आईपण मनात असते

Love

सुमित्रा एक गृहिणी होती.. संकेत तिचा नवरा  बँक मध्ये कामाला होता... लग्नाला पाच वर्षे झाली होती तरी मुलंबाळ न्हवतं, ती नेहमी दुःखी कष्टी असायची.. चेहऱ्यावर तिचे दुःख स्पष्ट जाणवायचे... संकेत तिला सतत समजवायचा.आपलं बाळ असावं ह्यासाठी कितीतरी उपास तापास करत होती, पण काही केल्या तिला मूल राहत न्हवते.... लग्नानंतर तिने एक वर्ष जॉब केला पण कोणीतरी तिला सांगितले सततच्या धावपळीमुळेसुद्धा आई होण्यास त्रास होतो.. त्यामुळे तिने जॉबसुद्धा सोडला...तिचे दोनदा मिसकेरेज झाले होते आणि त्या नंतर मुल राहतच न्हवतं...त्यात  सुमित्राची आई दोन वर्षांपुर्वीच  देवाघरी गेली होती.. आई होती तोपर्यंत  सुमी सर्व सुखदुःख तिला संगायची,पण आई गेली आणि अनके भावना मनातच दबुन  राहिल्या ,शेवटी आईसारखं समजुन घेणारं कोणी भेटेल असे नाहीच....त्यानंतर ती खूप एकटी पडली... स्वतःच्या विश्वात गुंग राहु लागली.....

एकेदिवशी तिच्या शेजारी नवीन जोडपं आले रहायला...राधा नाव होतं त्या बाईचे आणि नवऱ्याचे राघव.. राधाने गणेश पुजा ठेवली होती..सुमित्राला बोलावलं होतं... सुमित्रा गेली राधाच्या पुजेला...राधाने नवऱ्याची ओळख करुन दिली... घर सुंदर पद्धतीने सुशोभीत केलं होतं राधाने ..राधा मनकवडीच होती, तिने सुमित्राला सुमी म्हणुन हाक मारली.तसे सुमित्राच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि डोळे पाणावले कारण आई गेल्यावर सुमी म्हणुन हाक मारणार कोणीच न्हवते...ती हाक सुमीला सुखावुन गेली...दोघींची छान गट्टी जमली.. हळु हळु दोघी एकमेकींना समजुन घेत होत्या.छान पदार्थ केला की ,सुमित्रा आणि राधा एकमेकीना द्यायच्या... एकमिकांच्या मदतीला धावुन जायच्या.....

राधाच्या येण्याने ,सुमित्रा खुलली होती, सतत चेहरा पाडून बसणारी सुमित्रा आता चेहरा हसरा ठेऊ लागली..तिच्या नवऱ्यालाही छान वाटत होते.... बायको आता पहिल्यासारखी आनंदी राहते आहे.....


एक दिवस बोलता बोलता सुमित्राने राधाला स्वताच्या मनातली मुलबाळ नसल्याची , खंत बोलुन दाखवली ..तेव्हा राधा बोलली.. अग सुमी माझीही तीच अवस्था आहे तुझ्यासारखी पण मुल नाही होत ह्याच विचारात आयुष्य घालवायचं का???मातृत्व नक्कीच खुप अप्रतिम  सुख आहे  आणि प्रत्येक बाई त्या सुखासाठी वेडावली असते...पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात..आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्याचा सतत विचार करुन स्वतःला त्रास देणे कितपत योग्य आहे...मी ही तुझ्यासारखी सतत काळजीत असायची पण आता माझ्या घरी थोड्याच दिवसात माझं बाळ येईल.....

सुमित्रा: म्हणजे तू प्रेग्नेंट आहेस??

राधा: नाही गं..

सुमित्रा: मग???

राधा: अग मी आणि राघवने मुल दत्तक घेण्याचा विचार केला आहे..एवढ्या दिवस प्रोसिजर चालु होती पण आज सकाळीच राघवने सांगितले की, आपण बाळाला घरी आणू शकतो...

सुमित्रा:वा, अभिनंदन.....

राधा : मग तू पण घे एखादं मुल दत्तक...

सुमित्रा:बघु ग,अजुन काही विचार केला नाही....पण बाळाला आणताना नक्की सांग मीसुद्धा येईल तुझ्याबरोबर...

राधा: बरं, नक्की सांगेन..चल राघव यायची वेळ झाली जाते मी.....

राधा निघुन गेली....सुमित्राला दत्तक घेण्याविषयी, संकेत खुप वेळा बोलला होता पण,तील स्वतःच बाळ हवं होतं... म्हणुन ती त्याला नकार देत होती..... पण राधामुळे पुन्हा ती मुल दत्तक घेण्याचा विचार करू लागली.....

राधा , सुमित्रालाही  घेऊन गेली बाळ आणायल...वर्षभराची मुलगी होती ,खरं तर दोन जुळ्या मुली होत्या ....राधाने त्यातील एक मुलगी दत्तक घेतली होती.. राधाने त्या मुलीला जसं उचललं तसं तिची बहीण रडायला लागली.एकमेकींचे हात सोडत न्हवत्या... तो प्रसंग पाहुन सर्वाच्या डोळ्यात पाणी आले...

सुमित्रालाही ,फार त्रास झाला..दोन इवलेशे जीव आज विभक्त होत होते....ती घरी आली आणि खुप रडली..सकाळी उठल्यावर तिने नवऱ्याला आपण त्या बहिणीला दत्तक घेऊ, म्हणजे दोन्ही बहिणी नेहमी जवळ जवळ राहतील....आणि मला मुलगीसुद्धा मिळेल....

संकेतला तिची कल्पना फार आवडली..लगेच दोघे अनाथाश्रमात गेले आणि त्या मुलीला दत्तक घेतले.थोड्या दिवसाने सुमित्राने मुलीला घरी आणले आणि राधाकडे गेली..दोघी चिमुकल्या एकमेकींना घट्ट बिलगल्या..नेहमीसाठी जवळ आल्या होत्या .ते पाहुन राधाचेही डोळे तृप्त झाले...

शेवटी जन्म न देताही आई होता येतेच..... राधा ,सुमित्रा आईपण अनुभवत होत्या..आणि  त्या दोन मुलींना आई मिळाली होती..

अश्विनी पाखरे ओगले..
लेख आवडल्यास लाईक, शेअर ,कंमेंट नक्की करा..