आईपण

Mother

श्वेता एक साधारण मुलगी, तिचे बघता बघता लग्न झाले, सगळे कसे स्वप्न वाटत होते, नवे सासर, नवी नाती. या सगळ्यांना प्रेमाने वागून तिने सगळ्यांची मने जिंकली. अगदी सगळी सासरची मंडळी सुनेवर खूप खुश होती, असेच हसत खेळत एक वर्ष झाल, पण मनात एक भीती पण होती की आई पणाची चाहूल कधी लागेल, कधी तिचे आई होण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

मग काय सासू सारखी तिला अगदी घालून पाडून, टोमणे मारून बोलू लागली, बिचारी काय करणार वाद नको म्हणून सहन करत राहिली, आज नाही तर उद्या परिस्थिती बदलेल अशी आस मनी ठेऊन सार काही सहन करत होती, परत घरी समजले तर आई आणि बाबांना त्रास होईल या विचाराने गप्प होती, नेहमी बडबडणारी ती पण हे सगळे तिने सहन केले कारण तिला या सगळ्या पेक्षा आईपण महत्वाचे होते, तिला तिच्या नवऱ्याने या सगळ्यात खूप साथ दिली, घरात रोज होणारे लहान वाद, अश्या परिस्थितीत तिला त्याने खूप समजून घेतलं,
पण परिस्थिती काही सुधारत नव्हती कारण सासू जी श्वेता साठी आईसारखी होती तिनेच तिला तिच्या आई पणावरुन नको नको ते म्हंटले,शेवटी अगदी नाईलाज म्हणून तिने आई आणि बहिणीला सांगितले, श्वेताने या परिस्थिती मध्येसुद्धा  सासर आणि माहेर हे सांभाळून घेतले, शेवटी बहीण होती हुशार तिने तिला त्या दोघांची टेस्ट करायला सांगितली, जेणे करून सासूला खर काय आणि खोटे काय ते कळेल!
नवरा आणि ती एक दिवस टेस्ट करून आले आणि जेव्हा रिपोर्ट पाहिले डॉक्टरांनी तेव्हा कळलं दोष तिचा नाही तर त्याचा होता.
मग काय सासूचे टोमणे आणि कटकट बंद झाली, पण तरी तिने या परिस्थितीत हार न मानता, त्याची साथ सोडली नाही,ना ती हरली, ना आपल्या प्रेमाल हरवले, त्या दोघांनी मग योग्य उपचार केले आणि अस म्हणतात ना देवाच्या घरी उशीर आहे पण अंधार नाही, तिची प्रार्थना देवाने ऐकली, तिला काही दिवसातच मातृत्वाची चाहूल लागली,सगळं तिला अगदी स्वप्न सत्यात उतरले असे भासू लागले, तिला आइस्क्रीम खाण्याचे डोहाळे लागले, असेच खूप काही खावस वाटत होते आणि हे तिचे डोहाळे पण सासू आणि आई, भाऊ बहीण या सगळ्यांनी खूप पुरवले.
अखेर तो दिवस आला ज्याची तिने या वर्ष्यात खूप वाट पाहिली, जन्माष्टमीच्या दिवशी तिला हॉस्पिटलमध्ये नेले, त्रास खूप झाला तिला अगदी सिझेरियन केलं आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडीला तिला कन्या रत्न प्राप्त झाले.
बाळाला पाहिल आणि झालेला त्रास विसरली ती कारण तीच आईपण सिद्ध झाल होत आणि आता तिचं बाळ तिच्या कुशीत होत. खरच तिने देवाचे आभार मानले कारण  आज ती आई झाली होती पण...........

तिच्या मनात एक विचार आला कि आपण ज्या समाजात राहतो, किती तुम्ही शिक्षण घ्या, पदवी मिळवा काय त्याचा उपयोग नाही........
आज आपण एकविसाव्या शतकात आहोत पण आपण खऱ्या अर्थाने आपल्या विचारांनी प्रगतशील झालो आहोत का?
1. लग्न झाले कि लगेच आईपण सिद्ध झाले पाहिजे का?
2. आईपण म्हणजे काय तर फक्त स्वतःच्या पोटात नऊ महिने गर्भ वाढवणे आणि त्याला जन्म देणेच का?
3. आई होण्याची जवाबदारी सर्वंस्वी तिची एकटीच असते का?? जोडीदाराची पण असते मग दोष तिला एकटीलाच का?????
4. आपल्या बनावटी समाजात किती तरी अश्या स्त्रिया आहेत ज्या आई नाही होऊ शकत पण त्या अनाथ मुलांना दत्तक घेऊन आपले आईपण पार पाडतात,त्यांचे आयुष्य घडवतात.
5. अनाथांची आई ज्यांना आपण सिंधुताई सपकाळ(माई) म्हणून ओळखतो, आज त्या किती तरी अनाथ मुलांच्या आई आहेत आणि आपल्या त्या लेकरांवर मनापासून आईसारखे प्रेम आणि संस्कार करत आहेत.
6.आपल्या समाजात स्त्रियांना अजूनही प्रत्येक गोष्ट सिद्ध करावी लागते, मग ते आईपण असो कि सुनेची जवाबदारी, बायकोचे कर्तव्य, वहिनीची माया किंवा अजून काही असो का अस फक्त तिलाच तिच अस्तित्व सिद्ध करावे लागते??? संसार सांभाळणे, मुलांना शिस्त, सासू सासरे यांचे सगळे करण, सासरची माणसे जपणे, या सगळ्यात ती कुठेय????????

एक स्त्री पण रूप तिची अनेक, आपण नवरात्र मध्ये मूर्तीची पूजा करतो मग खऱ्या आयुष्यात प्रत्येक वेळेला का स्त्रीला सगळं सहन करावे लागते???????

श्वेताच्या मनात असे कितीतरी प्रश्न निर्माण झाले!!!! पण जरी आता या क्षणाला तिचे आईपण सिद्ध झाले असले तरी बाकी हे प्रश्न जे अजूनही तिला पडले आहेत खरच आहेत का आपल्याकडे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे?????

आईपण हे एक वरदान आहे कि एक स्त्री असणे आणि आई न होणे हा श्राप असणे??????


लेख आवडल्यास जरूर कळवा!!


श्रावणी देशपांडे????