Login

७) आई तुझं लेकरू येडं ग... कोकरू

ह्द्यस्पर्शी कथा
आणि कार्तिकने बोलायला सुरुवात केली
      तुम्ही मला दु:खातून सावरायला सांगता ठीक आहे सावरेन मी तूम्ही मनताय म्हणून सावरेन अगदी मनावर दगड ठेऊन, प्रयत्न करेन प्रेमाच्या जागी तिरस्कार करेन एवढ्या वर्षांत दिलेलं प्रेम, नाही तर मला आता मध्येच पोरकं करून गेला ना ही गोष्ट लक्षात ठेवून. तूम्ही कोणीही नव्हता माझे असं, समजेन पण, मी काही विचारतोय, त्यांच उत्तर द्या.
     मला सांगा आई बाबा आज तूमच्या सोबत झालं तेच माझ्यासोबत झालं असतं तर... तुम्ही दु:खी नसता, का? माझ्या मरणानंतर इकडे माझी अंतयात्रा स्मशानात कढली  सरणावर ठेऊन, माझी राख झाली की मला तूम्ही विसरणार होता का? म्हणजे मग हे, अस झालं का? माझ्यांशी, तुमचं, नात, मी जिवंत असेपर्यंत असणारं, होत का? मेला म्हणजे राखेत विरघळला हा आई बाबा एवढं सोप होत तूमच्या साठी मला मरताना, बघनं...
    इकडे कार्तिक चा एक एक शब्द आईच्या काळजावर घाव करत होत त्यांचा प्रत्येक शब्द आईच्या कानावर जोरजोरात आदलत होते तसे तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले
आईला कार्तिक च बोलणं इतक जीवारी लागलं की भिंतीवर चा फोटो अचानक खिळ्यापासून, वेगळा झाला आणि जमिनीवर पडला आणि काचेचे बरेच से तुकडे घरभर पसरले तसा कार्तिक भानावर आला भिंतीवर चा फोटो खाली कसा पडला याच विचारात तो फोटो उचलायला जवळ गेलाच होता की तेवढ्यात घरभर पसरलेल्या काचावर त्यांचा पाय पडला आणि तो विवळला आई.... ग....आणि त्याचा या आवाजाने आईचे, डोळे पाणावले तीला होणारी यातना तीच्या डोळ्यातून वाहू लागली आणि जमिनीवर पडलेला फोटो, पुर्ण पणे अश्रूं ने भिजला कार्तिक पायातील काच काढून परत फोटो कडे वळला तर त्याला फोटो भिजल्यासारखा जाणवला पण आजूबाजूला कुठेही पाणी नाही मग हा फोटो भिजला कसा या विचारात असताना संतापाने, लालं झालेल्या बाबाचा आवाज पुर्ण घरात घुमला...बघ भेटल तूला उत्तर हे आहे तूझं उत्तर समजलं असेल ना की मुलांच्या मरनाच्या गोष्टी कानावर पडल्यावर काय? होतं अरे ती तर आता जिवंत नाही तरी सुद्धा तुझ्या काही शब्दांने तिचा आत्मा रडला बाबाचं बोलणं झालं आणि पुर्ण घर शांत झालं तसं नकळत कार्तिक चा हात पुर्ण फोटोवर फिरला
तसा अजून एक काचेचा तुकडा त्यांच्या हातात गेला तसा पुन्हा  त्यांचा तोंडात आई...ग हा वेदनेने भरलेला स्वर निघाला आणि पुन्हा आईचा हलवा स्वर पुर्ण घरात घुमला सावकाश बाळा जरा, सांभाळून आणि त्याने हात मागे केला आणि परत दोन्ही हाताने तो फोटो उचलून त्यांच्यावरचे काचेचे तुकडे बाजूला करून फोटो एका कोपर्यात उभा केला आणि झाडूने सर्व काचा गोळा करून पुन्हा त्या फोटो जवळ गेला आणि तो फोटो घेऊन एका कोपऱ्यात बसला
0

🎭 Series Post

View all