आईची सोय करतोच मी भाग 22

AAichi Soy


ईला मनात विचार करून घरात पाऊल टाकते, तर समोर दादा उभाच असतो,ती बघून आणि त्याला हॅलो दादा म्हणून पुढे जाते,कारण त्याच्या चेहऱ्याकडे बघून आता तो चिडणार रागावणार आणि परत उशीर का झाला हे नक्कीच विचारणार ,आणि मग मला त्याच्या डोळ्यात तो राग पाहून किती ही खोट बोलायचं म्हटले की अगदी अवचित खरं बाहेर पडते,तो जशी जशी उलट तपासणी घेईल तसे तसे मी खरे बोलून जाते,भीती वाटते दादाची ,नाही पटले तर मग त्याची शपथ घ्यायला लावतोच आणि मग मला त्याची शपथ नको वाटून मी आहे ती खरी खरी कहाणी सांगते...माझ्या भल्यासाठी जर तो हे असे वागत असेल तर मी ही त्याची काळजी घ्यायला हवी..म्हणून मी दादाच्या सगळ्या गोष्टी ऐकत.. अरे मला त्या ऐकाव्याच लागतात...आहेच तो तसा खडूस मोठा भाऊ..मोठा म्हणून सहन करावे लागते ,दरवेळी मग माझी कुचंबणा होते, आज मला काय जे मनात आहे ते मी जेव्हा रामला सांगून टाकेन हे ठरवून आले होते तो दादा समोर उभा ,जणू वाटत होते की माझ्या आणि राम मधला हड्डी होणार आहे.. बाकी कोणी नसेल पण दादाला राम कधीच नाही आवडणार.... त्याचा माझ्यावर खूप जीव आहे आणि म्हणूनच तो ते होऊ देणार नाही.. पण दादाला ही प्रेम होऊ दे देवा मग कळेना प्रेमात किती हुरहूर असते ती...मग त्यात कोणी ही अडथळा नको असेल त्याला ही...कोणी तरी त्याला ही भेटू दे...प्रेमाची किंमत दादाला ही कळू दे...कधी प्रेमाने वागतच नाही नुसती आपली दादागिरी करत असतो... आज ना उद्या मी कोणाची तरी होणारच आहे ना मग इतके का हा माझ्या आयुष्यात कोण आले कोण गेले ह्या बाबत जागरूक रहात असतो... ए दादा आज तरी निदान मला काही विचारू नकोस हं... plsss plsss देवा दादा ला दुसऱ्या कामात गुंतव...त्याने मला आज का उशीर झाला हे विचारू देऊ नकोस... काही तरी चमत्कार कर देवा....

ईला खूप घाबरलेली होती ,आता दादा परत नको तेच विचारणार... लगेच रूम चे दार उघडणार इतक्यात... दादा मध्ये आडवा आलाच

कुठे ,कुठे होती स्वारी....दादा

अरे आज शेवटचा दिवस होता कॉलेज चा... ईला

हो पण कधी सेंडोफ संपला आणि सगळे कधीच घरी गेले ....दादा

अरे दादा मी तर म्हणजे आम्ही तर तिथेच होतो अजून ही गप्पा मारत ....ईला

कुठे !!तिथे कुठे ? ....दादा

अरे किती तू चौकस आहेस रे दादा, आता मला ही समजते माझी काळजी मी ही घेऊ शकते ना..रागात ईला बोलून गेली

तुला काळजी नाही तुझी म्हणूनच मला बोलव लागत आहे...दादा आता आवाज वाढवून बोलला

नाही ,आता नाही घ्यायची हं तू माझी काळजी,आई बाबा आहेत ना त्यासाठी, मी काही कुकुल बाळ नाही,मी माझी समर्थ आहे त्यासाठी.... ईला अजून जोरात आवाज वाढवून बोलली..

ईला तू कधी पासून उलट बोलायला लागलीस,हे सगळे संगतीचे परिणाम आहेत तुझ्या सोबत असणाऱ्या मित्रांचे... दादा आता चिडला होता

ईला..?हो तसेच आहे समज पण आता तू मला आत जाऊ दे,मी थकली आहे..

मी आलो होतो तुला घ्यायला कॉलेज मध्ये,तुमची पार्टी संपल्या नंतर,तर तू मला कुठेच दिसली नाहीस..ना कोणी तुझे मित्र होते...मग तू कुठे होतीस... कोणासोबत होतीस तू ईला.. ..दादा चांगलाच बोलत होता..

ईलाला आता खरे सांगण्याची भीती वाटत नव्हती कारण ती चुकीचे वागत नव्हती,आणि लगेच बाजूला purse टाकून, तिच्या बेड चा door लावून आता गेली आणि कपडे बदलून तशीच पुन्हा बाहेर आली,तोपर्यंत ती शांत झाली होती असे ती दादा सोबत बोलत होती...

हम्म,आता बोल दादा तुला काय म्हणायचे ते नेमके...मी अजून कुठे जाणार दुसरीकडे,मी रीमा आरती आणि वेध सगळे सोबत होतो, त्याच्या घरी,त्याने आम्हा सगळ्यांना treat दिली होती म्हणून आम्ही गेलो होतो... ईला तावात कमी आणि नमते घेऊन बोलत होती..त्यात आरतीला आम्ही लवकर घरी सोडून आलो आणि इथे वेध आणि रीमा मला सोडवायला आले होते.. त्यांच्या मध्ये काहीतरी मिस understanding झाले होते आणि त्यासाठी ते दोघे बराच वेळ बाहेर बोलत होते आणि मी त्यांना सोबत म्हणून उभी होते मग ते गेले आणि मी आत आले..simple
म्हणून तर वेळ लागला मला..

ती आरती बघ किती समजदार मुलगी आहे,तिला तिच्या घरच्यांची किती काळजी आहे आणि म्हणून ती लवकर गेली ...आणि तू अजून ही रीमा आणि वेध सोबत होतीस... बरे तरी मी आरतीला फोन लावून तुझ्या बद्दल विचारले ,आणि तेव्हा तिने सांगितले की ती लवकर घरी आली ,पण तू कुठे आहेस ते तिला माहीत नाही...

Oh.. तर तुला हे आरती कडून कळले की मी कुठे आहे तर...ग्रेट आहे आरती चोराच्या उलट्या बोंबा,मानले हा आरतीला... ईला

अग एकवेळ आरती सोबत तू असली तर काळजी नाही वाटत पण तू ह्या रीमा ,वेध सोबत असलीस की काळजी वाढणारच,सगळे बिघडलेले हे तुझे मित्र मैत्रिणी......दादा

खरंय दादा तुझे, तुला आरतीचे वागनेच आवडणार, छान...ईला

आणि थोडा विचार करत ईला आत निघून गेली आणि आई बाबा तिच्या रूम मध्ये आले,आणि त्यांनी त्यांचा निर्णय सांगितलं की तू पुढचे शिक्षण इथे न घेता बाहेर जाऊन घेणार आहेस.. आता ही इथली मैत्री नको आणि संगत तर अजिबात नको..

आई आणि बाबा ही दादा सारखेच बोलत होते,आता तिला रडायला येत होते ,यांचा माझ्या वर विश्वास नाही उरला म्हणून असे बोलत आहेत हे तिला वाटून ती आता रडू लागली होती..

तुम्हाला मी इथे नको आहे सगळ्यांना असे बोलून का टाकत नाही,जड झाली असेल तर तसे सांगा मग मीच इथे रहाणार नाही...मलाच ही सतत ची दादागिरी नको दादाची..कोणी माझ्यावर पाळत ठेवत आहे हे मला आता पटत नाही..चुकीचे न वागता मला चुकीचे ठरवले जाते हे इ सहन करणार नाही... त्यात दादा माझ्यापेक्षा त्या आरती वर जास्त विश्वास ठेवत आहे आणि तिच्या बोलण्याचा परिणाम म्हणून तो मला बाहेर शिकवायला पाठवत आहे... कोण लागून गेला तो माझे निर्णय घेणारा, बाबा तुम्ही माझे निर्णय घ्यायला हवे तर तो घेत आहे, काय माहिती आहे त्याला आरती बद्दल..आज जी आरती त्याला चांगली वाटत आहे ती तर माझ्याही पेक्षा खूप हुशार आहे म्हणावे त्याला..

आई आणि बाबा आता हसू लागले होते,म्हणाले अग तो तुझी गम्मत करत होता ,तुला चिडवायला लावून तो बाहेर हसत आहे बघ.. त्याला आरतीने काही फोन केला नव्हता,तो जाऊन आला तिकडे पण त्याला एका राम नावाच्या मुलाने सांगितले की तू सुखरूप आहेस आणि तू वेधच्या घरी गेली आहेस ते ही आरती आणि रीमा सोबत..

आई बाबा मी तुम्हाला सोडून कुठे ही लांब जानार नाही, दादाला काही म्हणू दे...ईला लाडात येऊन आईच्या कुशीत जाते..

दादा... अग किती दिवस राहशील तू इथे,पण तू गेल्यावर तर आईला कोणी तरी लेक हवीच ना,तिची सोय मलाच करावी लागेल ना..

ईला... ok तर तुला आईची सोय नाही तुझी सोय करायची आहे असे सांग ना,असे आडून आडून काय बोलत आहेस, कळू दे कोण आहे जिला तुझ्या सोयी साठी आणणार आहेस..


दादा... oh तुला कळले तर मला काय म्हणायचे आहे तर..



क्रमशः.....



.