Login

२९) आई तुझं लेकरू येड ग... कोकरू

ह्द्यस्पर्शी
तसं राधाला सुद्धा तीला हसवण्यासाठी चाललेली धडपडत कळत होती. तीला सुद्धा त्यांचा तोडकी मोडकी हिंदी ऐकून हसू येत होतं पण ते ती रोकत होती कारण तीला या रूपात वागणारा किसन खुप दिवसांनी बघायला मिळत होताजो खुप दिवस स्वत;ला दडवून बसला होता
     काही वेळ असाचं गेला राधा अजून रागातचं आहे असं समजून चहा संपताच तो उठतचं राधे मी काय? म्हणतो माझ्या वरचा राग नंतर काढ पण आता हे लाडू कडू नाही होणार याची काळजी हे कारण तू जेव्हा रागात कोणती भाजी जरी बनवली तरी ती खारटं होतेचं  म्हणून म्हणतो रूसवा सोड राधे नाही तर... या लाडूचं आता काही खरं नाही आाणि ते खालल्यावर त्या आपल्या कार्तिक चं सुद्धा कीहीचं खरं नाही मला तर लाडू गोड होतील यातचं शंका आहेशे वटचा टोमना मारला आाणि किसन निघून गेला
    राधा किसन गेला त्या दिशेला बघत हसत होती.
तो पुढे चालतचं मनात राधे तूला काय? वाटत मला काही कळत नाही का? आता पण तू माझ्या या नटखट वागण्यांवर हसत असणारं तू... म्हणून ते बोलत होतो काय? बाय माझ्या राधासाठी काही तू.... जरी राग दाखवत असलीस तरी मनातल्या मनात हसत असतेसकिसन चालता चालता मनात स्वत:शी बोलत पुढे निघून गेला

              दोघांनाही दोघांच्या मनातलं
                बरचं काही कळतयं
                त्याचं कधी तीच्यासाठी
              तर तीचं कधी त्याचासाठी
              ह्द्य मात्र प्रत्येक क्षणी धडधडत होतं
ती मात्र स्वयंपाक घरात कार्तिक साडी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवायला लागली होती.
   खुप वेळ झाला तीचं बनवन चालूच होतं जवळपास सकाळचे दहा वाजले होते.
    कार्तिक झोपेतून उठला आाणि डोळे चोलत राधा आई... कुठे आहेस आवाज देत स्वयपाक घरात आला.
   अरे उठलास तू... अजून थोडावेळ झोपला असतास तरी चाललं असतं ना बाळा....
आई झोप झाली ग... तसं पण झोपून कसं चालेल उद्या पासून परत चालायचं आहे ना कार्तिक उदास होत म्हणाला तसा राधाने वळायला घेतलेला लाडू तीच्या हातातून खाली पडला. आाणि त्याचे दोन तुकडे झाले तसं आपण काहीतरी चूकीचं बोललो हे कार्तिक च्या लक्षात आलं आाणि तो राधा जवळ जात राधा आई मला तस बोलायचं नव्हंत माझ्या बोलण्याचा चूकीचा अर्थ नको काढू आज मी या वेळेला झोपेत ग....पण उद्या मला याचं वेळेस झोप लागली तर मग मी कुठे झोपू ग....त्या अर्थाने म्हणालो बाकी काही नाही.
    कार्तिक राधाला त्याची बाजू समजवायचा प्रयत्न करत होता. पण रा़धाने त्याचा कडे दुर्लक्ष करत तुटलेला लाडू परत उचलला आाणि वळायला सुरूवात केली तसं कार्तिकला राधाची नाराजी जाणवली.
   त्याने पुन्हा एकदा प्रयत्न करायचा म्हणून तोंडावर पाणी मारून आला आाणि सवयी प्रमाणे राधाची साडीच्या पदराने तोंडावरचं पाणी टिपलं.
   तरी सुद्धा राधाने तोंडातून एक शब्द काढला नाही तसा कार्तिक हिरमूसला.तरी थोडा वेळ  थांबून परत म्हणाला
राधा आई भूक लागली चहा देशील का?तसा तीने चहाचा कप आाणि प्लेट भरून कांदे पोहे त्याचा समोर ठेवले पण बोलली मात्र काहीच नाही तसं कार्तिक तोंड बारीक करत पोह्यांचा प्लेट मध्ये चमच फक्त फिरवत होता.तसं त्याला पोह्यांत हिरव्या मिरची चे तुकडे दिसले आाणि त्याला त्या दिवसांची आठवणं झाली ज्या दिवशी त्याला जेवताना चिकन तिखट लागलं
तसा कार्तिक गालात हसला आाणि राधा कडे बघत राधा आई आता बघतो कशी तूझ्यांतली आई बाहेर येत नाही ती मनात म्हणाली.आाणि पोह्यातल्या बर्याचं मिरच्या त्याने तोंडात टाकल्या तसं त्याला तिखट लागल़ं.
हा... हू... हा करत कार्तिक जिभ काढत होता तसं राधाचं लक्ष त्याचा जवळ गेलं.तशी ती एक क्षणंही न लावता पाण्यांचा पेला त्याचा तोंडाला लावला तसा त्यानी एक घोट घेतं राधा आई दे तो पेला काळजी नको करू माझी आण मी पितो.
का?रे ....असं बोलतोस माझ्या मुलांची काळजी केली तर... मी कुठे चुकली.
   हो मुलगा का? हाच मुलगा तूझाशी कधी पासून बोलायचा प्रयत्न करत होता ना,मग तेव्हा नाही का काही वाटलं
तसं नाही रे बाळा ...
तसं नाही तर.... कसं आहे राधा आई सांग मला तू...हे सर्व जाऊदे तू... म्हणालीस म्हणून तूझासाठी राहिलो ना ग..
मी आज का? तूझा विचार करून की माझ्या राधा आईला आनंद होत असेल तर काय? हरकत आहे एक दिवस राहायला पण तू तर... कधी पासून बोलायचं सोड ग..माझ्या तोंड पण नाही बघत आहेस तू... असचं परक करायचं होत तर गेलो असतो ना ग,मी... तसं पण उद्या जाणार आहे
तू जर मी इथे आहे म्हणून खुश नसशील तर...मी आता निघतो ग..नाही राहात मी मी फक्त एकदा बाबांना
भेटून जातो.
कार्तिक मनात येईल तसं बोलत होता तर त्याचा प्रत्येक शब्दांवर राधा आई रडत होती पण कार्तिक एवढा मग्न होता की त्याची राधा आई रडते हे त्याला दिसलं नाही.की जाणवलं नाही
शेवटी राधा चा एक हुंदका बाहेर आला आाणि तो त्याच्या कानावर पडला.
तसा कार्तिक एकदम चपापला पण आता मात्र त्याला तीला रडताना बघून स्वत:च राग आला.
आपण राधा आईला नको नको ते बोलून गेलोयं हे तीच्या डोळ्यात आलेलं पाणी त्याला सांगून गेलं होत.त्याच रागाच्या भरात त्यांने चुलीतलं जळक लाकुड घेतलं आाणि तोंडाला स्वत:चा तोंडाला टेकवलं त्याला एकदम चटका बसला तसा  तो ओरडला आई.... ग....तशी
रडणारी राधा आई भानावर येत भरल्या डोळ्यांने आवाजाच्या दिशेने बघितलं तर... कार्तिक चं तोंड भाजलं होतं आाणि हातातल जळक लाकूड हातातून जमिनीवर पडून विजल़ं होतं तशी राधा जोरात ओरडली कार्तिक......आाणि पळतचं त्यांचा जवळ जाण्यांसाठी उठली. या सर्व गडबडीत ती खोबरं किसायला  विलीवर बसलेली होती.हेच विसरली वरून
कार्तिक ला भाजलेल्या अवस्थेत बघून तीला काही समजलं नाही आाणि तीचा पाय त्या धार धारा विलीवर पडला तशी ती एकदा ओरडली.पण कशाची पर्वा न करता ती कार्तिकपर्यत पोहचली


0

🎭 Series Post

View all