आईशपथ...असाचं न्याय झाला पाहिजे.

वैकुंठराव सारखा बाप असेल तर आपल्या देशातील सगळ्याच मुली सुरक्षित राहतील.


"त्या नराधमाला कधी पकडणार तुम्ही? तुमची टीम फक्त काम करते असं भासवत आहे का जनतेला? की आमदारांचा मुलगा आहे म्हणून त्याला पाठीशी घालत आहात? वीस दिवस उलटत आले पण अजून तो सापडला नाही?"असे एक ना अनेक प्रश्न पत्रकार विचारत होते.
पी.एस.आय. शिंदे आणि त्यांची पूर्ण टीम पत्रकारांच्या कचाट्यात अडकली होती. तिकडे हॉस्पिटलमध्ये ती.. अजूनही मृत्यूशी झुंज देत होती.

वीस दिवसांपूर्वी

"ए सारिका.. कोण समजतेस गं तू स्वतःला..? तुझी हिम्मत कशी झाली माझ्या थोबाडीत मारायची?"


"कारण तुझी ना.. लायकीचं ती आहे समजलं ना!"


"ए.. तुला माहीत आहे ना मी कोण आहे ते?"


"हो माहीत आहे ना.. बापाच्या जीवावर उडया मारणारा गाढव आहेस तू."


"ए सारिका.. आता लै बोललीस हां.. चल माफी माग माझी."


"काय? माफी आणि ती पण तुझ्यासारख्या नीच माणसाची? थु... अरे माफी सोड तुला तर भीक पण नाही घालणार मी कधी... आला मोठा शहाणा माफी माग सांगणारा." सारिका बोलते आणि तोऱ्यात निघून जाते.


"ए सारिका...!" मागून तो मोठ्याने ओरडतो.

******
हा सगळा प्रकार नचिकेतचे वडील मा.आमदार. श्री वैकुंठराव निंबाळकर गाडीत बसून पाहत असतात. लेकाचे प्रताप बघितल्यावर ते गाडीत बसूनचं त्याला फोन करतात.


"हॅलो.. जिथे कुठे असाल ताबडतोब बंगल्यावर या."


"हो बाबा येतोच मी." नचिकेत लगेचं त्याच्या आपाची ला किक मारतो आणि निघतो.


"बाबा... येऊ का?"


"हा ये ये.. काय मग काय चाललंय तुझं? म्हणजे कॉलेज वैगरे?"


"छान चालू आहे बाबा."


"नाक्यावर तुझ्या थोबाडीत मारली ती मुलगी कोण होती? आणि ती अशी का वागली?"


"बाबा.. ते.. तिचा गैरसमज झाला होता म्हणजे माझ्या मित्राने तिची छेड काढली होती तिला वाटलं मी काढली म्हणून तिने मला मारलं." नचिकेत चाचरतचं बोलत होता.


"अच्छा, मग तर चूक त्या मुलीची आहे. ठीक आहे तू तुझ्या त्या मित्राला बोलावून घे आणि त्या मुलीला पण."


"अं.. नको बाबा.. राहुद्या ना आता, मी सांगितलं आहे तिला आणि तिचा गैरसमज पण दूर केला आहे त्याची काही गरज नाही."


"अशी कशी गरज नाही? आमदार वैकुंठराव निंबाळकरांचा मुलगा तू आणि तुझ्या बद्दल कोणाचा गैरसमज होत असेल तर तो दूर करणं गरजेचं आहे मला."


"हो बाबा पण आता राहुद्या.. \"झालं गेलं गंगेला मिळालं.\"

सन्नन्नन्ननन..वैकुंठराव त्याच्या कानाखाली वाजवतात.

" खोटं बोलतोयस. अरे लाज कशी नाही वाटत तुला. मी बाहेर गेलो की लोकं अदबीने उभे राहून नमस्कार करतात आणि तू माझ्या नावावर माझी इज्जत खपव.. निघ इथून आणि परत तुझं थोबाड दाखवू नको. काय औलाद पैदा झाली आहे."

तो रागाने तिथून निघतो आणि सारिकाच्या घराजवळ जाऊन उभा राहतो. सारिका रोज रात्री कचरा टाकायला बाहेर निघते हे त्याला माहित असतं.बरोबर त्याच वेळेत तो तिथे पोचतो.

कचरा टाकून सारिका निघतचं होती की कोपऱ्यावर उभा असलेला नचिकेत तिचा हात पकडतो.

"तू इथे??"


"हो मी इथे! साली मादरचोद तुझ्यामुळे आज माझ्या बापाने माझ्यावर हात उगारला. चौकात केलेला अपमान आणि बापानी काढलेली लायकी त्याचा बदला घेतल्याशिवाय राहीन का मी?"


"हे बघ जास्त शहाणपणा करू नको. सोड माझा हात.. सोड म्हणते ना!" ती हात वाकडा तिकडा करून सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण तो तिचा हात आणखी जोरात पिरगळत होता.


"सोड म्हणते ना!! वाचवा...!"

ती पुढे आणखी जोरात ओरडणार इतक्यात त्याने क्लोरोफॉम लावलेला रुमाल तिच्या नाकावर धरला आणि ती बेशुद्ध झाली. त्याने तशीच तिला खांद्यावर टाकली आणि कचऱ्याच्या डब्याच्या मागे असलेल्या कालव्याजवळ नेली. तिथे एक पडकी झोपडी होती त्या झोपडीत नेऊन तिला टाकली आणि तो वाट बघत बसला तिला शुद्ध येण्याची. क्लोरोफॉम जास्त लावल नसल्याने ती लवकर शुद्धीत आली. झोपडीत असलेल्या मोठ्या वाश्याला तिला बांधून ठेवलं होतं. तिच्या अंगावर एकही कपडा त्याने ठेवला नव्हता आणि तो बरोब्बर तिच्या समोर बिअरची बॉटल घेऊन तिला वासनेच्या नजरेने बघत होता. तिला जाग येते तेंव्हा ती आपल्या अंगावर एकही कपडा नसल्याने ओशाळते. दोन्ही पाय छातीजवळ घेऊन स्वतःला झाकण्याचा प्रयत्न करते, तसा तो उठून तिच्या जवळ येतो आणि तिचे दोन्ही पाय बाजूला घेतो. हातात जळत असलेल्या सिगारेटचे चटके तिच्या गुप्तांगावर देतो. ती ओरडत असते त्याला हे सगळं करण्यापासून थांबवत असते पण तो त्याच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आसुसला होता. तिला वाट्टेल तशी कुस्करत होता. कधी तिच्या मानेला चावत होता तर कधी तिच्या छातीला दातांनी ओरबाडतं होता. दुष्कर्म करतांना तिला कधी सिगारेटचे चटके देत होता तर कधी पट्ट्याने मारत होता. तिचे ओठ तर जणू रक्ताने माखलेले आणि कुस्करलेले गुलाबाचं वाटत होते पण तो नालायक रक्ताने बरबटलेले ओठ पुन्हा पुन्हा चावत होता. अख्खी रात्र तो तिच्यावर सूड उगवत होता आता मात्र ती प्रतिकार करून थकली होती.

इकडे सारिका अजून आली नाही म्हणून तिची शोधाशोध सुरू झाली. कचऱ्याच्या डब्ब्याजवळ सारिकाचा डब्बा आणि तिची ओढणी सापडली. सगळे जे समजायचं ते समजून गेले. पोलीस कम्प्लेन्ट करून सगळेजण पहाटे सहा साडे सहाच्या दरम्यान त्या झोपडीजवळ पोचले.

सारिकाची आई आणि बाबा काचरतचं झोपडीजवळ गेले. सारिकाच्या आईने घाबरतचं दार उघडलं आणि अक्षरशः किंचाळली.


"सारी...... "त्या धावतचं आत गेल्या सोबत असलेली ओढणी त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या सारिकाच्या अंगावर घातली. सारिकाला त्यांनी कुशीत घेतली.

आई हा शब्द सुद्धा नीट उच्चरता येत नव्हता तिला.सारिकाला कसबस स्ट्रेचरवर झोपवून अँमबुलन्समध्ये नेलं जातं. अँमबुलन्स तिचा सायरन वाजवत वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने धावत होती. सारिकाची अवस्था ना धड जीवन ना मरणं अशी होती. वेदनेने कळवळत होती ती. तिच्या मांड्यांवर ठिकठिकाणी रक्त काळ पडलं होतं. तिच्या पूर्ण शरीरावर जखमा होत्या काही ठिकाणी रक्त सुकलं होतं तर काही ठिकाणाहून रक्ताच्या धारा वाहत होत्या.

सारिकाच्या घरचे आणि तिच्या शेजारचे सगळेचं तिथे होते. सारिकाचं डॅशिंग आणि बिनधास्त असणं आज तिच्याचं जीवावर उठलं होतं.
सगळे डॉक्टर तिला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. तिची ही अवस्था बघून त्यातल्या एका डॉक्टरला तर चक्करच आली होती शुद्धीत आल्यावर ती डॉक्टर..सारिकाची अवस्था बघून रडू लागली होती. सारिका शुद्धीत आली तसे पी.एस.आय. शिंदे आणि एक लेडी पोलीस जबाब नोंदवण्यासाठी आली.

"तुझी ही अवस्था बघून तुला काय प्रश्न विचारू हे ही समजत नाही मला..पण साल्या भडव्याच नावं सांग फक्त... कायदा तुला केंव्हा न्याय मिळवून देईल मला माहित नाही पण आईशपथ त्या भडव्याला मी नागडा करून मारेल.. तुला जेवढ्या वेदना दिल्यात त्याने त्याच्या लाख पटीने त्रास मी देईन त्याला." शिंदेंच्या डोळयात राग आणि पाणी स्पष्टपणे दिसत होतं. त्यांच्या एकेक शब्दावर सगळ्यांच्याच हाताच्या मुठी आवळत होत्या.


"नची..केत निंबाळ.. कर ती अडखळत बोलली."

"काय? नचिकेत निंबाळकर.. म्हणजे आपले आमदार...त्यांचा मुलगा?" शिंदेनी आश्चर्यचकित होत विचारलं.

सारिका मान हलवून हो म्हणते.
शिंदेंना तर काय बोलू यावर तेच सुचत नव्हतं. तरी ते सारिकाला न्याय मिळवून देणारा अस आश्वासन देतात. शिंदे लगेच आबांना म्हणजेच वैकुंठराव निंबाळकरांना फोन करून घडला प्रकार सांगतात. शिंदे यांच्या टीमला सक्त ताकीद देऊन ठेवतात की अत्याचार करणाऱ्याचं नाव बाहेर
फुटू नये, नाहीतर खूप गोंधळ होईल पण म्हणतात ना अश्या गोष्टी लपून राहत नाहीत. दोनच दिवसात सगळ्या न्युज चॅनेल वर बातमी झळकू लागली आमदारांचा मुलगा... नचिकेत निंबाळकरने केला एका मुलीवर बलात्कार....

नचिकेत दुष्कृत्य करून फरार झाला होता. नचिकेत घरी त्याच्या आईला फोन करतो तेंव्हा वैकुंठराव फोन घेतात.

"हॅलो, तू कुठे आहेस पोरा? जिथे कुठे असशील तिथून निघू नको. पोलीस तुझ्या मागावर आहेत. अरे आणि मज्जाच मारायची होती तर मला सांगायचं अश्या छप्पन पोरी तुझ्या दिमतीला ठेवल्या असत्या. बरं ते सोड तुझे सगळे कॉन्टॅक्ट मी सांगेन तोवर बंद ठेवायचे आणि काही कमी पडलं तर मला सांग मी सगळी सोय करून देईन पण बाहेर पडू नको."


"हो बाबा.. बाबा पण तुम्ही चिडला नाहीत? म्हणजे मला वाटलं यात तुमचं पण नाव आलं आहे म्हणजे."


"अरे एकुलता एक लेक आहेस माझा... यात तुला अडकू कस देईन मी! बरं तू आता कुठे आहेस?"

"आपल्या टेकडीवरच्या फार्महाऊस वर! "


"ठीक आहे. मी उद्या मध्यरात्री येतो तिथे. तुला काही खायला नसेल तर सांग म्हणजे घेऊन येईन.सकाळी निघणं मुश्कील आहे म्हणून रात्री निघेन."


"हो बाबा चालेल. पण बाबा मी फार्महाऊस मध्ये मागच्या बाजूला आहे."


"मागच्या बाजूला?"

"हो, म्हणजे मी फार्महाऊसचं काम चालू होतं तेंव्हा एक भुयारी रस्ता काढून मोठा लॉन बनवून घेतला होता जमनीखाली तिथेचं आहे."


"बरं चालेल... येतो मी काळजी घ्या तोवर."
खोलीत जाऊन निंबाळकर पी.एस.आय शिंदेंना फोन करतात आणि रात्री बाहेर जायचं आहे गाडी घेऊन मुख्य रस्त्यावर वाट बघा अस सांगतात.


"साहेब गाडी घेऊन घरी आलो असतो! असं बाहेर का?"

"त्या पोरीची अवस्था बघितली आणि मन हादरून गेलं. लाज वाटते मला त्याला माझा मुलगा म्हणवून घ्यायची."


"मी समजू शकतो साहेब! पण काय करायचं आता? म्हणजे मीडियाला समजली आहे ही गोष्ट! नचिकेत पण कुठे आहे माहीत नाही. बरं आपण कुठे जायचं आहे?"


"टेकडीवरच्या फार्महाऊस वर."

"तिकडे का? म्हणजे.. नचिकेत.."


"हो तो तिकडेच आहे.

गाडी फार्महाऊसच्या दारात उभी राहिली. शिंदे आणि वैकुंठराव निंबाळकर दोघेही आत गेले आणि नचिकेतने सांगितलेल्या मार्गावरून खालच्या बाजूला आले.
सर्व सुखसोयींनी सज्ज असा तो लॉन होता. वैकुंठराव दार ठोकतात तसा नचिकेत लगेच येऊन दार खोलतो आणि त्यांच्या सोबत शिंदेंना बघून तर तो चपापतो.

"बाबा.. हा शिंदे इथे काय करतोय?"

सन्नन्नन्ननन
वैकुंठराव त्याच्या कानाखाली वाजवतात.
"आपल्या देशाचे आणि आपले रक्षक आहेत ते आणि त्यांना अरेतुरे ची भाषा वापरतांना लाज नाही वाटली. अरे तुझ्या कडून काय मी लाजेची अपेक्षा करतोय ज्याने माझी लाज,इज्जत,अब्रू..एवढ्या वर्षाची मेहनत सगळंच वेशीला टांगल. शिंदे बघताय काय… घाला बेड्या याला."


"येस सर…."

"खबरदार शिंदे.. मला हात लावशील तर!"


"काय करशील रे... शिंदे घाला त्याला बेड्या तो काय करतोय ते बघतो मी!"

शिंदे बेड्या ठोकत असतात पण नचिकेत झटापट करत असतो.. तिथून निसटून जाण्याचा प्रयत्न करत असतो.


"बाळा.. बाप आहे तुझा..तू इथून निसटण्याचा प्रयत्न करशील हे माहीत आहे मला म्हणून पूर्ण फार्महाऊसला पोलीसांनी वेढा घालून ठेवा असा आदेश मीच दिला आहे त्यामुळे पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर गोळ्या घालायच्या तुला अस मी आधीच सांगून ठेवलं आहे. त्यामुळे मुकाट्याने चल…"

नचिकेत रागाने बापाकडे बघून मुख्य हॉलमध्ये येतो.

हॉलच्या बाजूला स्टोररूम असतो तिथे वीस दिवस बिना अन्नपाण्याचं त्याला ठेवायचं अस वैकुंठराव निक्षून सांगतात आणि पुन्हा त्यांच्या बंगल्यावर निघून येतात.

एकोणिसाव्या दिवशी नचिकेतला सगळे त्याच्या आवडीचे पदार्थ खायला घालतात. दिवसभर तो त्याच्या आवडीचं खात-पित असतो पण पुढे काय वाढलं आहे याची भनकपण त्याला नसते.

मध्यरात्री नचिकेत झोपेत असतांनाच वैकुंठराव येतात आणि त्याला फरफटत मुख्य हॉलमध्ये आणतात आणि त्याच्या तोंडावर पाणी टाकतात. डोळे उघडल्यावर त्याला समोर सारिका दिसते.


"तू...इथे...साली हरामी...तुला एवढी कुस्करून पण अजून जिवंत आहेस?"


"आबांमुळे जिवंत आहे मी.. आणि आता इथे आली आहे ती तुला तुझ्या कर्माची शिक्षा द्यायला."


"तू काय मला शिक्षा देणार! नचिकेत छन्नी हसत बोलला.इतक्यात त्याच्या गालावर जोरदार कानशिलात पडते तसा तो पटकन त्याचा गाल खांद्यावर आडवा करतो. \"आई….तू..?"


"हो मी! अरे शरम येते मला.. तुला माझा मुलगा म्हणवून घ्यायची. तुझ्यासारखा शंड माझ्या पोटी जन्माला येण्यापेक्षा माझी कूस रीती राहिली असती ना तर बरं झालं असत. अरे.. आमची अब्रू घालवलीसच पण या पोरीचं आयुष्यपण बरबाद केलंस." अस म्हणत नचिकेतची आई त्याच्या दोन तीन कानफटात अजून मारते.

"नाही सरकार..हा आपला नाही..या पोरीचा आणि तिच्या आईवडिलांचा गुन्हेगार आहे."


"ये पोरी…घे हा पट्टा…" हातातला पट्टा पुढे करत ते बोलले.
तशी सारिका रागात पट्टा हातात घेते आणि उजव्या हातात त्याला लपेटते. नचिकेतला बघून तिला त्या रात्री घडलेलं सारं.. जसच्या तसं आठवत होतं. ती एकदाच किंचाळते…

"काय केलं होतं मी तुझं...हां...काय केलं होतं मी? माझी छेड काढलीस म्हणून तुझ्या थोबाडीत मारली होती ना मी? माझं आयुष्य बरबाद केलंस! माझ्या अब्रूचे लचके तोडलेस…भडव्या….तुझ्या सारख्या लांडग्यांमुळे आज या देशात मुली असुरक्षित आहेत आणि ज्या माझ्या सारख्या स्वतःसाठी उभ्या राहणाऱ्या आहेत त्यांना तुम्ही हे असं नासवता? सारिका प्रत्येक शब्दाबरोबर पट्टा ही चालवत होती आणि तो पट्ट्याच्या माराने विव्हळत होता, ओरडत होता, हात जोडून तिच्याकडे भीक मागत होता.

"त्रास होतोय तुला? त्या रात्री दारूची बॉटल फोडून माझ्या छातीवर मारलीस त्याचा मला किती त्रास झाला असेल? माझे ओठ तुझ्या सुळ्यांनी जेंव्हा फाडलेस तेंव्हा मला नाही का झाला त्रास?माझ्या गुप्तांगावर सिगारेटचे चटके दिलेस तेंव्हा नाही का झाला त्रास?
फोडलेल्या बॉटल ने माझी केसं कापता कापता माझं कपाळ सोलवटलंस तेंव्हा नाही का झाला मला त्रास?" सारिका आता रडू लागली होती. तिचा बीपी हाय झाला होता तिच्या सोबत असणारी डॉक्टरांची टीम तिला मेडिसिन देऊन शांत करते. पट्ट्याने फोडून काढलेल्या खुणांमधून रक्तस्त्राव होत होता.


"उठ बेटा… उठ… अशी थकू नको. याला जर आता पोलिसांसोबत पाठवलं तर हा सरकारकडून पोसला जाईल. याला शिक्षा होईल...पण तुझ्या मनावरच्या जखमा नाही भरणार. हा सुखासुखी आयुष्य जगेल जेलमध्ये. ही घे बंदूक….आणि दे तुझ्या गुन्हेगाराला शिक्षा.. आम्ही त्याचे आईबाप जरी असलो तरी तुझ्या बाजूनी आहोत. तुझ्यावर कुठलीच गोष्ट येऊ देणार नाही असं वचन देतो मी तुला.घे पोरी... घे."

सारिका बंदूक घेते आणि तिचा निशाणा साधते. नचिकेत हात जोडून आयुष्याची भीक मागत असतो. सारिका ट्रिगर दाबते आणि बंदुकीतून निघालेल्या दोन गोळ्या नचिकतेच्या छातीत लागतात आणि तो जागीच संपतो.

"शाब्बास पोरी….शाब्बास...त्याचा बाप म्हणून आम्ही दोघेही हरलो पण तुझा बाप म्हणून आपल्याला न्याय मिळाला याचा आनंद आहे. डॉक्टर… सारिकाला घेऊन जावा आणि शिंदे.. संध्याकाळी न्यूज चॅनेलवर बातमी येउद्या. आपण केलेल्या चुकीची जाणीव झाल्याने नचिकेत वैकुंठराव निंबाळकरांनी आत्महत्या केली."

"येस सर..सर….हॅट्स ऑफ यू...स्वतःच्या मुलाला शिक्षा देण्यासाठी पण काळीज तेवढं मोठं असावं लागतं आणि मॅम… तुम्हाला तर बोलायला शब्दच नाहीत. असे आईवडील असले असते तर आज मुलींचा बलात्कार झालाचं नसता."

"हो आबा… आमच्या मुलीला न्याय मिळावा म्हणून तुम्ही तुमच्या पोटच्या गोळ्याला गोळ्या घालून मारायला लावलंत यासाठी खूप हिम्मत लागते."


"अहो हा माझा लेक नव्हताच… हा तर राक्षस होता. आज सारिका आणि उद्या आणखी दुसरी कोणी असती. मी माझं कर्तव्य केलं. असे हात जोडू नका. बरं चला आता.. सगळे निघा आणि वेळच्या वेळी आपल्या ठिकाणावर जा. शिंदे ठरल्याप्रमाणे उद्या मीडियाशी बोला त्यांना कुठलीच शंका नको यायला. पहाट होत आली आहे आणि सारिका..नवी पहाट नव्या उम्मेदिने सुरू कर. आमचा आशिर्वाद कायम तुझ्या सोबत असेल. कसली गरज लागली तर हक्काने सांग.

समाप्त…..