आजची सासू,कालची सून.अंतिम भाग-४.

अविस्मरणीय भूत काळातील आठवणी.
अंतिम भाग -४.


" हो आलो, काय ग राणी."

राणीने विषय बदलण्याच्या आतच ,त्याच्या आईने पटकन,...." अरे राज इकडे कांद्या सारखा खुप वास येतोय रे....."
" हो का,पण मी तर मगाशी घेतलेय ना झाडून सगळे...."

" म्हणजे......"
आई आणि वहिनी एकदमच विस्मायित झाल्या.

राणी आता कसतरी फिल करतेय,हे राज ला समजून चुकले होते.
राज आता तेव्हा पासून ,दाबून ठेवलेले हसू एकदम मोकळे करून ,अगदी मनापासून हसायला लागला.....
" अग आई,काय झाले मगाशी ना...राणी कांदे कापायला इथे येऊन बसली होती.आणि अचानक जोरात वाऱ्याची झुळूक आली.आणि कांद्याची टर फले घरभर उडवून गेली.तिला खूप टेन्शन आले होते.म्हणून मीच म्हणालो तिला. तु जा किचन मध्ये मी आवरून घेतो इकडचे...""

हे ऐकू न त्या ही हसायला लागल्या होत्या.
" अग राणी एव्हढे काय लपवतेस,होते असे कधी तरी,ह्या राजने फॅन लावून असे काही झाडून घेतले आहे की,कांद्याची टरफले भिंती लगत अन् कानाकोपऱ्या पर्यंत गेली आहेत ,ती बघ ...ती बघ...म्हणून रूम मध्ये कांद्याचा वास येत आहे.""

"" तुला सांगते राणी,अग संसारमधे नवीन नवीन अशाच छोट्या छोट्या चुका होतातच.त्या अनुभवातून च माणूस शहाणा होतो.कधी कधी चाल ढकल केल्याने अश्या चुकाही अपमानास्पद परिस्थिती निर्माण करतात.तर काही चुका अशा ही होतात की,त्याने नुकसान जरी फार झाले नाही तरी त्या चुकांचा ठसा सोडून जातात.जसे की राजने आता केले.अन् तु त्याच्यावर विश्वास ठेवलास पण कांद्याची टरफले रूम मध्ये राहिली असल्याने त्यांच्या वासाने ते आम्हाला समजले."""

" ये आई,बस झाले तुमचे कांदा पुराण.चला आता सगळे जेवायला.तुम्ही गेल्यावर करून घेऊ आम्ही दोघे स्वच्छ...हो ना ग राणी..""असे म्हणून राजने ,राणीला डोळे मिचकावत चिडवले.आणि सगळे हसत हसत बाहेर डायनिंग टेबलवर स्थानापन्न झाले.......!!!

....................


अगदी त्या दिवशी ,सारखीच फ्रेश ,सुंदर सकाळ होती.आणि राणीच्या हाता मध्ये शिऱ्या सारखे दिसणारी कांदा पोहे ची प्लेट ,रश्मीने तिला नाश्ता म्हणून दिली होती.
आणि रश्मी देखील त्यावेळेस च्या राणी प्रमाणे हिरमुसली होऊन अपराधी भावनेने राणीकडे बघत होती.
राणी ने एक नजर पोह्यांचा प्लेट कडे अन् एकदा रश्मी कडे बघितले .आणि......
.... आणि राणी ,भूत काळातल्या आठवणींनी हसायला लागली.....!

रश्मीला हे अगदी अनपेक्षित होते. गिचके झालेले पोहे बघून सुद्धा रश्मीची सासू म्हणजे राणी ,नाराज न होता हसत होती.....!

रश्मी," म्हणजे राज आणि राणी याच्या मुलाची म्हणजे राहुल ची प्रिय पत्नी.म्हणजे राणीची नव नवेली सून होती....!
राहुल आणि रश्मी यांचा प्रेम विवाह होता.दोघे सॉफ्ट वेअर इंजिनियर होते.रश्मीला तिच्या आई वडिलांनी घर काम, स्वंयंपाक ,यापेक्षा शिक्षण आणि करियर वर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याची सवलत आणि संस्कार दिले होते....!
लग्नानंतर ते परदेशात वास्तव्य ला होते.

राज आणि राणी यांची त्यांच्या घरी पाहिल्यांदाच भेटण्यासाठी गेले होते.
रश्मी खुप हुषार,आणि कर्तबगार आणि कर्तव्यनिष्ठ सून त्यांना मिळाली होती.
परदेशीय जीवन राहतो प्रमाणे मायक्रो ओवान मध्ये पिझ्झा,बर्गर,मयक्रोनी,पास्ता, नूडल्स, असले अनेक पदार्थ ती खुप चांगले बनवायची.पण राणीने म्हणाजे तिच्या सासूने सांगितल्या प्रमाणे तिने कांदा पोहे केले होते,पण ते जास्त पाण्यात भिजवल्यामुळे गीचके झाले होते.आणि ते बघूनच राणी खुप हसत होती....!!
" काय झाले मम्मी,का हस्ते तुम्ही,पोहे नको खाऊ हे,मी दुसरा नाश्ता बनवते तुमच्यासाठी...."""

मग राणीने ही,तिच्या भूतकाळातील त्यांच्या लग्नाच्या सुर वातीच्या दिवसातली तिची सासू पहिल्यांदा आली असताना कांद्याच्या टर फलाची मजेशीर आठवण रश्मीला सांगितली....!
आणि आजही कांद्याची टरफले मला दिसली की,राजने दिलेल्या शिकवणीची ही आठवण होते असेही सांगितले.....!

" ओ मम्मी, थँके यू,की तुम्ही मला मोठ्या मनाने समजून घेतले .आता मी सुद्धा ही गोष्ट कधी कधी विसरणार नाही.की मी देखील तुम्हाला असले गिचके पोहे केले होते आणि तुम्ही हसून मला क्षमा केली होती अन् कांद्याच्या टर फलांचा तो प्रसंग सांगितला होता....!"""

"" येस,रश्मी डियर,आयुष्यात घडणाऱ्या सगळ्याच चुका वाईट नसतात ग....काही चुकांमधून आपण नात्यांमधला जिव्हाळा ओळखू शकतो. एक मेकांच्या चुकांना विसरून आपसातील नाते अधिक दृढ करण्याची ती संधी असते. एकमेकी बद्दल आदर वाढवू शकतो..... चल,रश्मी आज मी माझ्या आवडीचा नाही तर तुझ्या आवडीचा नाश्ता खाणार आहे...."""

रश्मी आणि राणीने एकमेकींना प्रेमाचे आलिंगन दिले .आणि हसत दोघी रश्मीच्या किचन मधील मायक्रो ओवण कडे जाण्यास वळल्या.....!!!!!
©® Sush.

🎭 Series Post

View all