आजची सासू,कालची सून. भाग-२

अनुभवाचे बोल.
भाग -२

थोड्याच वेळापूर्वी असलेली आल्हाद दायक मनस्थिती ह्या अनपेक्षित येणाऱ्या जोरदार वाऱ्याच्या लाटेने एकदम तणाव ग्रस्त परिस्थिती निर्माण करेल असा विचारही तिच्या मनात आला नव्हता.
पटकन उठून गॅलरी चे दार लावावे म्हणून उ ठत असतानाच,तिकडे डोअर बेल वाजली.राज बाहेरून परत आला होता.राज आनंदाने घरात आला आणि....
राणीच्या चेहऱ्यावरचा बदललेला रंग बघून,\" बाहेर जाऊन येई पर्यंत असे काय झाले असावे...\"?
ज्यामुळे राणीच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट आले आहे,या विचारात दोघेही घरात आले.....
राज आता कपडे चेंज करण्यासाठी बेड रूम चे दारा पर्यंत आला आणि रूमचा अस्ताव्यस्त अवतार बघून ,घरभर कांद्याची विखुरलेली टरफले बघून,त्याला काही समजेनासे झाले.....
राणीने त्याच्या चेहऱ्यावरील भाव ओळखला. हिरमुसलेल्या शब्दात ,जे झाले ते सर्व त्याला सांगितले......
सगळी हकीकत ऐकून राज ल हसू आवरेना से झाले होते.तिचा तणाव ग्रस्त चेहरा बघून त्याने हसू वर कंट्रोल केला.....
" बघ ना राज,हे असे कसे झाले ,सगळे येण्याच्या आत मला स्वयंपकाचे काम पूर्ण करून ठेवायचे आहे.पण आता ही कांद्याची टरफले इतकी घरात उडाली आहेत की,परत सगळी स्वच्छ करावे लागेल.हे करत बसले तर,उशीर पण होईल,बरे झाले तू लवकर आला आहेस,करतोस का मदत थोडीशी...."
......विनवणीचे सुर काढत,राणीने राजला अलगद मिठी मारली.राज ल ही या अचानक संकटाचे गांभीर्य लक्षात आले होतेच....

" अग एव्हढे काय टेन्शन घेते जानु....!
मी आहे ना मदतीला माझ्या राणीच्या...! काय करू सांग...!".....असे म्हणून राज नेही तीला आपल्या कवेत घेतले......
आश्वासक भावनेने,राणीने ही त्याच्या छातीवर स्वतःचे डोके टेकवले.आणि राज आणि राणी दोघेही एकमेकांच्या प्रेमाच्या अन् आभार युक्त भावनांच्या चुंबनांमध्ये व्यक्त झाले.....

वेळ आता वेगाने पुढे चालला होता.म्हणून राणीने,हुशारीने अलगद राजच्या कवेतून स्वतःला सोडवून घेतले.
"" चल लवकर,उशीर होतोय,मी किचन मध्ये जाते, तू कांद्याची टरफ लाना व्यवस्थित झाडू मारून स्वच्छ करून घे ."....
राणीने आता किचन चा ताबा घेतला,आणि राज बेड रूम ला स्वच्छ करण्यासाठी आधी स्वतःचे कपडे चेंज करावे म्हणून,रोझ च्या सवयी प्रमाणे,आधी फॅन चे बटण चालू केले....
त्याचे कपडे चेंज करी पर्यंत ,कांद्याची टरफले,जी घरभर उडाली होती,ती आता सीलिंग फॅन च्या गोल गोल वाऱ्याच्या प्रेशरणे रूम च्या भिंती पर्यंत आणि काण्या कोपऱ्या पर्यंत उडत गेली होती.......

येणाऱ्या पाहुण्यांना कांद्याची टरफले रडवतात की हसवतात ते वाचूया पुढच्या भागा मध्ये.
© ® Sush.

🎭 Series Post

View all