आक्षेप नको विश्वास हवा

* आक्षेप नको विश्वास हवा*प्रशांत उठून तोंड धुवून हॉलमध्ये येऊन बसला. समोर त्याची आई सुशीला बाई बसल्या होत्या . बायको पल्लवी किचन मध्ये चहा करत होती .आज रविवार असला तरी ती लवकरच उठली होती.रोजच्या कामांबरोबरच प्रशांत चे कपडे धुवायचे होते, तो मध्यरात्री टूर वरुन आला होता. सर्व काम झाल्यावर पल्लवी ला दवाखान्यात ही जायचं होतं."काय हाल हवाल इकडचेपल्लवी"?पल्लवी काही सांगणार तेवढ्यात सुशिला बाई म्हणाल्या"हिच्या बाबांचं आॅपरेशन झालं, काल ,काय बाई खर्च हा, नुसती-- लूट आहे,दोन लाख रूपये लागले, पल्लवीने च दिले सगळे."हो कां ,केव्हा ?म्हणजे?? तुला न विचारता परस्पर दिले?काय बाई ,आजकाल विचारण तर दूरच सांगितले पण नाही?सुशिलाबाई ची बडबड सुरु झाली.पल्लवीला सर्व ऐकू येत होते, चहा घेऊन ती बाहेर आली."अरे मी तुला दोन वेळा फोन लावला पण तू मीटिंग मध्ये होता वाटतं. तुझा फोन स्विच ऑफ येत होता" . 'हो पण ,तरीही' ."हे बघ बाबांच ऑपरेशन तातडीने करायचे होते आणि पैसे भरल्या शिवाय शक्य नव्हते ,म्हणून मी पैसे भरले. तू आल्यावर तुला सांगणारच होते. आपलं जॉइंट अकाउंट आहे त्यातून. आणि तुला विचारे पर्यंत वेळ नव्हता. बाबांना अचानक अटॅक आला होता. बोलता-बोलता पल्लवी चे डोळे भरून आले ती कप बश्या उचलुन आत निघून गेली. पल्लवी आणि प्रशांत च्या लग्नाला दोन वर्ष झाली होती. या दोन वर्षात पल्लवी ने आपल्या व्यवहार कुशलतेने सासर माहेर दोन्ही मधे सामंजस्य ठेवायचा खूप प्रयत्न केला .घरी कामातही कुठलीही कसर न ठेवता आपली नोकरी ही व्यवस्थित करत होती. पण तरीही का कोण जाणे सासुबाई तिच्या माहेरी लक्ष घालण्यावरून काही न काही सतत तिला टोमणे देत असत.पण ती फार असे मनाला लावून घेत नसे. पण,आजच्या प्रसंगाने तेथे मन खूप व्यथित झाले. दुपारचे जेवण न बोलता पार पडले, प्रशांत काही बोलला नाही. हात धुऊन पल्लवी बाहेरआली व म्हणाली प्रशांत मला तुझ्या शी व आई तुमच्याशी ही काही बोलायचे आहे."मला सांग प्रशांत, आपण दोघं नोकरी करतो ,आपले जॉइंट अकाउंट आहे .बरेचदा तू पैसे परस्पर काढतो. दर वेळेला मी विचारते किंवा तू सांगतो असे नाही". 'हो होत अस कधी गरज पडते ना'? 'तेच मी म्हणते'!आणि आई ,मागे ताईंचे ऑपरेशन झाले तेव्हाही प्रशांत आफिस च्या कामाने बाहेरगावी गेले होते इथे नव्हते. इमर्जन्सी होती तेव्हाही मी स्वतः पैसे काढून ताईंना ट्रान्सफर केले कारण त्यांना गरज होती."हो बाई तुझ्यामुळे शक्य झालं" आई मागचं आठवून म्हणाल्या."मग तेव्हा ते तुम्हाला चाललं कारण ती तुमची मुलगी होती, माझी नणंद आणि यांची बहीण, तेव्हा ते आपलं कर्तव्य होतं, पण-- आता हे माझे बाबा आहेत म्हणून हा आक्षेप कां??आणि मी त्यांची एकुलती एक कन्या आहे , माझे माहेर ही माझी आणी प्रशांत ची पण जबाबदारी नाही कां?? मग हा भेदभाव कशासाठी??आई ,माझेआई बाबा आमचे पैसे या न त्या कारणाने परत करतील ही आणि नाही केले तरी ,मी त्यांची मुलगी आहे . मला इतक शिकवून मोठं केलं . माझे पण काही कर्तव्य नाही का?प्रशांत ला आपली चूक लक्षात येत होती आईंना ही आपलं काय चुकलं याची जाणीव झाली. पल्लवीला रडताना पाहून त्या म्हणाल्या" अगं तू सांगणार होतीस पण--- मी सांगितले त्याला तर काय बिघडलं?'काहीच हरकत नाही, पण-- ज्या पद्धतीने सांगितले ती बरोबर नाही. "बरं बाई मी तुमच्यात नाही बोलणार"आई, तुम्हाला अधिकार आहे पण तुम्हीही मला समजून घ्यावं एवढीच माझी अपेक्षा आहे.बर मी टिफीन घेऊन दवाखान्यात जाऊन येते.रात्री प्रशांत पल्लवी च्या जवळ जात म्हणाला "पल्लवी माझं खूप चुकलं .आईने जरी काहीही सांगितले तरी मी तुझ्यावर विश्वास दाखवायला हवा होता ,आणि पैसे आपले दोघांचे आहेत मग ते खर्च करायचा अधिकार तुला ही तितकाच आहे, त्याकरता तू माझी परवानगी घ्यावी असे नसावे त्यादृष्टीने मी कर्तव्यात कमी पडलो मला माफ कर.पल्लवी त्याच्या ओठावर बोट ठेवत म्हणाली "उद्या बाबांना डिस्चार्ज मिळणार आहे तुला चलायचंय दवाखान्यात समजलं!" "जशी आज्ञा हुजूर" असे प्रशांत ने म्हणताच पल्लवी हसायला लागली...--- पण आता हे माझे बाबा आहेत म्हणून हा आक्षेप कां??आणि मी त्यांची एकुलती एक कन्या आहे , माझे माहेर ही माझी आणी प्रशांत ची पण जबाबदारी नाही कां?? मग हा भेदभाव कशासाठी??आई माझे बाबा आमचे पैसे या न त्या कारणाने परत करतील ही आणि नाही केले तरी ,मी त्यांची मुलगी आहे मला इतक शिकवून मोठं केलं .------------------------------------
* आक्षेप नको विश्वास हवा*


प्रशांत उठून तोंड धुवून हॉलमध्ये येऊन बसला. समोर त्याची आई सुशीला बाई बसल्या होत्या . बायको पल्लवी किचन मध्ये चहा करत होती .
आज रविवार असला तरी ती लवकरच उठली होती.
रोजच्या कामांबरोबरच प्रशांत चे कपडे धुवायचे होते, तो मध्यरात्री टूर वरुन आला होता.
सर्व काम झाल्यावर पल्लवी ला दवाखान्यात ही जायचं होतं.

"काय हाल हवाल इकडचे
पल्लवी"?
पल्लवी काही सांगणार तेवढ्यात सुशिला बाई म्हणाल्या"
हिच्या बाबांचं आॅपरेशन झालं, काल ,काय बाई खर्च हा, नुसती-- लूट आहे,दोन लाख रूपये लागले, पल्लवीने च दिले सगळे.
"हो कां ,केव्हा ?
म्हणजे?? तुला न विचारता परस्पर दिले?
काय बाई ,आजकाल विचारण तर दूरच सांगितले पण नाही?
सुशिलाबाई ची बडबड सुरु झाली.
पल्लवीला सर्व ऐकू येत होते, चहा घेऊन ती बाहेर आली.
"अरे मी तुला दोन वेळा फोन लावला पण तू मीटिंग मध्ये होता वाटतं. तुझा फोन स्विच ऑफ येत होता" .
\"हो पण ,तरीही\" .
"हे बघ बाबांच ऑपरेशन तातडीने करायचे होते आणि पैसे भरल्या शिवाय शक्य नव्हते ,म्हणून मी पैसे भरले.
तू आल्यावर तुला सांगणारच होते. आपलं जॉइंट अकाउंट आहे त्यातून. आणि तुला विचारे पर्यंत वेळ नव्हता. बाबांना अचानक अटॅक आला होता. बोलता-बोलता पल्लवी चे डोळे भरून आले ती कप बश्या उचलुन आत निघून गेली.

पल्लवी आणि प्रशांत च्या लग्नाला दोन वर्ष झाली होती. या दोन वर्षात पल्लवी ने आपल्या व्यवहार कुशलतेने सासर माहेर दोन्ही मधे सामंजस्य ठेवायचा खूप प्रयत्न केला .
घरी कामातही कुठलीही कसर न ठेवता आपली नोकरी ही व्यवस्थित करत होती. पण तरीही का कोण जाणे सासुबाई तिच्या माहेरी लक्ष घालण्यावरून काही न काही सतत तिला टोमणे देत असत.
पण ती फार असे मनाला लावून घेत नसे.
पण,आजच्या प्रसंगाने तेथे मन खूप व्यथित झाले.

दुपारचे जेवण न बोलता पार पडले, प्रशांत काही बोलला नाही. हात धुऊन पल्लवी बाहेरआली व म्हणाली प्रशांत मला तुझ्या शी व आई तुमच्याशी ही काही बोलायचे आहे.
"मला सांग प्रशांत, आपण दोघं नोकरी करतो ,आपले जॉइंट अकाउंट आहे .बरेचदा तू पैसे परस्पर काढतो.
दर वेळेला मी विचारते किंवा तू सांगतो असे नाही".
\"हो होत अस कधी गरज पडते ना\"?
\"तेच मी म्हणते\"!
आणि आई ,मागे ताईंचे ऑपरेशन झाले तेव्हाही प्रशांत आफिस च्या कामाने बाहेरगावी गेले होते
इथे नव्हते. इमर्जन्सी होती तेव्हाही मी स्वतः पैसे काढून ताईंना ट्रान्सफर केले कारण त्यांना गरज होती.
"हो बाई तुझ्यामुळे शक्य झालं" आई मागचं आठवून म्हणाल्या.

"मग तेव्हा ते तुम्हाला चाललं कारण ती तुमची मुलगी होती, माझी नणंद आणि यांची बहीण, तेव्हा ते आपलं कर्तव्य होतं,
पण-- आता हे माझे बाबा आहेत म्हणून हा आक्षेप कां??
आणि मी त्यांची एकुलती एक कन्या आहे , माझे माहेर ही माझी आणी प्रशांत ची पण जबाबदारी नाही कां??
मग हा भेदभाव कशासाठी??
आई ,माझेआई बाबा आमचे पैसे या न त्या कारणाने परत करतील ही आणि नाही केले तरी ,मी त्यांची मुलगी आहे .
मला इतक शिकवून मोठं केलं .
माझे पण काही कर्तव्य नाही का?

प्रशांत ला आपली चूक लक्षात येत होती आईंना ही आपलं काय चुकलं याची जाणीव झाली. पल्लवीला रडताना पाहून त्या म्हणाल्या
" अगं तू सांगणार होतीस पण--- मी सांगितले त्याला तर काय बिघडलं?
\"काहीच हरकत नाही, पण-- ज्या पद्धतीने सांगितले ती बरोबर नाही.
"बरं बाई मी तुमच्यात नाही बोलणार"
आई, तुम्हाला अधिकार आहे पण तुम्हीही मला समजून घ्यावं एवढीच माझी अपेक्षा आहे.
बर मी टिफीन घेऊन दवाखान्यात जाऊन येते.

रात्री प्रशांत पल्लवी च्या जवळ जात म्हणाला "पल्लवी माझं खूप चुकलं .
आईने जरी काहीही सांगितले तरी मी तुझ्यावर विश्वास दाखवायला हवा होता ,आणि पैसे आपले दोघांचे आहेत मग ते खर्च करायचा अधिकार तुला ही तितकाच आहे, त्याकरता तू माझी परवानगी घ्यावी असे नसावे त्यादृष्टीने मी कर्तव्यात कमी पडलो मला माफ कर.
पल्लवी त्याच्या ओठावर बोट ठेवत म्हणाली "उद्या बाबांना डिस्चार्ज मिळणार आहे तुला चलायचंय दवाखान्यात समजलं!" "जशी आज्ञा हुजूर" असे प्रशांत ने म्हणताच पल्लवी हसायला लागली...
----------------------------------------
लेखिका. सौ.प्रतिभा परांजपे