आईची नौकरी

या दिवशी घरात ट्रेनिंग सेशन रंगलं, सुरेखाने सिद्धी सौमित्राला त्यांच्या वस्तू कुठे आहे आणि त्या कशा ठेवायच्या ते दाखवलं, सुरेश लाही त्याच सामान रूमाल पाकीट चाव्या कुठे असतात ते दाखवलं,


आईची नौकरी

©️®️शिल्पा सुतार
........

आज सकाळी सुरेखा छान बागेत फिरून आली, मस्त मूड होता तिचा, घरात पाऊल ठेवलं तर सगळीकडे पसारा पडलेला होता, मुलगी सिद्धी उशीर होतो म्हणून चिडचिड करत होती,

" माझा आवरल्या शिवाय कशाला जातेस ग आई तू फिरायला",..

"सिद्धी तू लहान आहेस का आता? तुझ्या हाताने घेत जा सगळ, मी तुझ्या वयाची होते तेव्हा.......", सुरेखा

"पुरे झाल आई तुझं पुराण, तेच तेच सांगते नेहमी",.. सिद्धी

सौमित्र शाळेत गेलेला होता, आता एकदाची सिद्धी कॉलेजला गेली

"शांत शांत म्हणून किती सहन करायचं काही लिमिट आहे की नाही या गोष्टीला? मी काही बोलत नाही म्हणून सगळे त्रास देतात मला",.. सुरेखा कामाला लागली, घरातले सगळे तसेच पसारा टाकून गेले होते, अगदी नको नको झाला होत तिला या सगळ्या गोष्टीच

तेवढ्यातच सासुबाईंनी आवाज दिला,..." सुरेखा अगं माझ्या गोळ्या कुठे आहेत? ",

" आले आले ",.. सगळे मलाच बोलतात की तुला काही माहिती नाही, तुला काहीच येत नाही आणि खरं तर सगळं मलाच माहिती आहे, मीच काळजी घेते सगळ्यांची, ती सासुबाईंच्या रूम मध्ये गेली, तिने सासूबाईंना गोळ्या दिल्या, त्यांना व्यवस्थित आराम करायला सांगितला आणि ती परत आवरायला किचनमध्ये आली

आज आईची खूप आठवण येत होती, आईची अशीच धावपळ व्हायची, पण आपण त्यावेळी तिला मदत करायचो, आताची मुलं अजिबात जागचे हलत नाहीत, अजिबात मदत करत नाहीत घरात, सकाळीच बघितलं ना सिद्धी नुसतीच उठली आणि कॉलेजला गेली, पाच मिनिटं आधी काही उठत नाही ती, अजिबात काही करत नाही, माझंही ऐकत नाही, कसं होणार आहे तिचं पुढे? काळजी वाटते मला या मुलीची?,

स्वयंपाक झाला, सासूबाईंना जेवायला वाढलं, ती जेवायला बसणार तेवढ्यात शाळेतुन फोन आला, शाळेत कोणीतरी सौमित्रची कंप्लेंट केली होती, आई-वडिलांना दोघांना शाळेत बोलवलं होतं, तिने नवऱ्याला सुरेशला फोन केला,

सुरेशच्या कपाळावर आठ्या होत्या,... "माझी इथे महत्त्वाची मीटिंग आहे आणि काय चाललं आहे तुमचं? तुला अजिबात मुलांकडे लक्ष देता येत नाही का ग? काय करून ठेवला आहे उपद्व्याप आता सौमित्रने?",

" अहो मला ही माहिती नाही तेच बघायला जायचं आहे ना शाळेत, तुम्ही माझ्यावर काय चिडता आहात, आता शाळेत जात जावू का रोज मी त्याच्या सोबत ",... सुरेखा

" हो हो ठीक आहे उगीच जास्त बोलू नकोस, काय करत असते तू दिवसभर घरी?, येतो मी आवरून ठेव तू ",... त्यानेही दोन चार वाक्य ऐकवले तिला

आता मात्र सुरेखा खूपच चिडली होती, असं वाटतं की सगळं सोडावं आणि कुठेतरी दूर निघून जावं

दोघ शाळेत पोहोचले सौमित्र प्रिन्सिपलच्या ऑफिस बाहेर बसलेला होता, शर्ट फाटलेला मातीचा भरलेला होता बरोबरीच्या वर्गातल्या मुलाबरोबर मारामारी झाली होती त्याची, प्रिन्सिपल सर खूप रागवले या सगळ्यांना,

सुरेशने दोघांना घरी सोडलं आता मात्र यावेळी सुरेशने अजिबात सोमित्रला रागवलं नाही, मलाच मात्र आधी दोन शब्द सुनावले, आता वेळ होता खरं सन्मित्रला रागवायचं ना, त्याला बोलायला हवं होतं, पण नाही बोलला सुरेश त्याला काही, मुल आहेत मारामाऱ्या होतात,

म्हणजे ते त्यांचे त्यांचे नीट राहतात आणि माझा नंबर आला की मला सगळे मिळून बोलतात, मी सोपी सापडते तोंड सुख घ्यायला, माझ्या मनाचा विचार कोणी करत नाही, सुरेखा आता खरच नाराज झाली होती

सुरेशच्या आईचे काम मलाच करावं लागतं, माझ्या घरच्यांचे मलाच करावं लागतं, कधी सांगितलं की आईकडे चला माझ्यासोबत तर येत नाहीत ते आणि त्यांच्या आईच मात्र मी सगळं काम करायचं? ते त्यांच्या मुलांना रागवत नाहीत, मला मात्र बोलायला ते नेहमी तयार असतात,

सिद्धी ही काही महत्त्वाचं असल की बाबांना सगळं सांगते , आईला जस काहीही समजत नाही आणि काही काम असलं, काही खायला मागायचं असतं की आई आठवते, सौमित्रही आता हल्ली असाच करतो, पैसे हवे असले बाबांना काही सांगायचं असलं की मी आठवते, त्याचं काम झालं की तो कधीच माझ्याशी नीट बोलत नाही, दोघ मुल असे नव्हते आता झाले असे, सुरेखा चिडली होती

मी आता मी या सगळ्यात अंग काढून घेणार आहे, किती हुशार होती मी पूर्वीपासून, बरोबरीच्या मैत्रिणी हेवा करायच्या माझे मार्क बघून, आता काय झालं आहे माझं, सांगकाम्या नोकर झाली आहे मी, सगळ्यांनी गृहीतच धरलं आहे मला, हे थांबलं पाहिजे, मी स्वतः यातून मला मुक्त करेन, स्वतःचा मान मी स्वतः मिळवेन

दुसऱ्या दिवशी पटकन आवरून सुरेखा घरातुन निघाली समोरच एक मोठा क्लास होता तिथे ती कागदपत्र घेऊन पोहोचली, मी बाहेर जाहिरात बघितली की इथे टीचर हवी आहे मी ॲप्लिकेशन द्यायला आली आहे, तिला आत मध्ये पाठवलं, छोटासा इंटरव्यू झाला, तिच्या डिग्री बघून लगेच काम मिळालं, इंटरव्यू साठी एक छोटासा तास तिला घ्यायला सांगितला, मुळातच हुशार असलेल्या सुरेखाने खूप छान शिकवलं, सर ही खुश होते तिच्यावर, किती तास देऊ शकता तुम्ही दिवसातले, तिने सहा तासाचा काम स्वीकारलं, पगारही बऱ्यापैकी होता, त्यापेक्षा आपण काही करतो हा आनंद मोठा होता, सुरवातीला थोडा ट्रेनिंग असेल, मग रेग्युलर क्लास घ्या तुम्ही,

ठीक आहे..

आनंदाने ती घरी आली उद्या सकाळी सातला तिला क्लासला जायचं होतं, दुसऱ्या दिवशी जे शिकवायचं होतं त्याचे नोट्स तिने घरी आल्यावर काढायला घेतले तिच्याकडे काम करणाऱ्या मायाला तिने घरी बोलवलं, माया आज पासून येथे दोघी वेळचा स्वयंपाक ही कर, धुणं-भांडी झाडू फरशी सोबत माया स्वयंपाक करून गेली, मुलं घरी आली, आई जेवायला वाढ,

"आजपासून तुम्ही सगळ्यांनी तुमच्या हाताने जेवायला घेऊन घ्यायचं",.. सुरेखा

"तू काय एवढं महत्त्वाचं काम करते आहे आई",.. सौमित्र

"आहे मला महत्त्वाचं काम, मला उद्या सकाळी सातला क्लास घ्यायचा आहे त्याची मी प्रॅक्टिस करते आहे, मला डिस्टर्ब करू नका मला नोकरी लागली आहे ",... सुरेखा

आईला नोकरी मिळाली आहे ही बातमी पूर्ण घरभर पसरली, सगळे येऊन सुरेखाला विचारत होते, काय नोकरी मिळाली? किती वेळ आहे? सुरेश घरी आला त्याला समजलं की सुरेखाला नोकरी लागली आहे, तो ताबडतोब रूम मध्ये आला, सुरेखा नोट्स घेत होती,

" सुरेखा तुला हा जॉब करता येणार नाही, आई घरी एकटी राहील तिच्याकडे कोण लक्ष देईल?",... सुरेश

"तुमची आहे आई आहे तिच्याकडे तुम्ही लक्ष द्या, आठवल का काही, माझी आई अ‍ॅडमिट होती तेव्हा हेच बोलले होते ना तुम्ही, माझी आई किती वर्ष झाले एकटी राहते तिला कधी वर्ष दोन वर्षात तरी तुम्ही भेटायला गेले आहात का? मी माझं काम करणार, मी नौकरी करणार, नसेल पटत तर मी उद्यापासून माझ्या आई इकडे राहायला निघून जाईल, मी ठाम आहे आता माझ्या विचारावर ",.. सुरेखा

" काय झालं आहे सुरेखा आज तू इतकी काय काय चिडली आहेस ",.. सुरेश

" तुम्ही प्लीज मला गृहीत धरणं बंद करा, मला माझे काम आहेत मी माझा महत्त्वाचा वेळ आजपासून तुमच्या लोकांसाठी वाया घालवणार नाही, एवढी जर आईची काळजी असेल तर तुम्ही जरा उशिराने ऑफिसला जात जा, नाहीतर त्यांना सांभाळायला कोणीतरी मदतनीस ठेवून घ्या ",.. सुरेश

सकाळ झाली, तिच आवरून सुरेखा क्लासला निघून गेली, रोजच्या सवयी प्रमाणे सुरेश उशिरा उठला, माया पण स्वयंपाक करून चहा करून सगळं झाकून निघून गेली होती, सुरेशने स्वतः उठून चहा नाश्ता वाढून घेतला, स्वतःचा डबा स्वतः भरून घेतला, तो ऑफिसला निघून गेला, जरा वेळाने सिद्धी उठली तिला आधीच उशीर झाला होता, कुठलीच गोष्ट सापडत नव्हती तिला, खूपच उशीर झाला होता तिला निघायला, ती काहीही न खाता कॉलेजला चालली गेली, सौमित्रचही तेच हाल झाले, अर्ध्या वह्या न घेता न काही खाता, डबा भरून तो शाळेत गेला, सासूबाईंनी त्यांच्या हाताने जेवून घेतलं स्वतःच्या गोळ्या स्वतः घेऊन घेतल्या, संध्याकाळी सगळे घरी आले

" सुरेखा तू रोज सकाळी आमचा आवरून क्लासला जात जा",.. सुरेश

"ठीक आहे, मग उद्यापासून सगळ्यांनी पहाटे पाचला उठत जा म्हणजे मी तुमच्या सगळ्यांच आवरून देईल आणि मी साडे सहाला घरातुन निघत जाईल",.. सुरेखा

हा विचार कोणालाच पटला नाही, ठीक आहे आम्ही आमचा आमचं घेऊन घेऊ, पण सगळ्या गोष्टी कुठे आहेत एकदा आम्हाला दाखवून दे

या दिवशी घरात ट्रेनिंग सेशन रंगलं, सुरेखाने सिद्धी सौमित्राला त्यांच्या वस्तू कुठे आहे आणि त्या कशा ठेवायच्या ते दाखवलं, सुरेश लाही त्याच सामान रूमाल पाकीट चाव्या कुठे असतात ते दाखवलं,

आधी एकदा तिने हे अस सांगितल होत की वस्तू नीट ठेवा, पण तेव्हा तीच कोणी ऐकल नव्हत,

सासूबाईंचा प्रश्नच नव्हता त्या चांगल्या होत्या फक्त त्या सगळ्या गोष्टी सुरेखाच्या हातून घेत होत्या, आता त्या सगळ्या गोष्टी स्वतःच स्वतः करत होत्या, सगळं घर आता बऱ्यापैकी स्वावलंबी बनलं होतं, आणि सुरेखालाही तिचं काम मिळाल होत, ती आनंदी होती, ती आता तिच्या क्लास विषयी बोलत होती छान, तिला ही मैत्रिणी होत्या आता, ती ही गेट टुगेदर पिकनिक ठरवत होतो त्यांच्या सोबत, कधी कधी सासुबाई येत होत्या तिच्या सोबत, स्वतः चा वेळ छान घालवत होती ती

खरं तर काही गरज नाही तिला नौकरीची, तरी तिने करायला हवी नौकरी स्वतः साठी, स्वतः च्या आनंदा साठी.....