किसन बाबा झोपला का? मी आले तसं किसन, डोळे उघडत प्राजूकडे बघितलं.तर, त्याचे डोळे पाणावले होते. तशी ती त्याच्या जवळ जात बाबा तूमच्या डोळ्यात पाणी काय? झाल
काही त्रास होतोय का? मला सांगा.
काही त्रास होतोय का? मला सांगा.
तू... आलीस का? बाळा
म्हणजे काय? बाबा तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे. आणि मी येणार नाही .असं कस होईल.
नाही मला वाटलं त्या मुलांसारखी तू.... पण पळून जातील.
ही गोष्ट मनातून काढून टाका .मी ....तुम्हांला आाणि राधा आईला कधीही टाकून जाणार नाही.तूम्ही असं करता का दोघ माझ्यासोबत माझ्या घरी येता का?
पण तूझा घरी कोण असतं.माझा नवरा आाणि मी...पण नवरा कामासाठी बाहेर गेलाय. सध्या मी एकटीच आहे.
मग तूझे आई बाबा ....
ते बाबा ते देवाघरी गेले.
हो का बरं माहित नव्हतं बाळा माफ कर वाईट वाटून नको घ्ऊ
नाही बाबा मी कशाला वाईट वाटून घेऊ. ते जरी नसले तरी तूम्ही आहात ना माझे बाबा आणि राधा आई सारखी आई सुद्धा ती म्हणाली आाणि किसन ने तीच्या डोक्यावर हात फिरवला तशी ती हसली आाणि विषय बदलत ...
काय? मग बाबा आजच जेवण कसं होत.
खुप गोड....
काय? गोड बाबा ती तिखट चटणी होती .ती तुम्हाला गोड लागली का?
हो बाळा खुप गोड होती.
पण ती कशी?
कारण ती आज तू खुप मायेने भरवली होती.पण आता तू तुझ्या घरी जाणार नाहे.
जावं तर लागेल ना...
मग मला परत भरवणार नाही कधीच...
असं कस होईल मी पंधरा दिवसांनी येईन तेव्हा भरवेन.
नक्की येशील ...
बाबा मी नक्की येणार आाणि हो राधा आई कडे मी आसा मोबाईल दिलायं.माझी आठवण आली की राधा आईला सांगा. ती तुम्हाला लावून देईल. मग आपण बोलू नाही तर एक काम करू मी तुम्हांला शिकवते. तूम्ही लक्षात ठेवा.तशी किसन ने हसतच मान हलवली.पण बाबा खुप उशीर झालाय ही
औषध घ्या.मग मी मोबाईल शिकवते ती गोळ्या हातात देत म्हणाली.आाणि पाण्याने भरलेला पेला दिला.
औषध घ्या.मग मी मोबाईल शिकवते ती गोळ्या हातात देत म्हणाली.आाणि पाण्याने भरलेला पेला दिला.
औषध ही कसली औषध आाणि मला काय? झालंय ती राधा पण मला असच काही आणून देते. रोज मला काही झालंय का?
बाबा तुम्हाला काही झालं नाही .पण कधी कधी तुमचं डोक खुप दुखत असतं म्हणून डाँक्टरांनी ह्या गोळ्या द्या अस सांगितलं.
माझं डोकं पण आता माझ डोक नाही दुखत.
आता दुखत नाही कारण या गोळ्या तुम्हाला राधा आई रोज देते.ते कमी झालंय पण या गोळ्या बंद करायचा नाही.असं म्हणतेस.म्हणतं किसन ने औषध घेतली.कार्तिकला घडला प्रकार राधा सांगत होती. तीच सांगून झालं आाणि राधा कार्तिक समोर जात अरे किसन तीला लहान मुलांसारखे प्रश्न विचारायचा रे ....पण, ती सुद्धा त्याना जे पटेल तस समजवून सांगायची.तूझ्या मूळे आबोल झालेला किसन तीच्या शी त्या रात्री रात्रभर बोलत होता.आणि हो मगाशी मी तुला खोट सांगितलं की, अग्नी मी दिला पण किसन ला अग्नी प्राजू ने दिला.गुणाची पोर हाय आमच्या साठी लय केलयं तिने अजून बी ती न चुकता येते .आणि मला काही हवं नको ते बघते.पण तू तिच्या सोबत जे काही केलं याचा पस्तावा तूला होईल तवा लय उशीर झालेला असेल.मला जे काही सांगायच़ ते सांगितलं ती पोरं काय उघड्या वर नाही पडणार ही तीची राधा आई तीच्या पाठीशी असलं तूला इथं राहाता येणार नाही .गेलास तरी चालेल राधा आई म्हणाली आाणि घरात निघून गेली.तर कार्तिक जाणार्या राधा आई कडे बघत राहिला. तशी साधनाने त्याच्या कडे नजर वळवत ....
गेली ती म्हातारी काय ?तर, म्हणे माझी राधा आई चल आता ती तर तूला उभ पण करत नाही.साधना म्हणाली तसा तो काही न बोलता चालायला लागला.
मी चूकी तर ...नाही केली ही साधना पण आता कुत्र्या सारखं वागवते.हीला घेऊन कुठे जाऊ तो विचार करतचं होता कि, साधना मध्येच ...
बस झालं कुठे घेऊन जाणार आहेस तू..आता एक तर सकाळ पासून पोटात काहीच नाही आाणि तू नुसता पायीच चालवतो
काही कर पण आधी खाण्याचा काही तरी बंदोबस्त कर...ती म्हणाली आाणि तो तीन ताड उडाला तरी स्वत;ला सावरत
काही कर पण आधी खाण्याचा काही तरी बंदोबस्त कर...ती म्हणाली आाणि तो तीन ताड उडाला तरी स्वत;ला सावरत
साधना अस काय? बोलतोस तूझ्या समोर आहे .जे काही झालंय ते आाणि मी कुठून आणू रे खाण्यासाठी,शंभर रू होते ते गाडीला संपले ना
काय? गरज होती त्या म्हातारी कडे जाऊन खर्च करायची.आाणि माझ्या समोर सर्व आहे मान्य आहे पण मी नाही सांगितलं तूला की बायकोशी पंगा घे ....आणि ती दौलत लाथाड म्हणून काही गरज नसती पडली अशी फिरायची जे काही केलस ते स्वत;केलस आाणि त्याला जबाबदार तूच आहेस
कुठून आणू म्हणजे काय? मी माझ्या घरी बरी होते ना कशाला नोकरीच अमिष दाखवून इकडे घेऊन आलास.स्वत:च काही नव्हतं मग स्वत;च असल्यासारखं का? वागत होतास.
कुठून आणू म्हणजे काय? मी माझ्या घरी बरी होते ना कशाला नोकरीच अमिष दाखवून इकडे घेऊन आलास.स्वत:च काही नव्हतं मग स्वत;च असल्यासारखं का? वागत होतास.
साधना काय झालंय तूला अशी का? बोलतेस आपल प्रेम आहे ना...
आपलं नाही तूझं असेल माझं तूझ्या वर कधीही प्रेम नव्हतं.
काय? मग माझी काळजी घेण मला चोरून बघणं आपल्यालात जे काही चालू होतं ते काय?होतं.
त्याला प्रेम समजून बसला अरे बिझनेस करणारा बकरा होतास म्हणून मी फक्त जाळ टाकल़.अरे तू तर तेवढी दारू पिल्ली होतीस पण मला बघून तूझी दारू उतरली तेव्हाच मला जे समजायचं ते समजलं होत.
मी ज्याला प्रेम समजत होतो ती तर फसवणूक होती आाणि हिच्या फसवणुकीला प्रेम समजवून मी प्रत्येक वेळी प्राजूची तूलना हिच्या शी केली.आाणि नेहमी हिचं पारड मोठ ठरलं. माझ्या समोर हिच्या सोबत राहाण्यासाठी मी प्राजूची चूकी नसताना तीला नको नको ते बोलून गेलो. मी आमच्या दोघांच्या बाळाला पण लाथाडलं माझी प्राजू खुप गरीब आहे तीची चूकी नसताना मी जाऊ नये म्हणून गयावया करत होती.पण मी ऐकलं नाही.राधा आई बरोबर बोलली घरच्या लक्मी ला दुखवून स्वत:ला बरबाद करू नको खरच माझ्या प्राजूला दुखवून मी खुप पस्तावतोय मी जाईन प्राजूकडे मी ...तीची माफी मागेन ती मला माफ सुद्धा करेल.साधनाचा एक एक शब्द त्याच्या जिव्हारी लागला आणि त्याला प्राजूची आठवण झाली कार्तिक विचारात मग्न झाला.
याला विचारात बघून साधना खवळली ये विचार नंतर कर आधी माझ्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त कर ती म्हणाली तसा कार्तिक ने तिच्या कडे रागाने बघत....
ये माझं डोक खाऊ नको मला वाटलं प्रेम आहे म्हणून मी इथे तूझ्या सोबत आहे. प्रेम असत ना...तर मी काही करून तूला खाऊ पिऊ घातलं असतं पण तू तूझ्या तोंडाने कबूल केलसं कि तू फक्त एक फायदा बघून जवळ आली होतीस त्यामूळे हि फसवणूक आहे मी तूझा नोकर नाही जिथून आली होतीस तिकडे जाऊ शकतेस चालती हो...समजलं ना माझ्या प्राजू ची सर कोणाला नाही. तू ...तर तीच्या पाया जवळ पण बसायच्या लायकीची नाही. ज्या राधा आई बद्दलं वाईट वाईट बोलतेस ना तीने मला मी रस्त्यांवर असताना सहारा दिला. प्रेम दिलं,प्राजूला मी एकदाच घेऊन गेलो होतो. ग ...पण तीने माझ्या गैरहजेरीत त्याची काळजी घेतली. अजून घेतेय.आणि तू.... तीला म्हातारी म्हातारी बोलतेस तूला बोलून काय? कळणार म्हणा जिचा प्रेम माया आपूलकी याच्याशी कधी सबंध आला नाही. तीच्या वर प्रेम करून बसलो.मुर्ख पणा केलायं तो, बोलत होता तशी तशी साधनाला चिड येत होती. त्याच रागात ती त्यच्या वर चिडली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा