आईचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी कोणाची... भाग 2

" हे काय करून ठेवलं सारिका? सगळा पसारा आवर, तुम्हा दोघांना इतर वेळी थोडी आईला मदत करता येत नाही का? म्हणजे कामाची सवय राहील


आईचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी कोणाची... भाग 2

©️®️शिल्पा सुतार
..............

रोज प्रमाणे सगळे जेवायला बसले जो तो आपल्या गप्पा करत होतो

" मला काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी",.... आशा

"बोल ग आई",...... सारिका

"मी पुढच्या आठवड्यात पिकनिकला जाते आहे पाच दिवस",..... आशा

"पुढच्या वेळी जा तू आशा, मला महत्वाची मीटिंग आहे तेव्हा पण मग घरचं कसं होणार",..... रमेश

"काय व्हायचं आहे घरच, नाही तरी माझं काम काही विशेष नाही, जे मी घरी स्वयंपाक करते ते बाहेरून पण तुम्ही घेऊन खाऊ शकतात, मी सांगते आहे मी जाते आहे विचारत नाही मी जाऊ का अस ",...... आशा आज पूर्ण तयारीत होती

" पण आपल्याला पुढच्या आठवड्यात घरी जायचं होतं ना आईला भेटायला ",..... रमेश

" काही गरज नाही दोन दिवसांनी सासुबाई येणार आहेत इथे रहायला आठ-दहा दिवस, मी घरी नसताना त्यांना काही काम सांगायचं नाही, ज्याने त्याने ज्याचं त्याचं काम करायचं आणि आजीचा आई स्वयंपाक करून ऑफिसला जायचं",....... आशा

" ठीक आहे आई तू जाऊन ये ",..... सौरभ

"हो मी जाणारच आहे मी ",.... आशा

" आशा आम्हाला जाऊ की नको हे विचारण तुला कमीपणाचं वाटतं का ",..... रमेश आता चिडला होता

" नाही तसं नाही तुम्ही पण सगळे तुमचा कार्यक्रम बाहेर ठरवून येतात आणि मला फक्त सांगतात की मी उद्या इकडे तिकडे जाणार आहे तेव्हा पण मला असंच वाटतं ना, तसाच मी पण माझा कार्यक्रम ठरला ठरवला आहे, काही प्रोब्लेम आहे का ",....... आशा

उत्तराची अपेक्षा न करता आशा तिच्या रूम मध्ये निघून गेली....

दोन दिवसांनी सासुबाई आल्या, जेवण झालं आराम झालं आशाने त्यांना या घरची सगळी परिस्थिती समजून सांगितली

" हे तिघे अजिबात ऐकत नाही, माझ्याशी कोणी बोलत नाही, घरचे काम करत नाही, मला मोलकरीण करून ठेवल आहे, अजिबात कोणी विचारत नाही, नीट वागत नाही, मला डिप्रेशन च्या गोळ्या सुरु आहेत, कोणाला माहिती नाही मी गोळ्या घेते ते, मला ही कोणाला सांगावसं वाटलं नाही , मी ट्रीप नंतर तुमच्या सोबत थोडे दिवस गावी येणार आहे " ,....... आशा

सासुबाईंनी सगळ ऐकुन घेतल,....." मी बघते काय करता येईल ते, तू काळजी करू नको तू ट्रीप ची तयारी कर",..... सासुबाई

आशा दोन दिवसानी ट्रीप ला निघून गेली......

सकाळी रमेशने उठून चहा केला, सगळ्यांनी चहा बिस्किट खाल्ले कप तसेच पडू दिले पुढे टेबल वर, तिघे तयार होऊन आले

" आजी तू दुपारी काय खाणार आहेस",...... सारिका

" तू बनवले नाही का काही? माझ्यासाठी उपमा बनव, मग जा ऑफिसला",...... आजी

"नाही आजी मला उशीर होतं आहे मी आता ऑर्डर करून देते ऑर्डर घरी येईल तू ती घेऊन घे",...... सारिका

ठीक आहे.....

जरा वेळाने कामवाली कामाला आली तिने सगळं आवरलं आणि ती निघून गेली...

संध्याकाळी तीघे घरी आले, परत बाहेरून जेवण मागवलं यावेळी सारिका ने कामवाल्या बाईला फोन केला आणि तिला उद्यापासून स्वयंपाकाला ये असं सांगितलं, तिने साफ नकार दिला त्या वेळात माझे दुसरे काम असतात मला तुमच्याकडे स्वयंपाक करायला जमणार नाही....

आता पुरता नाईलाज झाला रोज एक एकाने लवकर उठून स्वयंपाक करायचं ठरलं....

दुसऱ्या दिवशी सौरभ सारिका लवकर उठले दोघांनी कशीतरी भाजी पोळी केली....

" हे काय करून ठेवलं सारिका? सगळा पसारा आवर, तुम्हा दोघांना इतर वेळी थोडी आईला मदत करता येत नाही का? म्हणजे कामाची सवय राहील, हे काम तुमच्या दोघांकडून सुद्धा आवरत नाही, ती आशा अनेक वर्षे एक तर हे सगळं काम करते आणि तुम्हाला तिची काही किंमत नाही, साधे तुम्ही प्रेमाने ही बोलत नाही ना तिच्याशी, तुम्हाला माहिती आहे का आशा आजारी आहे ते ",..... आजी

सौरभ आणि सारिका एकमेकांकडे बघत होते, काय झाल आजी मम्मी ला....

" तुम्ही च विचारा ती आल्यावर",..... आजी

" ते काही नाही आज सगळा पसारा आवरून जा, काल तुम्ही सगळे चहाचे उष्टे कप तसेच सोडून गेले होते ती बाई घेत नाही सगळे भांडे, माझ्याकडुन एवढ आवरण होत नाही",..... आजी

🎭 Series Post

View all