालक आहोत ज्याला तू त्यादिवशी चिडवले होते. हे घे तुझे दहा रुपये. समलैंगिकांना दहा रुपये नको फक्त आदर हवा. " यश म्हणाला.

" यांनीच तुझे प्राण वाचवले. " कौतुकची आई त्याला म्हणाली.

" मला माफ करा. खरच माझे चुकले. तुमचे खूप आभार. " कौतुक म्हणाला.

" कौतुक , मरायचे तर सैनिकांप्रमाणे देशासाठी मरून शहीद हो. गल्लीबोळात मारामारी करून तारूण्य का वाया घालवतोय ? तुला काल काही झाले असते तर तुझ्या आईचे काय झाले असते ? कोण सांभाळले असते तिला ? " मी म्हणालो.

" मी यापुढे हे सर्व सोडणार. चांगले जीवन जगणार."  कौतुक म्हणाला.

" तुझी ही अवस्था ज्यांनी केली त्यांना जेलमध्ये टाकले आहे. " चरणसिंग म्हणाला.

" पोलिससाहेब , त्यांना दोनचार दिवसांनी सोडून द्या. मला कोणतीच केस नाही करायची. मी आईसोबत दुसऱ्या शहरात जाऊन तिथे नोकरी करेल. गुंडे काही दिवसांनी जेलमधून बाहेर पडतीलच आणि मग मला संपवतील. माझे मित्र , यार , गल्लीत मला हफ्ता देणारे कुणीच मदतीला आले नाही. मला कळले आहे की सर्वजण मला घाबरत होते. कुणी प्रेम करत नव्हते. त्यांना फक्त मारामारीसाठी एक गुंडा हवा होता. जगात फक्त आईच होती जी मी मृत्यूच्या दारावर असताना रडत होते. बाकी सर्व हसत होते. " कौतुक म्हणाला.

" मी तुझी दुसऱ्या शहरात नोकरीची व्यवस्था करतो. यापुढे कष्टाने कमव आणि सन्मानाने जग. " यश म्हणाला.

" त्या बाळाबद्दल चौकशी करत आहोत. ते लॉकेट मला दे. गुंड्याची काळजी करू नकोस. पण तोपर्यंत बाळ तुझ्याजवळच ठेव. " चरण यशला म्हणाला.

" थँक्स भाई !" यशने आलींगण दिले.

आता आम्ही त्या बाळाला घरी घेऊन जाणार होतो. यशने बाळाला हातात घेतले.

" येणार ना गमू माझ्या घरी ?" यशने लडिवाळपणे विचारले आणि गमू खुदकन गालात हसली.

क्रमश..


🎭 Series Post

View all