आज काय झाले होते?

एक लघु कथा..
आज काय झाले होते माहिती आहे ना?


आज २ ऑक्टोबर . . माहिती आहे ना आजच्या दिवशी काय झालेले ते ? . . .


हों!..अगदी बरोबर ओळखले तुम्ही शाब्बाश !


मला वाटलंच होते की तुम्हांला आता समजलं असेल की मी काय सांगणार आहे ते ?. .


हो !. . आज २ ऑक्टोबर आणि आजच्या दिवशीच आपल्या भारत देशातील दोन महान नेत्यांचा जन्म झाला होता . एक म्हणजे राष्टपिता महात्मा गाँधी आणि दूसरे म्हणजे आपल्या भारताचे दूसरे पंतप्रधान मा . लालबहादुर शास्त्रीजी.


बरोबर ना ? ? की काही चुकीचे सांगतोय !


. दोघांची थोडक्यात माहिती

१] आपले राष्टपिता महात्मा गाँधी खरंतर माझ्या सर्वात आवडणाऱ्या व्यक्ति मधे त्यांचा समावेश आहे . खुपच बोलावस वाटते त्यांच्या विषयी. पण तुम्हांला बाकीच्या पण पोस्ट वाचायचे असतील ना म्हणुन मी थोडंक्यात सांगतो चालेल ना ?


महात्मा गांधी यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर १८६९ ला पोरबंदर - काठियावाड़ येथे झाला .


काहींच्या मनांत गांधीजीची ओळख म्हणजे पाकिस्तान ला ५२ कोटि दिले वैगेरे!

. . . पण माझी विनंती आहे की, त्यांनी गांधीजीचे एकच पुस्तक वाचा ते म्हणजे सत्याचे प्रयोग . . हे पुस्तक वाचुन त्यांचे महात्मा गांधीजींच्या बद्द्ल मत बदलेल. असा मला विश्वास वाटतो. फक्त एकच पुस्तक . - सत्याचे प्रयोग !...


. .
२] लालबहादूर शास्त्री - यांचा जन्म आजच्या दिवशीच म्हणजे २ ऑक्टोबर १९०४ रोजी मुघलसराई येथे झाला .


शास्त्रीजी भारताचे दूसरे पंतप्रधान होते . (१९६४ ) त्या काळात पकिस्तान विरुध्द युध्द झाले . पाकिस्तान बरोबरचे युध्द समाप्तीच्या करारावर सही करण्यासाठी गेले असता.त्यांचे ताश्कंद येथे (तत्कालीन सोवियत संघ आताचे उझबेकिस्थान ) संशयास्पद निधन झाले.


तर ही होती या महान् नेत्यांची थोडक्यात माहिती . .ज्यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे २ ऑक्टोबरला झाला होता..

आज त्यांच्या जयंती निमित्त या दोन्ही महान नेत्यांना विनम्र अभिवादन...


बाकी दृश्यम मधील अजय देवगण ची फेमिली आज गोव्याला गेलेली आहे..... तिकडे ते पावभाजी खाऊन स्वामी चिन्मयानंद यांचा सत्संग करून ३ ऑक्टोबरला घरी परत येतील.... . ..


लेखन : चंद्रकांत घाटाळ