आजीची माया

Aajichi maya

      आजी  अचानक दवाखान्यात दाखल ,  तीन दिवसांनंतर किमया धावतच आजीच्या कुशीत विसावली . त्या बालमनाला कुठे माहिती की  आजी शेवटच्या घटका मोजत होती .  डाॅक्टरांनी तर त्यांचा निर्णय सांगितला . अचानक आजी तिला  न सांगता एकटीला  घरी सोडून निघुन आली . त्यामुळे रुसलेली किमया आजीला भेटण्यासाठी हट्टालाच पेटली .  किमयाचा आवाज ऐकताच  आजीने डोळे उघडले आणि आजीचा अटकलेला जीव परत आला . 
     सर्वांनाच हायस वाटलं .  आश्चर्याचा धक्का बसला.
 "आयुष्याचे छोटे हसरे क्षण" सगळ्यांनाच आनंददायी ठरले . आजी आणि नातीच्या मिलनाची आस सर्वांना सुखद धक्का देऊन गेली . 
         कोणी विचारही केला नसेल कि हाय शुगर , हाय बीपी असतांनाही आणि त्यात आलेला हार्ट अटॅक .....
जिवंत राहण्याची शक्यता अगदीच कमी ....
      म्हणतात ना , आयष्याची दोरी हि इतकी कमकुवत नसते . घरच्यांचा पाठिंबा , दिलासा , विश्र्वास , साथ माणसाला अनेकदा संकंटातुन पार करून देतो . 
      असे म्हणतात की , बालपण आणि म्हातारपण एकसारखे असते . बाल हट्ट तर आपण पुरवतो . अगदी तसेच म्हातारपणीचे असते .
       आजी म्हणजे मुलांसाठी गोष्टींचा संग्रह  ,  आजी म्हणजे मार न मिळावा म्हणून लपण्याची जागा  , आजी म्हणजे प्रेमाने हातावर दिलेला छोटासा खाऊ  , आजी म्हणजे  मायेची उबदार रजईच जणु .......आजीचा जादुचा  बटवा .......काय काय निघते त्याच्यातुन विचारायची सोय नाही .

         आजीचा जीव नातीत आणि नातीचा जीव आजीत . अलगच  bonding असते . 
           मायेचा प्रवास मांडायला  शब्दच कमी पडतात . त्यासाठी अनेक गोष्टी उलगडायला शब्द अपुरे पडतील .