शिर्षक = आई
शुभदा ही एक निवृत्त शिक्षिका होती, तिचे वय ६५ होते. ती पुण्याच्या एका शांत अशा वसाहतीत राहत होती, त्यांचं छोटंसं पण सुंदर घर होतं. घरात एकेकाळी खूप गडबड असायची, नवऱ्याचं हसणं, मुलाचा अभ्यास, तिची शाळेची धावपळ... पण आता तिथं शांतता होती. ती नेहमीप्रमाणे सकाळी उठली आणि अंघोळ करून देवपूजा आटोपून किचनमध्ये गेली.
रोजच्यासारखं आजही चहा घेत, वर्तमानपत्र वाचत ती खिडकीजवळ बसली. पक्ष्यांचे आवाज, सकाळचा कोवळा सुर्यप्रकाश, आणि आकाशात पसरलेला मंद वारा सगळं तसं शांत, पण आज मनात काहीतरी अस्वस्थ वाटत होतं.
"आज ११ मे... कुठला दिवस आहे आज..." ती विचार करत असते. अचानक टेबलवरच्या मोबाइलवर एक नोटिफिकेशन चमकलं
"Happy Mother's Day to all the wonderful moms out there!" ते वाचून तिच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलं, पण डोळे थोडे पाणावले.
"Happy Mother's Day to all the wonderful moms out there!" ते वाचून तिच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलं, पण डोळे थोडे पाणावले.
"मदर्स डे... खरंच. आपण पण आईच आहोत ना?"
मुलगा सिद्धार्थ गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेत असतो. तिथे नोकरी, घर, संसार सगळं नीट चाललंय त्याचं. बोलतो, विचारपूस करतो, पण सण-उत्सवांचं कधी लक्षात राहिलं नाही त्याला.
मुलगा सिद्धार्थ गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेत असतो. तिथे नोकरी, घर, संसार सगळं नीट चाललंय त्याचं. बोलतो, विचारपूस करतो, पण सण-उत्सवांचं कधी लक्षात राहिलं नाही त्याला.
ती उठली आणि मुलाच्या लहानपणीचे फोटो असलेला एक अल्बम काढला. त्यात एक फोटो होता सिद्धार्थ म्हणजेच तिचा मुलगा तिसरीत असताना त्याचा फोटो आणि त्यासोबत त्याने रंगवलेलं कार्ड पण होतं आणि त्यावर लिहिले होते. "माझ्या लाडक्या आईला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा – माझी हिरो माझी आई."
ते कार्ड तिने घट्ट पकडलं आणि हृदयाशी धरलं. किती सहज विसरतो माणूस ह्या क्षणांना... पण आई विसरत नाही.
ते कार्ड तिने घट्ट पकडलं आणि हृदयाशी धरलं. किती सहज विसरतो माणूस ह्या क्षणांना... पण आई विसरत नाही.
दुपार झाली. ती शाळेत गेली, ती जरी निवृत्त शिक्षिका असली तरी तिथं काही तास शिकवत होती. तेही फक्त वेळ जावा म्हणून.
वर्गात मुलं आज खास मदर्स डे साठी काहीतरी करीत होती. प्रत्येक जण आईसाठी कार्ड, ग्रीटिंग, कविता तयार करत होता. काहीजण आईबद्दल बोलत होते. "माझी आई सकाळी उठून माझ्यासाठी डब्बा बनवते..." "माझी आई मला गोष्टी सांगते..." मुलांचं ते बोलणं ऐकून शुभदा हसत होती, पण मनात कुठे तरी एक हळवा कोपरा कुरवाळला गेला होता.
"या मुलांचं बालपण किती छान आहे, आपल्या आईसाठी हे काय काय करताय... आणि आपला मुलगा? त्याचं बालपण मी किती मनापासून घडवलं... पण आज मला एक फोन तरी करेल का?" हा विचार तिच्या मनात आला.

संध्याकाळी ती घरी परतली आणि थोड्याच वेळात दरवाजात एक कुरिअरवाल्याचा आवाज आला.
"शुभदा देशपांडे? पार्सल आहे तुमचं."
"शुभदा देशपांडे? पार्सल आहे तुमचं."
तिने आश्चर्याने पार्सल घेतलं. त्यावर लिहिलं होतं की...
"To Mom – With Love"
ते तिच्या मुलाचं अक्षर होतं, ते बघून तिचे हात थरथरत होते. तशाच थरथरत्या हाताने तिने ते पार्सल उघडलं. आत एक छोटंसं गिफ्ट होतं – तिला आवडणारी रेशमी शाल आणि एक पत्र.
पत्र :
"To Mom – With Love"
ते तिच्या मुलाचं अक्षर होतं, ते बघून तिचे हात थरथरत होते. तशाच थरथरत्या हाताने तिने ते पार्सल उघडलं. आत एक छोटंसं गिफ्ट होतं – तिला आवडणारी रेशमी शाल आणि एक पत्र.
पत्र :
"आई, आज मदर्स डे आहे. आणि त्यासाठी तू मला माफ करशील का, मी इतके वर्ष तुझा हा दिवस विसरलो?
तू नेहमी म्हणायचीस की आईपण म्हणजे त्याग... पण मला कळतंय आता त्याग म्हणजे विसरलं जाणं नव्हे, तर प्रेम देत राहणं आहे.
तू नेहमी म्हणायचीस की आईपण म्हणजे त्याग... पण मला कळतंय आता त्याग म्हणजे विसरलं जाणं नव्हे, तर प्रेम देत राहणं आहे.
तू मला शिकवलंस लिहायला, वाचायला, आणि माणूस व्हायला. तू मला घडवत राहिलीस... आणि स्वतःला मागे टाकत राहिलीस. मी तुझ्या मिठीत कितीदा रडलो, तू फक्त हसलीस. मी यशस्वी झालो, तू पाठीवर थाप देऊन मागे उभी राहिलीस.
आई, आज तुझ्याशी काही न बोलता मी राहिलो खरा, पण रोज झोपताना तू केलेल्या गोष्टी, तुझ्या आवाजाचा ठसा, तुझं ते ‘काळजी घे रे’ म्हणणं, सगळं आठवतं.
माझ्या प्रत्येक यशात तुझा आशीर्वाद आहे.
माझ्या प्रत्येक यशात तुझा आशीर्वाद आहे.
हे पत्र म्हणजे तुझ्या त्या शांत त्यागासाठी माझं प्रेमाचं उत्तर आहे. आणि मी लवकरच तुझ्याकडे येणार आहे. पुन्हा तुझ्या हातचा वरणभात खायला. आई, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो."
– तुझा सिद्धार्थ
ते पत्र वाचून शुभदाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. पण आज ते अश्रू वेगळे होते ते प्रेमाचे, समाधानाचे, आणि आठवणींचे होते.
तिने ते पत्र हळूच आपल्या कुशीत घेतलं, ती शाल अंगावर घेतली आणि खिडकीतून आकाशाकडे बघत म्हणाली,
"सिद्धार्थ... आज तू मला पुन्हा एकदा 'आई' होण्याचा आनंद दिलास. धन्यवाद."
तिने ते पत्र हळूच आपल्या कुशीत घेतलं, ती शाल अंगावर घेतली आणि खिडकीतून आकाशाकडे बघत म्हणाली,
"सिद्धार्थ... आज तू मला पुन्हा एकदा 'आई' होण्याचा आनंद दिलास. धन्यवाद."
त्या रात्री शुभदा शांत झोपली, ते पत्र हृदयाशी कवटाळून.
समाप्त
सौ. रोहिणी किसन बांगर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा