Login

आईची समजूत घालतांना भाग अंतिम

AAichi Smjut
आईची समजूत घालतांना भाग 4
अंतिम


सुधाच्या आईचा फोन आला आणि माय लेकी बोलू लागल्या,

तितक्यात सुधा चिडली आई वर आणि म्हणाली, आई काय हे नेहमीच तुझे...का सतत तू इतरांशी माझी तुलना करतेस, तुला माहीत आहे ना मी किती व्यस्थ झाले ते...

आई म्हणत होती, शेजारच्या कामिनी ताईंची रिमा आज घरी आली आहे ,आणि आज त्यांच्या घरातून नुसता बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज येत आहे...

दुसरे म्हणजे कामिनी ताईंनी आज छान जेवणाचा बेत आखला आहे, आज त्यांच्या घरी पुरण पोळ्या आणि भज्यांचा वास येत आहे..


त्यावर आई म्हणाली ,कामिनी ताईंनी आज बाजारातून हापूस च्या पेट्या आणल्या आहेत आणि त्यांचे नातू तुटून पडले आहेत आंब्यांवर..

इकडे आईचे बोलणे सुधा ऐकत होती, पण तिच्या कडून काहीच प्रतिसाद नव्हता ,तिची आईच खूप उत्साहात बोलत जात होती, कामिनी ताई अश्या ,त्यांनी असे केले ,त्यांची मुलगी रिमा तिने आईसाठी असे केले..

ते नातू आणि आजी आजोबा असे खेळ खेळत होते ,घर भर नुसता धिंगाणा होता ,किती आंनद होता त्यांच्या घरी...मला तर खूप भारी वाटत होते बघून त्यांचा तो आंनद आणि उत्साह...

इकडे सुधा ऐकत होती पण मुळात आईचा तिला राग येत होता...काय नेमके कामाची वेळ आणि आईची ही खबर..लोकांचे काय करायचे आईला, का लोकांच्या घरात काय चालले ते बघायचे..


आईला कळले सुधाने मध्ये फोन ठेवून दिला तो, आणि तिला आपले बोलणे पटले नाही ते..तिचे असे वागणे का कळत नाही सुधाला ,का कळत नाही ह्यातून मला काय सांगायचे आहे ते ,हे त्यांचा आंनद नाही ,हे माझ्या मनातले दुःख आहे का कळत नाही, का कळत नाही की मला काही सुचवायचे आहे ह्यातून...

आईने ही फोन केला नाही परत सुधाला, आणि सुधाने ही रागात आईला परत फोन नाही केला..


अश्यात खूप दिवस झाले आईचा फोन नाही आला,तिला आईची चिंता वाटू लागली होती..

झालेली बाब तिने रवीला सांगितली, त्याला ही वाईट वाटले ,त्याने ही अशीच बोळवण काढून त्याच्या आईची समजूत काढली आणि तेव्हा पासून तिचा ही फोन नाही आला..

तो....सुधा आई काय म्हणत होत्या बाजूची रिमा आली आहे माहेरी..ह्याचा अर्थ सरळ आहे ,तू ही माहेरी ये असे त्यांचे म्हणणे आहे..
कामिनी काकूंनी तिच्या आवडीचे पदार्थ केले म्हणजे तू ही ये मी तुला तुझ्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घालू इच्छिते..
कामिनी काकूंनी नातवांसाठी आंब्याच्या पेट्या आणल्या आहेत ,मग मला ही माझ्या नातवांसाठी आंब्याच्या पेट्या आणायच्या आहेत, घर कसे भरले आहे आनंदाने त्यांचे तसे माझे ही घर आनंदाने भरू दे ,असा पोसिटीव्ह अर्थ का घेतला नाहीस तू आईच्या बोलण्याचा ,म्हणायचा... का तू सतत त्यातून नकारात्मक अर्थ लावत असतेस..का तुला वाटले आई इतरांच्या घरात उगाच डोकावत असते...

तो खूप चिडला होता स्वतःवर तर चीड येतच होती ,पण सुधावर ही आणि तिच्या अश्या वागण्यावर ही चिडला होता तो, साधी गोष्ट होती आईला त्यातून काही सकारात्मक इशारा द्यायचा होता ,तिला फक्त हेच सुचवायचे होते की तू माहेरी ये तुझ्या मुलांना घेऊन ,मला तुझे माहेरपण करू दे, मला ही तसा आनंद मिळू दे...

सुधाला तिची चूक कळली होती, तिला समजले होते की ही वृत्ती चांगली नाही, सतत आई ला गृहीत धरून ती कशी कटकट करते आणि सतत कशी इतरांशी तुलना करते हा विचार करण्याऐवजी त्यातून फक्त पोसिटीव्ह बघत जावे हे का कळले नाही तेव्हा ,आईला काही तरी सुचवायचे हे माहीत होते तरी मी तिला समजू नाही शकले..

सुधा... अरे मी आता इथून पुढे प्रत्येक गोष्टीकडे जरा विचारपूर्वक दृष्टीने बघेन, पोसिटीव्ह angle ने पाहिल हे नक्की, आई वडील थकत चालले आहेत आणि त्यांना अजून मानसिक दृष्ट्या थकवण्याचे पाप मी इथून पुढे नाही करणार..

तो...एक करू शकतो ,आता इथून पुढे दिवाळी सोबत उन्हाळ्यात ही हक्क रजा टाकून आपण आई वडिलांना भेटायला जाण्याचा अलिखित नियम करू...किमान 20 दिवस फक्त त्यांच्या आंनदासाठी ते असतांना द्यायला हवेत आज त्यांची गरज खूप भावनिक आहे...उद्याच मी ऑफिसमध्ये कळतो, आणि तू ही कळव,आपण फोन न करता सरळ त्यांना गळाभेट देऊ..

ती... हीच खरी वेळ आहे ,मग तर त्यांच्या नंतर किती ही म्हंटले तरी कोणी वाट बघणारे नसतील रे..कोणाला आपल्या येण्याचे ,जाण्याचे काही ही पडलेले नसेल..ते आहेत तर वाट बघणारी प्रेमाची आपली माणसे आहेत, बाकी जग स्वार्थीच

तो... तू भावनिक होऊन चालणार नाही,आता तू तयारी कर, लगेच प्लेन ची तिकीट करतो पुण्याची..