Login

६४) आई तूझं लेकरू येडं ग..कोकरू

ह्द्यस्पर्शी
तेवढ्यात पुन्हा एकदा मोबाईलची रिंग झाली.तीने थोडासाही वेळ न लावता मोबाईल लगेच कानाला लावताचं हँलो ,तिकडून कार्तिक चा आवाज तीच्या थेट कानात शिरला.तशी ती बावरली.
तीचा पलिकडून काही आवाज नाही. म्हणून मग ,त्याने पुन्हा एकदा तीला आवाज दिला.

तशी साधना अ...हँलो जरा अढखळलतच...

साधना अग काय? झालं असं घाबरत बोलायला ओळखल नाही का?अग... मी कार्तिक

अ... हो सर ओळखलं पण तुमचा नंबल सेव्ह नोव्हंता म्हणून जरा झालं तस काही तरी उत्तर देण गरजेच होत म्हणून तीने दिलं.

हो का? बरं अग..मग नंबर सेव्ह करा ना...

अ हो सर करते ना, तूम्ही बोला ना, आता अचानक कसा? केला काँल काही काम होतं का?

अरे ...म्हणजे काम असेल तरचं काँल करायचा का?
असाचं केला तर नाही चालणार का?

नाही नाही सर तस नोव्हंत बोलायचं मला.

मग कसं बोलायचं होत तुम्हाला साधना मला पण कळू द्या

तसं नाही सर तूम्ही केव्हाही करू शकता मला काँल मला काही प्रोब्लेम नाही मी असचं म्हणाले साँरी...

हो, हो, आहो, तुमची एक्सप्रेस थांबवा माझ्या शी बोलताना ततपप  करायची काही गरज नाही शांत व्हा आाणि ऐका उद्या निघायच आहे हे लक्षात आहे ना तुमच्या....

हो सर...

बँगा भरल्या की नाही.

हो सर तेच चालू आहे.

बरं छान म्हणजे तुमची तयारी चालू आहे.

हो सर...

हेच विचारायला काँल केला होता मी मला वाटलं विसरला असाल एकदा आठवण करावी. पण तूम्ही तर माझी प्रश्न मंजूषा सुरू केली.

अ ... त्यासाठी साँरी  म्हणजे, मला तसं विचारायला  नको होतं यापुढे निट लक्षात ठेवेन.

हो का? एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही फक्त एवढंच लक्षात ठेवा उद्या आपल्याला मुंबई साठी निघायच आहे.
आाणि मी इथे सकाळी येतो गाडी घेऊन येतो ओके

हो, सर...

बरं मग आता मी ठेवतो तुझं तू आवरून घे म्हणंत त्यांने काँल ठेवून दिला. आाणि तो आँफिसला निघून गेला तर ,साधना पुन्हा एकदा साहिल च्या रूम मध्ये निघून जात साहिल साहिल त्याला हळूच आवाज दिला. तसा साहिल ने तिच्या कडे बघत पुढे काय? बोलतेय हे ऐकण्यांचा  प्रयत्न केला. तसं तीने बोलायला सुरुवात केली.

  साहिल माझी तयारी झाली बँग भरून तूझी पण बँग भरली मी ती म्हणाली  आाणि त्याच्या डोळ्यांतून एक थेंब गावावरून ओ़़घळला तीने अश्रू पुसत साहिल रडू नकोस मला माहित आहे तूला काय?वाटतंय काय? विचार करतोय सर्व माहिती आहे.
तूला वाटतंय की तू.. कधी बरा होणार नाही पण माझं मन मला सांगतंय की तूला जे वाटतंय ते कधीही पुर्ण होणार नाही तूला बरं करण्यासाठी मी काही करेन खुप महिनत करेन जीवांची बाजी लावेन पण तूला या परिस्थिती तून बाहेर काढेन तू लवकरच बरा होणार आहे हे ,लक्षात ठेव फक्त आाणि हो साहिल खुश राहात जा...कारण तुझ्या डोळ्यात येणारंं हे पाणी मला कमजोर बनवतात. त्यामूळे तू जेवढा गंभीर राहातील तेवढंच मला काही तरी करता येईल ना, ऐकतोय ना मी काय?? म्हणाले. तीच बोलून झालं तसं त्याने डोळे उघडझाप केले.
तस तीने, त्याच्या केसातून मायेचा हात फिरवला.आाणि साधना रूम च्या बाहेर आली आाणि तीच्या रूम च्या दिशेने गेली.

काही वेळ गेला आाणि प्राजूने पुन्हा एकदा कार्तिक ला काँल केला रिंग जात होती पण कार्तिक मात्र साधनांचा विचारात मग्न होता.कार्तिक चा मोबाईल वाजून वाजून एकदम शांत झाला.

दुसरीकडे प्राजूने मोबाईल वैतागून फेकून देत किती वेळ काँल करतेय पण हा कार्तिक काँल उचलत नाही कि माझा काँल बघून मला काँल, पण करत नाही. तो, ठिक तर असेल ना काय? करू काय? समजत नाही मी जाऊ का? तिकडे नाही पण, मी नाही जाऊ शकत माझ्या कार्तिक च बाळ वाढतंय माझ्या पोटात त्याला काय? झालं आाणि कार्तिक त्याचं काम करून आल्या वर या बद्दल समजलं तर तो मला कधीही माफ करू शकणार नाही पण तो माझा काँल का? उचलत नाही कामात असेल का?जाऊदे मी काँल करत राहिन  कधी तरी तो काँल उचलेलचं प्राजू स्वत;ला प्रश्न करत होती.आाणि त्यांची उत्तर स्वत:च देत मनाला समजवत होती.

कार्तिक आज कामात मग्न होत कारण आज सर्व काम पूर्ण करून उद्या त्याला निघायचं फाईलवर काही तरी लिहित असताना अचानक त्याला  साधनाचा चेहरा दिसला.आाणि अचानक त्याचे हात थांबले. त्याच्या हातातून पेन खाली पडला.
काही वेळाने तो भानावर येत हे काय? होतंय मला साधनाला भेटल्यापासून तीचाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत राहातो. असं प्राजू च्या बाबतीत झालं पाहिजे होत पण तस कधी होत नाही.तो मनात म्हणाला आाणि सर्व विचार बाजूला सारून कामात लक्ष देण्यांचा प्रयत्न करत होता.पण तस झालं नाही. त्याच लक्ष कामात लागलच नाही. म्हणून मग त्याने सर्व फाईल एकत्र करून बाजूला ठेऊन केबिन मधून बाहेर पडला.आाणि गाडीत बसून हाँटेल च्या दिशेला गेला.

बँग भरून झाली गरजेपुरती अजून काही भांडी पण घ्यावी. म्हणून साधनाचं अजून बांधाबांध करण चालूच होतं.तेवढ्यात तीच्या दारावरची बेलं वाजली.आता कोण? आलं म्हणून ती दरवाजा च्या दिशेने गेली दारात कार्तिक ला बघून काय? बोलावं आाणि काही नाही हे तीला काही समजलं नाही ती अगदी सुन्न होऊन उभी होती.

आता तुम्ही म्हणाल हा कार्तिक तर हाँटेल च्या दिशेने गेला होता. मग तो इथे साधनाचा घरी कसा आला.तर झालं असं कि त्याची गाडी त्यांनी हाँटेल च्या दिशेने घेतली.होती पण साधनाची आठवण त्याला शांत काही बसू देत नव्हती.त्यामुळे त्याने तीच्या घरी जाऊन तीला एकदा या डो़ळ्यांने बघावं तीच्या विचारात गाडी साधनाचा घराजवळ येऊन थांबली.

तीचं आपल्या कडे लक्ष नाही बघून कार्तिक ने तीच्या समोर एक टिचकी वाजवली तशी ती भानावर येत

सर तूम्ही....

हो मी पण तूला काय? झालं

काही नाही पण तुम्ही तर उद्या येणार होता ना....

हो उद्या येणार होतो पण आँफिस मधून निघालो वाटलं तूझा घरी जाऊन तूला भेटावं.

मला म्हणजे?

अग म्हणजे तूला तर मी भेटलोय पण अजून साहिलंला नाही भेटलो. उद्या एकत्र जायचं म्हणजे? तो कंपटेबलं असणं गरजेचं आहे म्हणून त्याला भेटायला आलोय उद्या आपल्या प्रवासात तो सुद्धा असेल म्हणजे त्याची मैत्री करण गरजेच आहे .पण तू मला सर्व इथेच विचारणार आहेस का? आत येऊन बोललो तर नाही चालणार का?

तसं काही नाही या ना आत

हे येतो पण तू बाजूला होतेस का? आधी अशी मध्ये उभी राहिलीस  तर मी आत कसा जाऊ तीच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत तीला बाजूला करत कार्तिक म्हणाला.

त्याने खांद्यावर हात ठेवताच तीच्या अंगावर मात्र शहारे आले. आधीच तीच्या मनात बरीच जागा ही कार्तिक ने घेतली होती. त्यामुळे तीला त्याचा तो स्पर्श हवाहवासा वाटत होता.तीने कस बस स्वत;ला सावरत मागे वळत बसा ना सर मी आलेच म्हणंत
ती किचनमध्ये जाऊन पाण्यांने भरलेला पेला घेऊन आली. आाणि त्याच्या समोर पेला धरत सर पणी.... ती म्हणाली आाणि त्याने पेला घेत तोंडाला लावला.आाणि पाणी पिऊन झाल्यावर पेला घेण्यासाठी हात पुढे केला .तसा त्याने पेला पुढे केला पेला घेता घेता त्याचा दोघांचा स्पर्श एकमेकांच्या हाताला झाला. तस तीने पटकन हातातून पेला घेतला.आाणि स्वत;ला सावरत किचनमध्ये जात पेला ठेऊन चहा ठेवला.


0

🎭 Series Post

View all