अलक, आई तू हवी होतीस

Aai


अलक

आई तू हवी होतीस


तिला ह्या वयात ही काही अपरिमित घडत होते आणि ह्या वयात ही आपले कौतुक होऊ शकते याची खात्री पटत नव्हती..

तीने लेखन सुरू केले आणि त्याची एक कादंबरी झाली, ती ही काही दिवसात प्रसिद्धी च्या अस्मानात होती...

सगळे अभिनंदन करत होते,संपूर्ण दिवस आज फक्त कौतुक होत असल्याने मन भारावून गेले होते..पण तरी सगळे सफलसंपपूर्ण वाटत नव्हते..

काही तरी कमी होती..कोणाची तरी कमी होतीच

तिला तिच्या आईने केलेल्या कौतुकाची पावती हवी होती...आणि नेमकी तीच आज नव्हती..

तिला आपल्या मुलीच्या कर्तृत्ववावर जगापेक्षा ही खूप भरोसा होता, माझी मुलगी हिरा आहे ती एक दिवस नक्कीच चमकणार...अजून खूप आयुष्य आहे...ती नक्कीच उरलेल्या आयुष्यात नाव कमवणार मला खात्री आहे..

तेव्हा आईच्या ह्या बोलण्याला ती सहज घ्यायची..तिला स्वतःवर हसू यायचे...पण आता आईचे ते बोलणे तो विश्वास खरा ठरला होता याचे खूप अप्रूप वाटत होते.. डोळ्याच्या कडा पाणवल्या होत्या...तिची आठवण येत होती..जगाने केले हे कौतुक तिला काहीच वाटत नव्हते...कारण त्या जगाने तिला फक्त नावे ठेवली आणि तिचे हसू केले होते..

आज आई असती तर भरून पावले असते..माझ्या ह्या यशाला सोनेरी किनार लाभली असती...

आई तू खरंच किती कमाल भविष्य वाणी केली होतीस..तुझे शब्द आणि भाकीत जणू देवाची ती वाणी होती

आई तू हवी होतीस