आळ

AAl


आळ

आज सकाळी सकाळी शांत असणारे ऑफिस अचानक भांडनाच्या आवाजाने धुमधूमून गेले

भांडण दोन सहकर्मचारी बायकांचे होते

भांडण अगदी क्षुल्लक होते

ते भांडण जे राजकारण्यांचे असते तोच इथे ही मुद्दा होता

खुर्चीवरून भांडण झाले

कोणी तरी त्यातील एकीची खुर्ची काढून घेतली आणि तिला वाटले त्या समोरच्या मॅडम यांनी त्यांची खुर्ची काढून घेतली आणि स्वतः बसल्या..

तरटे बाई तर टोचून बोलून मोकळ्या झाल्या आणि त्यांच्या टोचून बोलण्याचा रोख रायकर यांच्या दिशेने होतो म्हणून रायकर बाईंना त्यांचा आवाज ऐकू आला..

त्या रायकर मॅडम यांना म्हणाल्या ,"आहो जरा हळू बोलाल का, माझे काम चालू आहे ,तुम्हाला वेळ आहे ,काम ही कमी आहे पण मला इकडे पब्लिक ही हाताळावी लागते..म्हणून जरा त्यांच्याशी बोलतांना तुमचा आवाज खाली ठेवा "

असे बोलताच तरटे मॅडम अजूनच जास्त रागवल्या, त्यांनी तिला परत बोलून दाखवायला सुरू केले... पण मुद्दा असा होता की त्या जिला उद्देशून बोलत होत्या तिला काही गावी नव्हते की तरटे आपल्याला उद्देशून बोलते..

तरटे मॅडम मुद्दाम मोठ्या आवाजात बोलत होत्या, आणि त्यांचा आवाज जितका मोठा होईल तितक्या रायकर मॅडम चिडत होत्या.. तिला समजेना ही बाई इतका आवाज उंच करून ,टोमणे मारून..भांडल्या स्वरात ते ही माझ्या कडे बघून का बोलते..हिला काय वेड लागले की काय... तरी त्या शांतपणे आलेल्या ग्राहकांशी बोलत होत्या.. समजावत होत्या..

तसे सगळे ग्राहक निघून गेल्यावर आता दोघी आमने सामने होत्या..तिने तिचे काम बाजूला ठेवले आणि बडबड करणाऱ्या तरटे बाई कडे रोखून बघत होत्या..कमरेवर हात होता आणि आता त्यांना त्यांच्या मोठ्याने ओरडून आणि टोमणे मारण्याचा जाब विचारायचा होता..

आता खरे भांडण होणार होते, सगळे ऑफिस त्या दोघींकडे बघत होते.. काय बोलतील त्या दोघी आणि आता काय होईल ,जणू भारत पाक क्रिकेट सामना रंगात येईल असे वातावरण झाले होते.. दोंघींची आधीच खुन्नस होती..या आधी ही त्यांचे भऱ्याचदा भांडण झाले होते.. त्यात तरटे खूप भांडखोर होती..म्हणून तिला सगळे घाबरत होते.. तिच्या नादी कोणीच लागत नव्हते.. एक फक्त रायकर सोडली तर तिला कोणी भिडू शकत नव्हते.. मग ऑफिस चे लोक रायकर ला साथ देत होते.. ती कशी बरोबर आणि तरटे कशी चूक हे तिला बऱ्याच दा भरून देत होते..

आज आता वातावरण तापले होते, रायकर विरुद्ध तरटे सामना रंगणार होता..

दोघी ही आर की पार करणार होत्या..

तरटे , "काय काय प्रॉब्लेम काय तुमचा का आवाज वाढवत आहात तुम्ही, हा भाजी बाजार करून सोडणार का ऑफिस ला ? "

रायकर, "तू तुझं बघ ,आणि तुला जर खुर्ची कमी पडत असेल तर तुझ्या घरून आन "

तरटे, "ओ, काय म्हणायचे तुम्हाला, मी खुर्ची घरून आणेन नाहीतर ऑफिस ची घेईल, तुमचा काय प्रॉब्लेम आहे."

रायकर, "माझा प्रॉब्लेम हा आहे की तू माझी खुर्ची घेऊ नये ,तुला हे शोभत नाही ."

तरटे ,"अहो ही माझी खुर्ची आहे ,त्यात तुमच्या नजरा कमजोर तुम्हाला सगळी कडे तुमचे दिसते, फक्त तुमच्या चुका दिसत नाही.. त्या बघा आणि जरा नंबर ही तपासा, लांबून बोलणे जितके सोपे त्या पेक्षा सोपे होते, जर तुम्ही जवळ येऊन खुर्ची तपासली असती.."

रायकर, "म्हणजे काय मी मूर्ख ,मला माझी खुर्ची ओळखता येत नाही का "

तरटे, "मॅडम जर ही खुर्ची तुमची नाही निघाली तर ."

रायकर, "हे शक्यच नाही ,ही माझीच खुर्ची आहे ."

तरटे, "पण जर नाही निघाली तुमची खुर्ची तर काय देणार ."

रायकर, "तू म्हणशील ते"

तरटे,"पहा मी मागेन ते द्यावे लागेल तुम्हाला ,परत माघार नाही "

रायकर ,"चल ग ,तू म्हणशील ते "

ह्यात तरटे रायकर ला खुर्ची जवळ बोलवते आणि खुर्ची तपासायला लावते..रायकर बारकाईने खुर्ची बघते तर समजते ही आपली खुर्ची नाही..

आता रायकरचे डोके ठिकाणावर येते..आता आपल्याला तरटे म्हणणे ते करावे लागणार आहे, जरा थंड डोक्याने काम केले असते तर ही वेळ आली नसती..ती हुशार निघाली..

तरटे जवळ आली हाताची घडी घातली आणि रायकर समोर उभी राहिली...

"चला आता अट मान्य करा ,कारण शर्त मी जिंकलेली आहे, आता मी म्हणेन ते द्यायला तयार व्हा ."

रायकर ,"मी कोणती शर्त लावली नव्हती ,मला आधीच कळले होते ती खुर्ची माझी नाही."

तरटे,"आता नाही ,आधी समजायला हवे होते, आता तुम्ही सगळ्या ऑफिस समोर खोटे बोलत आहात ,मग तुमची काय वट राहील त्यांच्या समोर ,गेली तुमची रेस्पेक्ट.."

रायकरला आता काही बोलता येत नव्हते तिला वाटले आपण आळ घेण्यात घाई केली, आधी विचार करायला हवा होता.. आता ती जे म्हणेन ते करावे लागेल..

"ठीक आहे बोल तुझी अट, मला मान्य आहे "

तरटे,"चल ज्या खुर्चीवरून भांडण केलेस, माझ्यावर आळ घेतलास ती खुर्ची मला हवी, आणि ती तुम्ही तुमच्या हाताने मला द्याल "

रायकर, "हे काय, हे शक्य नाही "

तरटे, "पहा तुम्ही शब्द फिरवत आहात ,हे ठीक नाही ,तुमच्या शब्दाला मान तुम्हीच देत नाही तर मग इतर काय मान देतील "

रायकर, "घे ,पण मी ती तिला आणून देईल असे होणार नाही ,त्याची बोली नव्हती "

तिकडून साहेबांच्या शिपाई आला ,आणि त्याने साहेबांच्या मित्रासाठी घेऊन गेलेली रायकर ची खुर्ची घेऊन आला ,आणि रायकरच्या टेबल कडे नेऊन ठेवणार इतक्यात, तरटे ने त्याला बोलावले आणि सांगितले ती खुर्ची आज पासून माझी आहे, ती तिकडे नाही इकडे आणून ठेव..रायकर मॅडम ने ती मला दिली आहे...

तसा तो शिपाई रायकर मॅडम कडे बघत होता,इशाऱ्याने जणू विचारत होता ,मॅडम खरंच का ..

रायकर, "हो मीच तरटेला ही खुर्ची दिली, आणि हे सगळे तुझ्यामुळे झाले.. तू ना माझी खुर्ची घेतली असती ना मी तिच्यावर आळ घेतला असता, ना मला तिची अट मान्य करावी लागली असती.. ना मी अट हरले असते..ना मला माझी खुर्ची तिला द्यावी लागली असती रे मूर्खां..."

मूर्खां असे म्हणतात तरटे जरा मॅडम कडे बघू लागली रागात, आणि म्हणाली ,"मॅडम तुम्हाला मी तुमची खुर्ची परत देईन ही पण एक अट आहे ,जमेल का सांगा "

रायकर, "बोल बाई बोल ."

तरटे,"आधी तुम्ही राम काका / शिपाई / यांची माफी मागावी मग मी तुमची खुर्ची परत करेन "

रायकर, "तू मूर्ख आहेस का ,मी त्याची का माफी मागू, मी वरिष्ठ आहे तुमची ."

तरटे, "आता तुम्हाला माझी ही माफी मागावी लागेल मगच तुम्हाला तुमची खुर्ची मिळेल "

आता तरटेच बोलणे ऐकून सगळेच पुढे येऊन म्हणू लागले, मॅडम तुम्ही काकांची माफी मागावी नाहीतर तुमची खुर्ची तुम्हाला मिळणार नाही .


मॅडम एकदम वैतागून शेवटी काकांची माफी मागतेच...आणि तशी तरटे तिला त्यांची खुर्ची परत करते.. "सांभाळा मॅडम इज्जत ही आणि खुर्ची ही ,पण पुन्हा कोणावर ही आळ घेण्याआधी विचार करा, कारण सगळेच पुन्हा पुन्हा माफ करत नसतात.."

रायकर निघून गेली...तिला हा अपमान सहन नाही झाला ,तिच्यासमोर उफ न करणारे आज आवाज वाढवून बोलत होते..तिने ह्या घडलेल्या गोष्टी मुळे आपली बदली करण्याची मागणी केली..

त्या तिथून बदलून गेल्यावर तरटे तिथे वरिष्ठ म्हणून नव्याने हजर झाली.. आणि सगळ्या स्टाफ ला खूप आनंद झाला.


आपण कोणावर ही सहज रुबाब करतो ,सहज आळ घेतो ,पण त्यानंतर जेव्हा आपला अपमान होतो तो सगळ्यांना आठवणीत रहातो... कोणावर आळ घेण्या आधी विचार करा... कारण एकदा गेली respect पुन्हा पुन्हा मिळत नाही..