आई तू ऍडव्हान्स नाहीस

AAi Tu Advance Nahi


प्रिया अग हा मोबाईल कसा चालू करू ग..केव्हाचा बंद पडला आहे.. आणि मध्ये मध्ये hang होत असतो सारखा.. तू बघ बाई कसे करू..तू माझी शहाणी बाई माझी...

प्रिया अभ्यास सोडून देते...

आई तुला काहीच कसे जमत नाही ग..माणसाने इतके पण अडाणी राहू नये ह्या advance युगात... तुला आणि तुझ्या मोबाइलला किती सांभाळून घेऊ ग मी...प्रिया बेड मधून आवाज वर करून बोलत होती...


तावत येते आणि आईच्या जवळ बसते तसा मोबाईल हिसकावून घेते. . "फेक हा मोबाईल आता ,जुना झाला आहे..अजून किती दिवस सांभाळणार आहेस आई तू.."


त्यात तिला ही आता मोबाईल सुरू होत नव्हता..तिने खूप प्रयत्न केला तरी तो नाव चालू झाला नाही.. मग तिने आपल्या कामा कडे मोर्चा ओळवला.. आणि आई पुन्हा हाक मारू नये म्हणून दार बंद करून बसली..

जाताना सांगून गेली ,"आता पुन्हा त्या डबड्या साठी मला बोलवू नकोस ,मला खूप काम आहे..रिकामपन नाही मला ..आणि तसे ही तुला काय करायचे मोबाईल चे.."

आईने इकडे सुस्कारा टाकला.. हातातल्या फोन ला जरा मागे पुढे केले, त्याची मागची बाजू उघडली..बॅटरी जरा थोडी नीट बसवली..आणि धूळ गेली असेल म्हणून फुक मारली..आणि पुन्हा कव्हर बसवले...तसा मोबाईल परत चालू करण्यासाठी बटन दाबले आणि बघते तर काय मोबाईल चालू झाला की...मग सगळे clear दिसू लागले...


आई जाम खुश झाली...आणि तिला अत्यंत आंनद झाला की आज मी माझा मोबाईल चालू केला.. तिने आनंदाच्या भरात मुलीला हाक मारली...

"प्रिया, अग बघ हा भामटा चालू झाला ग, मी चालू केला, आता तू नाही असलीस तरी चालेल हो.."

प्रिया ,"आई आता तू ही शिक काही ,सगळेच मला नको विचारत जाऊ मग..." आतून आवाज आला

आई ,"अग होत असते ,सगळ्याच गोष्टी काही सगळ्यांनाच येत नसतात ,तश्या काही गोष्टी तुला ही येत नसतील ,नसतात ही पण म्हणून मी कधी बाऊ केला नाही..नाहीतरी तुम्ही आमच्या कडून आमच्या मुळेच तर शिकला आहात... मग कसला गर्व करावा..."

प्रिया ,"आई इतका ही इमोशनल drama नको करू ग, जे आहे ते आहे ,तुला काहीच येत नाही हे मान्य कर, आणि शिकायची इच्छा ठेव..हो मला येत नाही पण मी प्रयत्न करतेच ना, ह्यात काय गर्व म्हणतेस.."

आई ,"बघ ह, तुला जर काही माहिती विचारली आणि ती तुला माहीत नसेल असे ही होऊ शकते "

प्रिया, "आई असे शक्यच नाही, मला सगळे येते ,हवे तर तू बघ परीक्षा ,पण मी जिंकले तर मला मी मागेन ते देशील बर "

आई ने ही होकार भरला...

प्रिया जेमतेम फर्स्ट इअरला होती, तिला मराठी चे शब्द बरेच माहीत होते ,technical ज्ञान होते,पण काही नवीन शब्द माहीत नव्हते..

नेमका एका मुव्ही मधला एक शब्द /वेगन / हा शब्द होता, तोच शब्द आईला कळत नव्हता, तिच्या या आधी ही वाचण्यात आला होता पण त्याचा अर्थ प्रियाला विचारावा वाटला कितीदा पण ती रागवेल म्हणून आई कधी बोलली नाही... पण आज तिला तो खूप खटकत होता.. तो आईला स्वस्थ बसू देत नव्हता... मग ठरवले.. प्रियाला विचारुया...तशी ही तिने challenge घेतले होते..


आई ने प्रियाला बोलावून घेतले.."प्रिया अग चल तुझे challenge सुरू झाले समज, आज ह्या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे तुला..जिंकलीस की तू म्हणशील ते करेन "


प्रिया,"ok सांग काय आहे तो शब्द, मी लगेच तुला अर्थ सांगते बघ ,लगेच "

आई ,"मग सांग /वेगन /चा अर्थ काय आहे "

प्रिया ,"आई काही शब्द आणतेस तू कुठून कुठून शोधून, हा असा कोणता शब्द नाही माझ्या माहितीत.."

आई, "मग सांग ,कबूल कर तू हरलीस ते ,कारण हा शब्द आहे "

प्रिया, "ok मी बघते,तुला दोन तीन दिवसात माहिती सांगते ग "

आई ,"हे चूक आहे ,तुला तर सगळेच ज्ञान आहे तर लगेच सांग "

प्रिया ,"अग मी बघून सांगते,मग तर झालं ना, मी हारले नाही "

आई, "आपलं ठरलं होतं, आताच्या आत्ता लगेच तू ह्या शब्दाचा अर्थ सांगणार होतीस ना, मला कशी तू नाव ठेवून मोकळी होतीस..आई ला नेहमी कमी लेखत असतेस"

प्रिया, "आई ,मान्य करते मी हारले...पण तुझ्या माहितीसाठी सांगते की, वेगन म्हणजे शुद्ध शाकाहारी हा असावा, तर त्याची सगळे detail तुला आता सांगते "

आई, "ok ,असा ही असेल हो, पण प्रिया मुलं आई पेक्षा हुशार असावीत,त्यांचे ज्ञान आई वडिलांपेक्षा दोन पाऊले पुढेच असावे,काळा सोबत चालावे, हीच त्यांची धडपड असते पण म्हणून आई वडिलांचेच माप काढू नये..हो बाकी तू माझ्यासाठी नेहमी जिंकलेली असावीस..बोल मग तुला ह्या बदल्यात काय हवे.."

प्रिया, "तुझा मोबाईल मला दे,आणि तुला नवीन घ्यावा याची मला परमिशन दे.."


मुलांनी किती ही शिकावे, मोठे व्हावे पण मोठे ज्ञानी झाल्यावर आईचे माप काढू नये...बरोबर ना..