Login

आईची पाखरं ... मायलेकी मिळून आकाशाला गवसणी घालू. भाग 3 (अंतिम)

मायलेकी

लक्ष्मी IAS officer झाल्याची बातमी हवेसारखी लक्ष्मीच्या वडिलांच्या घरी आणि सासरी पसरली होती .

" मला माहितीच होते लक्ष्मी ताई नक्कीच काहीतरी करून दाखवतील, त्या आधीपासूनच खूप हुशार होत्या. मी बाबांना किती समजावले , आई आणि लक्षमिताईंना घरी घेऊन येऊ. पण कोणी माझे ऐकतच नव्हते. ".... भावना

किशोरराव , ललित, भावना चाळीमध्ये नलूआजीच्या घरी सावित्रीबाई आणि लक्ष्मीला घ्यायला  आले होते .

तेवढयात राजेश, अल्काबाई, लक्ष्मीचे सासरेही तिथे पोहचले.

" या या, तुम्हीच राहिला होता " .... नलूआजी थोड्या खोचकच बोलल्या.

" लक्ष्मी ,पोरी, चल आपल्या घरी. घरची लक्ष्मी घरात नाही, तर घराचे घरपण हरवले बघ.  तुझ्याशिवाय बघ माझ्या पोराचे काय हाल झालेत. जगण्यातून मनच उडाले बघ त्याचे. काय अवस्था करून घेतलीये त्याने. " .....अल्काबाई

" आता बरोबर घरची लक्ष्मी आठवली तुम्हाला?? मुलाने जगणे सोडले म्हणे. दोन दिवस आधीच दिसला होता तुमचा मुलगा त्या चौकात...सिगारेट फुक्तांना. लक्ष्मी आमच्या घरची मुलगी आहे , ती आमच्या घरी येणार " .....भावना

तिचे बोलणे ऐकून अल्काबाई ढोबराणे राजेशला टोचत तू बोल म्हणून इशारा करत होत्या.

" लक्ष्मी , जे झाले ते विसरून जा. कोणत्या नवराबायको मध्ये वाद होत नाही की मतभेद होत नाही. पण किती असे ते ताणून धरायचे असते. चल आता मिटव सगळे, मी तुला माफ केले. चल आता आपल्या घरी जाऊ. नव्याने सुरूवात करू ." .....राजेश

" ओ अहो, आता ते तुमचे माफिचे कुठे गेले?? तुम्हीच म्हणाला होता ना , लक्ष्मी आणि आई तुमची सगळ्यांची माफी मागतील तर तुम्ही लक्ष्मीला घरात घ्याल. आता बरा पुळका आला आहे." .....भावना

" मी बोललो ना, मी तिला माफ केले. आता आम्हाला कुठल्याच माफीची अपेक्षा नाही. मला माझी बायको माझ्या घरी घेऊन जायची आहे , बस फायनल सगळे. " ....राजेश

" आणि तू काय ग आम्हाला सांगते आहेस, तुम्ही लोकांनी तर तिला घराच्या पायरीवर सुद्धा उभे केले नाही , तुमच्याच घरची लेक होती ना ती??तुम्ही तर तिच्यासोबत तिच्या आईला सुद्धा घराबाहेर काढलात." ....अल्काबाई

आता या दोघांमध्ये ' लक्ष्मी कोणाची '  यावर वाद सुरू होता. सावित्रीबाई आणि लक्ष्मी त्यांचे बोलणे शांतपणे ऐकत होत्या.

" बस, खूप झाले आता. आता लक्ष्मी अचानक तुमच्या सगळ्यांची जवळची झाली ना ?? आणि राजेशराव, तुम्ही कोण होता हो तिला माफ करणारे? नाही म्हणजे माफिलायक अशी कोणती चूक केली होती माझ्या लेकीने?? तुमच्यातला दोष तिने लपाऊन ठेवला , बाहेर जगासमोर नाही येऊ दिला..ती चूक होती??? की तुमच्या आईच्या मताप्रमाणे भाजी नाही केली , ती चूक होती?? जेव्हा बायको म्हणून ती एकटी पडली होती सगळ्यांमध्ये तेव्हा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायची वेळ होती तेव्हा कुठे होता हो तुम्ही तुमचा नवरेपणा गाजवायला ??? जेव्हा तुमची आई तिच्या हात उगारत होती, तेव्हा कुठे होतात तुमच्यातला नवरमानुस ??? जेव्हा तुमचे नातेवाईक तिला वांझोटी म्हणून हिणवत होते, तेव्हा कुठे होता तुम्ही??  तिची स्वप्न, तिच्या इच्छा पायाखाली तुडविले जात होत्या, तेव्हा कुठे होता तुम्ही ?? घरातून बाहेर पडली तेव्हा ती बरी आहे की नाही, थोडे सुद्धा विचारायची तसदी घेतली नाही ना तुम्ही. ती कुठे राहते, कशी राहते, कोण त्रास देत आहे काय??? तुम्हाला जाणून घ्यायची काहीच पडली नव्हती. आणि आज आलात हक्क सांगायला?"...सावित्रीबाई

ते ऐकून राजेशचा राग अनावर झाला होता.

" तुम्ही आम्हा नवरा बायको मध्ये न बोलले बरे, आम्ही आमचे काय ते बघू, तुम्ही मधात पडू नका. लिगली आम्ही अजूनही नवराबायको आहोत.  तसेही तुमच्यामुळे माझा संसार खराब झाला आहे  " ....राजेश

आपल्या लेकराला एक आई तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असते ,. मुलीला तर अगदी फुलासारखी जपते. वीस पंचवीस वर्ष तिची काळजी घेत , प्रेमाने वाढवलेल्या पोटच्या गोळ्याला दुसऱ्यांच्या हाती देतांना किती त्रास होतो हे एका मुलीचे पालकच समजू शकतात. आपल्या मुलीचे आयुष्य खराब होतांना उघड्या डोळ्यांनी बघत , कशी काय एक आई सहन करू शकते??? तिला लहानाची मोठी केली, तुमच्या घरी दिली , ते तीच आयुष्य घेण्यासाठी नव्हे .  बोलणाऱ्यान्ना बोलू देत, ' आईने मुलीचा संसार मोडला, आईच मुलीला चुकीच्या गोष्टी शिकवते , अन् काय काय. जेवढा उद्धार करायचा मुलीच्या आईचा, तेवढा करा . जे वाटेल ते करा. पण जर माझी मुलगी निराश असेल, त्रासात, दुःखात असेल तर मी तर बोलणारच, आणि प्रत्येक आईने बोलायलाच पाहिजे. आम्ही काय मुलींना जन्म तुमच्या घरी मरण यातना भोगन्या नव्हता दिला.  " ...... सावित्रीबाई

" आम्ही मुलाकडची असून सुध्दा मागचे सगळे विसरून, स्वतःहून आमच्या सुनेला न्यायला आलो आहोत तर तुम्ही आम्हालाच सूनवायला लागलात??तुमच्यासारख्या आयांमुळेच आजकाल तलाक चे प्रमाण वाढले आहेत .  " ... अल्काबाई

" बास, एक शब्द नाही माझ्या आईच्या विरोधात, नाहीतर मी विसरून जाईल तुम्ही कोण आहात ते " ... लक्ष्मीचा आवाज कडाडला.

"  देव, ब्राम्हण, मोठ्यांच्या साक्षीने लग्न केले होते ना, सात वचन घेतली होती ना???...एक तरी पाळलात त्यातली वचने??? तुमचा हाथ धरून आली होती ना त्या घरात , दिला मला गृहिणींचा मान?? मुलगी बनऊन ठेऊ म्हणाला होता ना सासूबाई, सून सुद्धा बनऊन नाही ठेऊ शकलात. आई जे बोलली ,ते अगदी खरे बोलली. तुम्हाला कोर्टाची डीवोर्स ची नोटीस भेटेल काही दिवसात. तुम्ही आता जाऊ शकता . " ....लक्ष्मी

लक्ष्मी चे ते रूप बघून आता राजेश थोडा वरमला होता.

" लक्ष्मी , अग माझेच चुकले. पण आता सगळं तुझ्या मताप्रमाणे होईल.  "....राजेश

" मी तुम्हाला तुमची उत्तर दिली आहेत. तुम्ही आता जाऊ शकता." ....लक्ष्मी

लक्ष्मीचे बोलणे झाल्यावरही ते लोकं तिथेच घुटमळत होते.

" ऐकले ना, निघा आता " .....भावना , भावना ला तर मनातून आनंद झाला होता की आता लक्ष्मी आपल्या घरी येईल ते.

राजेश आणि त्याचा परिवार चुपचाप मान खाली घालून निघून गेले.

" चला आई, लक्ष्मी ताई आता आपल्या घरी जाऊ. आपल्याला या अश्या लोकांची गरज नाही" ....भावना

" चल सावित्री , आपल्या घरी चल आता. तुझ्याशिवाय घर सूने सूने झाले आहे. लक्ष्मीबाळा चल आपल्या घरी. ते पण तुझेच घर आहे , तुझ्या आईला तर कळत नाही , तू तरी समजाव तिला ??" .... किशोरराव

वडीलांच्या तोंडून   ' बाळा ' शब्द ऐकून लक्ष्मीचे मन भरून आले.

" बाबा हा शब्द तुमच्या तोंडून ऐकण्यासाठी मला सत्तावीस वर्ष लागले हो. खूप संघर्ष करावा लागला या एका शब्दासाठी. नाही परवडला हो हा शब्द मला. मुलगी बापासाठी जड असते, पदोपदी जाणीव करून दिली हो तुम्ही मला. कधीकधी तर वाटायचे देवाने मला जन्मालाच का घातले?? स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला होता. आई नसती ना तेव्हा माझ्यासोबत तर आज कदाचित मी जिवंत नसते. मला फक्त आई आहे, बाकी माझे कोणासोबत कुठलेच नाते नाही आहे . "....लक्ष्मी

लक्ष्मीचे बोलणे ऐकून किशोररावांचे डोळे पाणावले.   आपण किती चुकीचे वागलो हे त्यांना आता कळले होते.

" एका माफ नाही करशील या बापाला ? एकदा चूक सुधारण्याची संधी दे " .... किशोरराव

" तुम्ही जे केले ते चूक नाही आहे , गुन्हा आहे. तुमच्यासारख्या लोकांच्या विचारामुळे लोकांना त्यांच्या घरी मुलगी नको आहे. गर्भात मुलगी आहे कळताच पोटातच तिचा जीव घेतला जातो , तिला या जगात येऊ सुद्धा देत नाहीत. मला माफ करा, पण मला ही संधी आता कोणालाच द्यायची नाही. " .....लक्ष्मी

" आई, तू तरी समजव लक्ष्मीला . चला आता घरी " ....ललित

"तू ऐकले नाहीस दादा, आता बाबा काय बोलले?? तुझ्या आईला काही समजत नाही. तुम्हा पुरुषांचे बरे असते, म्हणजे ती घर सांभाळते, बाहेर जात नाही , पैसे कमावून आणत नाही, म्हणून लगेच तिला काही कळत नाही म्हणून शिक्कामोर्बत करायचे. अरे तुमचा आमचा संसार चांगला व्हावा म्हणून ती घर निवडते, घरातल्या लोकांची मनोभावे काळजी घेते, सगळ्यांची मन जपते. तर लगेच तुम्ही तिला काही कळत नाही बोलून मोकळे होता. एका स्त्रीने मनात आणले ना तर ती तुम्हां पुरुषांपेक्षा कैक पटीने मोठी होऊ शकते. तिच्या ममतेला तिची कमजोरी नका समजू तुम्ही ." ...लक्ष्मी

" आई, अहो......" ....भावना काही बोलणार तेवढयात सावित्रीबाई बोलल्या.

" या वयात तर आता मी काही तुम्हाला घटस्फोट देणार नाही. पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नोटीस पाठाऊ शकता. आम्हाला आता आमच्या हक्काचे घर मिळाले आहे, जिथून आम्हाला बाहेर काढायची कोणाची हिम्मत नाही आहे, ना सासर ना माहेर, हे आमचं घर आहे, आमच्या हक्काचे. तुम्ही जाऊ शकता. " ....सावित्रीबाई

त्यांचे बोलणे ऐकून किशोर, ललित आणि भावना चुपचाप निघून गेलेत.

******

लक्ष्मीला आता ऑफिसर बनून दोन वर्षाचा काळ लोटत आला होता. ती तिचा कारभार उत्तमरीत्या सांभाळत होती. खूप उतारचढाव ती बघत होती.  खूप वेगवेगळ्या लोकांना ती रोज भेटत होती, वेगवेगळे अनुभव ती घेत होती. शिस्तीने आणि प्रामाणिकपणे ती आपले काम करत होती.

" लक्ष्मी , आता तू तुझे आयुष्य नव्याने सुरू करावे असे वाटते आम्हाला ." .....सावित्रीबाई

" आई, पण......."......लक्ष्मी

" लक्ष्मी तुझं फार काही वय झाले नाही आहे . आताही तू नव्याने सुरूवात करू शकते. आता तर चांगली मुलं सुद्धा भेटतील. " ......सावित्रीबाई
 

" हो पोरी सावित्री बरोबर बोलते आहे.  येवढं उभ  आयुष्य एकट्याने नाही जगता येत. आयुष्याचा कोणी ना कोणी सोबती लागतोच. तरुण वयात नाही वाटत गरज, पण म्हातारपण एकट्याने जगणे खूप जड होते.  नाहीतर हे बघ या म्हातरिकडे. तुम्ही नसता तर कोण पाहणारे होते. पोरबाळ, घरदार, परिवार सोबत असला की जीवनाचा शेवट बघ आनंदात जातो." .... नलुआजी

" आजी, आई मी तुमचा आणि माझा संसार बघितला आहे. आपल्या कोणाच्याच संसारात फार काही वेगळे घडले नाही आहे.  त्यावरून तरी कळले की आपण खंबीर असेल तर कोणाची गरज पडत नाही. का म्हणून आपण आपले आयुष्य एका पुरुषावर अवलंबून ठेवायचे?? कधी बाप म्हणून, भाऊ म्हणून, नवरा म्हणून की मुलगा म्हणून . नाही गरज मला आता या पुरुषी नात्यांची.  आणि परिवाराचे म्हणशील तर आपण आपला परिवार आताही बनवू शकतो, कुठल्याच पुरुषाशिवाय. " ......लक्ष्मी

" म्हणजे??? वेड बीड लागले की काय तुला ?"....सावित्रीबाई

सावित्रीबाईंच्या बोलण्यावर लक्ष्मी हसायला लागली.

" अगं आई , तू वेगळाच अर्थ घेते आहे... मी समजाऊन सांगते बघा... आता मी कामाच्या निमित्ताने खूप गावोगाव फिरले आहे. खूप लोक संपर्कात आली, सोबत त्यांच्या समस्याही. माझ्या सारख्या खूप लक्ष्मी आहेत बघ, वेगवेगळ्या कारणांनी घरातून हकालेली. त्यांना तुझ्यासारख्या आईची गरज आहे बघ. तुझ्यासारख्या आईचा हात डोक्यावर असला नी की बघ सगळ्या लक्ष्मी कश्या परत हसायला लागतील.त्यांना मायेची, आधाराची गरज आहे, आणि हे काम तुम्हा दोघी शिवाय कोण करू शकते??? बोला मग तयार आहात ' आपला परिवार वाढवायला ' ?? मायलेकी मिळून आकाशाला गवसणी घालुया . उंच उंच उडूया सोबत बाकीच्या बाईलेकींना घेऊया. बोला तयार आहात??" .....लक्ष्मी

" वाह ग पोरी, वाह.....माझ्या सोन्याचे चीज केले बघ. चल मी तयार आहे. " .... नलुआजी

" हो मी पण तयार आहे. परत कोणी ' मुलगी जड असते, जीवावर बोझ असते " नको म्हणायला" ..... सावित्रीबाई

******

चार  वर्ष नंतर......

" कुठे जायचे ताई??" ...ऑटोवाला

" आईची   पाखरं " ...... ती

" खूप छान निर्णय ताई स्वाभिमानाने जागा .  चला दहा मिनिटात पोहचवतो " ...म्हणतच ऑटोवाल्याने ऑटो सुरू केला.  आणि काही क्षणातच ती तिथे पोहचली होती.

" आईची पाखरं ..... मायलेकी मिळून आकाशाला गवसणी घालू " ... त्या आश्रमाची टॅग लाईन .....तिथे आज दोनशे च्या वर काही बायका मुली स्वतःच्या इच्छेने अभिमानाने जगत होत्या. स्वतः ची स्वप्न पूर्ण करत होत्या. आणि मुख्य म्हणजे आनंदी खुश राहत होत्या, जो प्रत्येक मुलीचा अधिकार आहे.

*******

म्हणून कोणीतरी म्हटलेच आहे ना मित्रांनो

" आईसाठी सगळं सोडा
  पण
कोणासाठी आईला नका सोडू "

*******

समाप्त

******

नमस्कार फ्रेंड्स 

या  कथेला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्या बद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. 

एक नवीन रहस्य कथा सुरू करते आहे ' दुर्गा ' , नक्की वाचा आणि कळवा ... चुका असल्यास त्याही कळवा....लिखाण चांगले करण्यासाठीं आपले शब्द खूप उपयोगी पडतात. आणि उत्साह सुद्धा वाढतो.