आता कार्तिक वर दोघांची जबाबदारी पडली होती तरी तो एका वेळी दोघांची काळजी घेत होता जमेल तसा औषध पाणी करत होता
घरात दोन दोन आजारी माणंस असून त्यांला पैशांसाठी घराच्या बाहेर पडून दुसऱ्याचा शेतात जाऊन मजूरी करावी लागत होती. तेव्हा कार्तिक चे आजारी आईवडील घरात असत. पण ते कार्तिकला समजून घेत होते तो आता एकटा पडतोय हे आईवडिलांना दिसत होतं सर्व करताना त्यांची खुप ओढाताण होत होती त्याचं लाडक लेकरू कोणतीही तक्रार न करता सर्व खुप मायेने करत होता.
मजूरी करून घरी आला की पुन्हा आईवडिलांचे खाणं पिणं औषध पाणी सर्व करून नंतर अंथरूणावर पाठ टेकवत होता कधी कधी तर तो काळजी पोटी त्याचा उशाशी दिवस रात्र बसून राहात होता तर कधी तरी रात्री बसल्या बसल्या त्याला तिथेच झोप लागत होती
कधीतरी बाबांना मध्यरात्री जाग आली आणि कार्तिक उशाशी अवघडलेल्या अवस्थेत झोपलेला दिसला की ते आईला आवाज न करता हलवून उठवत आणि त्याचा कडे बोट दाखवतआईने त्याचाकडे बघून त्याचा डोक्यावरून हात फिरवला आणि नकळत तीचे डोळे भरून आले तिचा हुंदका दाटून आला त्याची झोप मोड होईल म्हणून बाबांनी तीला स्वत:च्या ओठावर गप्प बसण्याचा इशारा केला.त्यांचा इशारा समजून आईने तिचा हुंदका आवरता घेत ती त्याच्या डोक्यावरून हळूहळू मायेने हात फिरवत राहिली
असेच काही दिवस आई वडिल आजारी होते चांगल्या उपचारासाठी पुरेसे पैसे त्यांचा जवळ नसल्यामुळे असचं एक दिवस मध्यरात्री झोपेतच दोघांना देव आज्ञा झाली
पण ते औषधांने झोपले असावे अस समजून त्यांने त्यांना उठवलं नाही ते उठेपर्यंत आपण शेतातून येऊ असा विचार करत तो शेतावर गेला.
संध्याकाळी तो शेतावरील घरी आला तरी आईबाबा झोपलेले दिसले अजून कसे काय? झोपलेत हे दोघं म्हणून तो विचार करू लागला.
त्याचा मनात शंकेची पाल चुकचुकली आणि तो भानावर आला आणि त्यांने आई बाबांना एकदा हाक मारली. पण त्यांला दोघांनी पण आवाज दिला नाही म्हणून तो घाबरला. आणि त्यांने दोघांना आपल्या दोन्ही हाताने एकत्रचं हलवत आवाज दिला पण ते काही उठले नाहीम्हणून मग तो घराबाहेर गेला आणि शेजारून कोणाला तरी बोलवलं. कार्तिकला एवढं घाबरलेल्या अवस्थेत बघून बरीच माणसांची त्यांचा घरात गर्दी झाली.
त्या शेजाऱ्यांन पैकी कोणी तरी आई बाबांचा नाकासमोर हात करून श्वास तपासला तेव्हा दोघांनी ही आपला जीव सोडला हे समजलं आणि कार्तिकने हंबरडा फोडला.
रडून रडून त्यांचे डोळे सुजले होते सर्व जण त्यांला समजावण्याचा प्रयत्न करत होते पण तो ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता. त्याचं दु:ख त्याला माहितं होत आता त्यांला प्रेमाची पोकळी जाणवत होती.
शेजारातील काही लोकांनी पुढे येऊन त्यांचा आईवडिलांना शेवटचा निरोप देण्याची तयारी सूरू केली आणि कार्तिक दोन्ही देहा कडे बघत शांत बसला होता त्यांचा आजूबाजूला जे चालू आहे ते त्यांचा डोळ्यांने दिसत होतं पण डोक्यापर्यंत पोहचत नव्हतंथोड्यावेळाने शेवटचा निरोप देण्याची वेळ झाली म्हणून काही लोक कार्तिक ला भानावर आणायचा प्रयत्न करत होते पण तो काहीच हालचाल करे ना शेवटी पर्याय नाही म्हणून काही जणांनी आईचा तर... काही जणांनी बाबांचा देह खांद्यावर घेतला आणि अंतयात्रा निघाली. तर... कार्तिक भानावर नाही म्हणून काही जणांनी त्या पकडून उभ केलं आणि त्यांचा खांद्यावर मडके देऊन पकडूनच घेऊन गेले.
दोन चिता रचली गेली आणि त्याचा हातात पेटतं लाकूड देऊन दोन्ही चिताना अग्नी देण्यास सांगितली.
अग्नी देण्यासाठी त्यांने हात पुढे केला आणि कार्तिक भानावर आला आणि मोठ्यांने रडू लागला. अंतीम संस्कार पार पडला आणि काही लोक घरी गेले तर काही लोक त्याला घरी सोडावं लागेल म्हणून त्यांचा सोबत तिथेच उभे होते.
चिता पुर्ण विजली त्याची पुर्ण राख झाली तरी तो तिथेच बसला होता काही जण त्याला घेऊन जायाचं म्हणून पुढे आले तर तो त्यांचा हात झटकत घरी जाण्यास नकार दिला. शेवटी ते सर्व जण वैतागून आपआपल्या घरी निघून गेले. कार्तिक मात्र पुर्ण रात्रभर ती राख बघत तिथेच बसला.
जरा पहाटेचं कधीतरी पक्षांचा किलबिलाट झाला आणि त्यांचा आवाजाने कार्तिक भानावर आला आणि आजूबाजूला नजर फिरवली. तेव्हा त्याला काही दिसलं नाही मग त्यांने समोर बघितलं तर त्याला त्याचा समोर फक्त राख दिसली आणि काही श्नणांत कालपासून सर्व घडलेला प्रकार त्यांचा डोळ्यांसमोर आला आणि त्याचे डोळे भरून आले.
त्यांनी कसं बस स्वत;ला सावरलं आणि तो घराचा दिशेने निघाला तर...काही माणसं त्यांला आता घराकडे येताना बघून चकित झाले.त्यानी मात्र कोणाकडेही बघितलं नाही.आणि दाराची कडी उघडली आणि आत गेला तर त्यांला सगळीकडे शांतता जाणवली आणि काही वेळाने आईबाबाचे आवाज येऊ लागले या सर्व होणार्या भासाने कार्तिक सैरभैर झाला आणि त्याची नजर आईवडिलांना शोधू लागली. पण ते त्याला पुर्ण घरात कुठेही दिसले नाही म्हणून तो अजून अस्वस्थ झाला.
कार्तिक बाळा रडू नको रे..काळजी घे..._आम्ही आता नाही राहिलो तू स्वत:ला सावर आणि एकट्याने तूझ जीवन जगून नवीन सुरूवात कर ..
आम्ही कुठेही असलो तरी कायम तूझा पाठीशी असू..अचानक जरा मोठ्या आवाजात पण काळजीच्या सुरात पुर्ण घर भर त्याचा आईचा आवाज घुमला.काही वेळाने परत सर्वत्र शांतता पसरली आणि आईचं आताचं बोलणं त्याला परत परत आठवत होतं. आता त्याचा आयुष्यात तो नव्याने एकटा झाला होता आई आईबाबा च्या प्रेमापासून मुकला होता आता त्याला आपण पोरके झाल्याची जाणीव होऊ लागली. आजचा दिवस पण असाच गेला तो पात्र डोळे उघडे ठेऊन जमिनीवर पडुन होता दिवसा सोबत रात्र पण तशीच सरली.
सकाळी सकाळी काही शेजारी त्याचा दारावर आले आणि त्याचा हाताने आईवडिलांनचा मरना नंतर चा तिसऱ्या दिवसांचे कार्य पार केलेआणि सर्व जण त्यांचा निरोप घेऊन निघून गेले.तो मात्र त्या दोघांचे फोटो घेऊन तसाचा तसा बसून होता.
क्रमश....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा