#आई तुझं चुकलंच ..!
मिनू ,किती हा राडा घातलाय? पसारा बघ..अग,उद्या दुसऱ्या घरी जाशील तर असच करशील का?"-आई
"ते दुसऱ्याच घर ना?मग का पाठ्वतेस मला दुसऱ्या घरी ? इतकी जड झालीये का मी ?"-मिनू
"तस नाही ग बाळ पण एक ना एक दिवस जावंच लागतं ना ."-आई
"आता असं काही राहील नाहीये आई .मी नाही जाणार ."-मिनू
"बर ते बघू आपण नंतर ,आता जा आटोप लवकर उशीर होतय पाहुणे येतच असतील ,खूप दिवसांनी बाबांचे मित्र परिवार येत आहेत हे मी बघते "-आई
"थँक यू आई ,लव्ह यू "-मिनू आईला मिठी मारून आवरायला निघून गेली.
"मीनल ए मीनल अग हात चालव लवकर लवकर ,कसला विचार करतेस? पाहुणे येतच असतील ."सासूबाई चा आवाज ऐकून मीनल आठवणीतून बाहेर आली . मीनल ला आज आईची खूपच आठवण येत होती ,दोन वर्षाआधी लग्न होऊन सासरी आलेली ,घरातल्या जबाबदाऱ्या नीट सांभाळणारी ,सासूचे टोमणे खाऊन हि उलट उत्तर न देणारी मीनल आज आईची आठवण करत होती.
लग्नाआधी कंटाळा आला तर आई पसारा आवरून घ्यायची पण आता कितीही कंटाळा आला तरी आई नसते तो राडा उरकायला , भूक लागली कि जेवण आयात मिळायचं पण आता स्वतः बनवल तर दोन घास मिळतात ते हि घाईत ,
लग्नाआधी कंटाळा आला तर आई पसारा आवरून घ्यायची पण आता कितीही कंटाळा आला तरी आई नसते तो राडा उरकायला , भूक लागली कि जेवण आयात मिळायचं पण आता स्वतः बनवल तर दोन घास मिळतात ते हि घाईत ,
"खरंच आई तुझं चुकलं... तू म्हणायचीस कि सासू हि आईच असते पण तू हे सांगायला विसरली कि ती तिच्या मुलाची आई असते सुनेची नाही ."
आई तू म्हणायची कधी आपल्या वयापेक्षा मोठ्या लोकांना उलटं बोलू नको , पण जेव्हा तीच लोकं टोमणे मारतात तेव्हा काय करू आई ?तुझं चुकलंच आई तू मला उलटं बोलायला शिकवायला हवं होत...
कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात ,ती समजून घे असं तू म्हणतेस ना आई ,अग त्यातली कोणतीच बाजू माझी नसते मग तरीही मी का समजून घेऊ आणि कितीदा समजून घेऊ ? तू मला समजून घेण्याचा सल्ला दिला तेही चुकलंच बर का ग आई .
लग्न करून दिल्या घरी सुखी रहा असं तूच म्हणालीस ना ,अग पण सुख फक्त घरच्या भिंतीवर अवलंबून नसत ना ग आई ,त्या घरातल्या माणसांच्या प्रेमावर पण असत ग आई...
घरातल्या गोष्टी घरात राहू दे माहेरी सांगायच्या नाहीत असं तू म्हणतेस आई, पण हेच तुझं चुकत कारण माहेरी नाही तर कुठे मन मोकळं करू सांग ना ग आई ?
वेळ पडली तर स्पष्ट बोल असं तू सांगितलं होतस एकदा पण मग इतरांना मिरची लागली तर मी काय करायचं आई ?
तू खूप काही शिकवलं आई ,तू आयुष्यभर गप्प बसलीस आणि मलाही सहन करायला शिकवलं ,तु मला खूप चांगले संस्कार केले , तूझ्या एवढं मोठं मन कुठून आणू ग आई? तु मला चालायला शिकवलं, निर्भिड वागायला शिकवल, आज जे काही आहे ते तुझ्यामुळेच आहे पण आपल्यासोबत आधी दुसऱ्यांचा विचार कर असं का ग शिकवलंस आई?
लग्नानंतर दुधात साखरे सारखी विरघळून जा म्हणालीस पण ते दूध फाटलेले असेल तर? मग ते तर शिवता पण येणार नाही, वडीलधाऱ्याचा मान ठेवायचा पण जेव्हा ती माहेरच्यांना नावं ठेवतात तेव्हा काय गप्प बसायचं का आई?
आमच्यासाठी खस्ता खाल्ल्या, आम्हाला तूझ्या पदरा खाली घेतलं जेणेकरून बाहेरच्या झल्या लागू नये हे ही तुझं चुकलंच आई, कारण आज डोळे पुसायला तुझा पदरच जवळ नाही.का तुझ्यापासून मला लांब केलंस आई? आज पावलोपावली तूझी आठवण येते, डोळे भरुन येतात, घरात कीतीही सूख असो, सगळे सोबत असो पण माझी आई माझ्या सोबत नसते ग आई....?
तुझ्यातल्या मोठेपणाला सलाम, तूझ्या सहनशीलतेला नमन पण तुला एक सांगू आई आज तूझ्या इतकं चांगल वागून उपयोग होत नाही. आज जश्यास तसे उत्तर द्यावेच लागते आई.. तुझी शिकवण अनमोल आहे आणि मी तसचं वागण्याचा प्रयत्न ही करेन पण नेहमी ते शक्य होईल च असे नाही.... तुझी खूप आठवण येते आई...
लव्ह यू आई!

वाचकहो,बऱ्याच घरात खुप चांगले सासू सासरे असतात, वातावरण छान असते पण प्रत्येक घरात अस नसतं, आणि लग्न झाल्यानंतर एका मुलीला आपल्या आईची उणीव सदैव भासते, हा लेख केवळ एक विचार आहे, काही लोकांशी/मैत्रिणींशी जाणुन घेतलेल्या अनुभवावर आधारित आहे. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि नक्की लाईक करा. प्रत्येक आईला सलाम, कोणतीच आई चुकतं नाही ती बरोबरच असते चुकीची असते ती परिस्थिति....
अनुराधा पुष्कर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा