आईच्या Savings

AAichya Saving


Saving

दोघे भाऊ आईला कोण आपल्या सोबत ठेवून घेणार मी की तू ह्यावरून भांडत होते...

मोठा भाऊ,"आई घरी आली म्हणजे त्याच्या घरात अडचण मग नसत्या उचापत्या..तिची नको ती लुडबुड.. नको ते प्रश्न..कुठे फिरायला जावे तर तिची सोय आधी करावी लागणार..".

छोटा भाऊ,"तिच्या समोर बायकोला नॉन veg इच्छा असून ही मन मारून टाळावे लागणार.. तिला भाकरी हव्या आणि त्या कराव्याच लागणार...तिला लवकर उठायची सवय तर ती पाळावी लागणार..."

छोटा भाऊ, "अरे दादा आईचे देव पूजा आर्चा आणि नको तितके नियम आणि कुळाचार..तर कधी कोणी आले भेटायला की त्याचा पाहुणचार.. "

मोठा भाऊ,"रोज नको नको ते बनवायचे आणि स्वतः तर खायचे आणि मुलांना ही त्याच चटफटर खाण्याची सवय लावायची... कधी दवाखाना तर कधी फिजिओथेरपी ह्यात पैसे उडवायचे... तिला जणू असे वाटते इथे पैशाचे झाड लागले.. "

"अग आणि परत काही म्हणालो तर म्हणते मी माझ्या saving मधून देईल परत..कधी कळलेच नाही हिला कुठून आली saving...आणि जरी दिले तरी लोक म्हणतीलच आईसाठी इतके ही करू शकत नाही का ही मुलं...त्यांना काय माहीत एकट्या आईसाठी किती खर्च करावा लागतो ते.. त्यांना काय जातंय सांगायला म्हणायला... ही दोघा भावनांची आणि त्यांच्या बायकांची ओरडत होती... म्हणूनच तर आई ह्या वयात तरी नको होती दोघा पैकी कोणाला ही..." छोटी सून


"58 व्या वर्षी आणि त्यानंतर ही बऱ्याच वर्ष आई चांगल्या हिंडत फिरत ,घरातली कामे तरी करत...मदत करत...मुलांना शाळेतून आणत..baby sitting चे ते पैसे तरी मग वाचवण्याचे काम करत...त्या कामाच्या तरी होत्या निदान...आता काय तसे काम ही नाही... " मोठी सून

"आणि त्यांना झेपत ही नाही..आता काही करा म्हणून सांगितले तर झेपणार ही नाही... खरे तर त्यांचं करणंच आता आपल्याला झेपणार नाही...तीन बेडरूम च्या छोट्या फ्लॅट मध्ये यांना कुठे ठेवायचे... त्यांना सांगितले तर खरे वाटणार नाही की आमची अडचण आहे आमची जरा आता तरी अडचण समजून घ्या... " छोटी सून


आई म्हणतात," आता मला भावनिक आधाराला तरी इथेच यावेसे वाटते.. तुमच्यात रहावेसे वाटते...तुमच्यात कसा दिवस कडेला जाईल हे देखील कळणार नाही.. परत म्हणणार मी वाटलं तर माझी saving देते... "

मेलं डोमल्याची saving तरी आहे का... आणि तोऱ्यात म्हणार माझी saving...मोठी सून बाई

काय असते saving ही माहीत नसेल त्यांना... पण आता नको ही म्हतारी बाई घरात... छोटी सून

/नवऱ्याला/यांना मात्र काही दोन रडले शब्द बोलले की लगेच माझ्या कडे आशाळभूत होऊन बघतील आणि म्हणतील अग राहूदे ग माझ्या आईला आपल्या सोबत, ती कुठे जाणार सांग कोण आहे तिला आमच्या दोघांशिवाय..." मोठी सून..

दोघे ही हात झटकू पहात होते, दोघांना ही अडचण होणार होती..आता काही तरी उपाय करायला हवा नाहीतर आई दोघांनी आलटून पालटून सांभाळू...आणि खूपच नाही जमले तर बाबांनी दत्तक घेतलेल्या मुलीकडे आईला नेऊन ठेवू असे दोघांचा विचार झाला...

आईला कोणाकडे ही जायचे तर आपली saving त्यालाच द्यावी लागणार होती म्हणून तिला कोणी सांभाळले तरी जो सांभाळेल त्याचा फायदाच होता..पण त्यांना आईची किती saving आहे हेच मुळात माहीत नव्हते.. वडिलांनी तिच्या नावावर काय केले हे ही माहीत नव्हते..

मग दोघा भावांचे ठरले नेहमी मुलांची का सांभाळायचे आईला,"आता मुलीला ही जबाबदारी घेऊ देऊ..."

तश्यात त्यांनी सांगितले साक्षी तू आईला सांभाळ...

तुला काही देणे लागत आहे असे तू म्हणायची ,आणि ते उपकार फेडणार आहेस तर आता ही संधी चालून आली आहे तुला आता आईला तू सांभाळले तर उत्तमच होईल " मोठा भाऊ म्हणत होता

मग आई मध्ये म्हणाली,"जो मला सांभाळून घेईल त्याला माझी प्रॉपर्टी आणि saving देण्यात येईल .."

नेमही प्रमाणे आईच्या saving चा मुद्दा आला आणि दोघे भाऊ हसायला लागले तश्या त्यांच्या बायका ही हसू लागल्या...

"saving saving saving... कोण जाणे कसली ही saving पण आईला कळत कसे नाही उगाच का saving ची गाजरे दाखवायची आम्हाला..." छोटा भाऊ.


दोघे हसले म्हणाले,अग अशी किती असणार saving... "

उलट तुझ्यावर saving पेक्षा जास्तच खर्च होईल...आणि काळजी करू नकोस तितके पैसे साक्षीला महिन्याला पाठवू आम्ही..तुला हवे ते देऊ... "मोठा मिस्कील पणे म्हणाला

आई , "माझी 50 लाख saving आहे,आणि तुझ्या बाबांनी माझ्या नावावर वाशीचे घर केले आहे, वाटले होते तुमच्या कामी येतील जर तुम्ही मला सांभाळले असते तर...मी मला तर सांभाळत आहे आणि राहील ही पण माझ्या saving च्या व्याजावर तुम्हाला ही सांभाळले असते...पण आता तुमचं ठरलंच आहे तर...विल नुसार माझी saving आणि वाशीचे घर साक्षीला देऊन जाईल..."

मला तुमच्या कडून हीच अपेक्षा होती, तसे वकील ही सोबत आणले आहे मी ,जे ह्या निर्णयाचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत...तुम्ही काम खूप सोपे केले माझे...नाहीतर मला प्रश्न पडला होता ..

आईचे हे बोलणे ऐकल्यावर दोघी सुना आणि लेक आईच्या हाता पाया पडू लागले होते, आता दोघे ही आईला संभाळायला तयार झाले होते.. आई माझी, तू माझ्याकडे ये...नको उगाच जावयाच्या घरी राहू...ते बरे नाही वाटणार... आम्ही तुझी काळजी घेऊ...तुला हवं नको ते बघू. तुझ्या सुना तुझी लेकी सारखी काळजी करतील..साक्षीला का उगाच त्रास...तिने का सतत तुझे करायचे तरी ..आम्ही काय मेलो का.
का उगाच त्या दत्तक घेतलेल्या मुलीकडे जायचे तुम्ही...


तितक्यात आई म्हणाली, "अरे कसली saving आणि कसली प्रॉपर्टी मी तर गम्मत करत होते. असे काही नाही माझ्या जवळ... तुम्ही तर माझी saving आणि तुम्हीच तर माझी खरी प्रॉपर्टी..."


हे बोलल्यावर दोघे ही भाऊ आणि त्यांच्या बायका आईपासून लांब झाल्या.. त्यांना आईचा ह्या गोष्टी चा राग आला ..तसे ते म्हणाले... आई तुझी saving असो वा नसो तू साक्षीकडेच रहा..


आई , " तुम्ही दोघांनी माझी अडचण अजूनच सोपी केली आहे,मी तुम्हाला एक संधी दिली होती मला सोबत ठेवण्याची ,आता निर्णय बदलणार नाही, माझ्या savings आणि माझ्या नावावर असलेली प्रॉपर्टी फक्त माझ्या मानलेल्या लेकीलाच जाईल."

तिने आपले समान उचलले आणि सरळ वृद्धाश्रमात आपली सोय करायचे ठरवले, लेकीला आपला त्रास होऊ नये म्हणून तिला काही जबाबदारी घ्यायला लागू नये आणि आम्ही तिला दत्तक घेतले म्हणून तिने त्या उपकाराची परत फेड करू नये असे आईला वाटत होते...तिला दत्तक घेणे हा निर्णय सर्वस्वी।आमचा होता मग तिच्या वर उपकार कसले...

साक्षी पुढे आली ,तिने आईच्या हातातील बॅग घेतल्या आणि आईला तिच्या घरी चालायला सांगितले ,"आई खरंच मला तुम्ही दत्तक घेऊन उपकार केलेच आहेत ,ते तुमचे मोठेपण की तुम्ही मला ह्या उपकरात ठेवू इच्छित नाहीत...पण मी ही तुमचीच मुलगी आहे...माझ्या आईच्या कोणत्याच जबाबदारीचा आणि तिच्या साठी माझ्या कर्तव्याचा हिस्सा कधीच डावलणार नाही... आई तुझ्याच कृपेने ह्यांना नौकरी आहे, सुदैवाने माझे घर हवे तितके मोठे आहे.. की त्यात माझ्या आईला पुरे पूर जागा आहे... वाटले तर आम्ही हॉल मध्ये ऍडजस्ट करू राणीला पण तुला तुझी वेगळी खोली देऊ...शिक्षण काय कसे ही करायचे ठरले तर अंधारात ही होऊ शकते, एका खोलीत ही होऊ शकते... मग आपली तरी condtion चांगलीच आहे...."

आईला तिच्या आपले पणात ओलावा जाणवला.. तशी ती साक्षीच्या घरी रहायला गेली, सोबत saving ही घेऊन गेली...तिची saving म्हणजे फक्त काही दागिने आणि काही पैसे होते... जे ती साक्षीला देणार होती...आणि बाकीचे ती साक्षीच्या छोट्या राणीला तिच्या शिक्षणासाठी देणार होती...

आईला घेऊन जाताना साक्षी आपले दैव घेऊन जात होती तर आईची जबाबदारी नाकारून हे दोन मुलं आपले दुर्दैव लिहीत होते... saving म्हणजे फक्त पैसे कुठे असतात saving म्हणजे दैव ही असते...भाग्य ही असते...तिचे पुण्य ही तुमच्या सोबत असते.. जे तुम्हाला हरेक संकटातून वाचवत असते बाहेर काढत असते.. आई तेच दैव असते जे सगळ्यांच्याच नशिबात नसते....