Feb 26, 2024
नारीवादी

आई आठवते तेव्हा

Read Later
आई आठवते तेव्हा
प्रत्येक आईची तिची तिची एक सायकॉलॉजी असते
अनुभवाच्या शिदोरीतून तिची एक विचार सरणी तयार झालेली असते, तीच शिदोरी ती आपल्या लेकीला नांदायला जात असतांना देत असते....सासर तिने जे अनुभवले तेच लेकीला ही अनुभवायला मिळेल तेव्हा अडचण आली तर ही शिदोरी उघडून बघशील..तशी ती आनंदी राहो तुला असे सासर ना लाभो जे मला लाभले आहे...हो पण लक्षात असू दे माहेर एकच असते...सासर हे सासरच असते...आई बाबाने केलेले लाड तिथे मिळतीलच असे नसते ती अपेक्षा ही ठेवायची नसते... करण त्यांना त्यांची लेक असते...तिचे लाड त्यांना पुरवायचे असतात...तू जेव्हा माहेरची आठवण येईल तेव्हा प्रत्येक वेळेस तुला यायला जमेलच असे ही नाही...स्वतःच्या आनंदापेक्षा तुला आता सासरच्या लोकांच्या आनंदाला नवऱ्याचा आनंदासाठी प्राधान्याने निवडावे लागेल...मन इथे खट्टू होईल ही पण माहेर मागे टाकावे लागेल हे मनाशी पक्के करावे लागेल....आई असा हुंदका ही येईल तरी तुला तू गिळावा लागेल...मग तुझी ही अशी एक सासर शिदोरी तयार होईल जी तू तुझ्या मुलीला वारसा म्हणून देऊ करशील...आई म्हणून तू छान तयार होशील...चार समजुती च्या गोष्टी तू ही तिला सांगशील..तेव्हा ही तू मला आठवशील..
©®anuradha andhale palve
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Anuradha Andhale Palve

Government Job

... I Search My Identity In Being A Writer Of My Soul

//