आई ,तू खरचं जग पाहिले आहे का ग? भाग _३

मुलाच्या दृष्टीकोनातून ही पाहिले पाहिजे ही आजच्या काळाची गरज.ही

आई,तू खरंच जग पाहिले आहे का ग?

भाग_३

" मला समजते शुभा तुला काय म्हणायचे आहे ते.हेच ना की...मुलींना सारखे \" तू मुलगी आहेस,हे नाही करायचे,ते नाही करायचे असे उपहासात्मक बोलू नये,\" हेच तुला सांगायचे आहे ना शुभा,पण.....

" अग आई अजूनही काय तू पण अन् बिन घेऊन बसलीस.सगळ्या चुका ह्या फक्त तरूनांच्याच असतात का ग? तारुण्य इतके वाईट असते का नेहमी?
आयुष्याला कोणते वळण द्यायचे ही मोठ्या लोकांची जबाबदारी नाही का?"

" शुभा मला पटते सारे ,पण .....येतोच ना पुढे...! काय करणार ,समाजातील विदारक परिस्थिती बघून मन धजत नाही ग.आपली मुले आपल्या जवळच असावीत,नजरेसमोर असावीत,एकदा मोठी झाली ,चांगली सेटल झाली, छानसा जोडीदार मिळावा ,हीच तर सगळ्या आईवडिलांची अपेक्षा असते.त्यात काही प्रॉब्लेम येऊ नये,इतकीच तर धास्ती असते.प्रत्येक आईवडिलांच्या मनात...."

" हेच...हेच तर चुकतेय आई तुम्हा मोठ्या लोकांचे.एका बाजूनं भरपूर शिक्षण घ्यावे,नाव कमवावे, सेटल व्हावे,अशी इच्छा बाळगतात.आणि दुसऱ्या बाजूने प्रत्येक गोष्टीमध्ये संशय,भीती,आणि सावधगिरी ठेवण्यासाठी धडपडतात.मग ही ग कसली प्रगती...."

" तुमच्या पिढीचे काही सांगता येत नाही बघ.सगळे कौतुकास्पद होऊन सुद्धा अयोग्य भावनेच्या आहारी जाऊन,त्या " श्रद्धा" सारखे विनाकारण जीव गमावून बसतात.मग काय करावे आईवडिलांनी...?"

" अरे देवा,त्याच साठी तर हा सुनीता विल्यामाचा व्हिडिओ दाखवला ना आई मी तुला. बदला आता तरी विचार करण्याची पद्धत तुमची.मुलगी जन्माला आल्यापासून हीच एक रेकॉर्ड सतत तिच्या कानावर वाजवत असतात.मग मुलींनाही तेच संस्कार मिळतात की,आपण कितीही मोठे झालो,कितीही शिकलो तरी एक न एक दिवस आपल्याला लग्न करावेच लागणार आहे.संसार करावाच लागणार ,मुलेबाळे तर जन्माला घालावेच लागणार,आणि मनस्थिती आणि परिस्थिती तर स्वावलंबी झालेली असते ,हे सगळे करून सुद्धा आयुष्याचे गणित चुकले तर.....वैवाहिक आयुष्यात तडजोड करता आली नाही तर.....आयुष्यभर खंगत ,दुखः,यातना , उपभोगण्यापेक्षा संसाराच्या जाळ्यात न पडताच \" लिव्ह इन रिलेशनशिप, मध्ये राहून स्वतःच्या प्रेमाच्या , भावनांना, वाट देण्याचा असफल प्रयत्न करतात आणि फसतात...तारुण्य,प्रेम,प्रेमभंग,लग्न, संसार,सेक्स,अनैतिक शारीरिक संबंध, घटस्फोट,ह्या विषयावरचं जास्त लक्ष वेधले जाते घरा घरातून आणि समाजामधून हेच सारखं बिंबवले जातेय."


" पण हे होऊ नये म्हणूनच तर डोळ्यात तेल घालून सावधगिरीचा दिवा तेववत बसतोय ना आम्ही आईवडील काय चुकले आमचे?"

" मग आता तीच वेळ आली आहे आई, बदलून टाका तुमच्या संस्काराच्या व्याख्या...परंपरा...जात...धर्म...मुलगा.मुलगी भेदभाव...हे करू नका,ते करू नका,ही ठराविक नियमावली बदलून टाका....प्रगतीची विचारसरणी अमलात आणा.म्हणजे तू म्हणतेस तसे ह्या जगातही जास्तीत जास्त सुनीता विल्यम्स,आणि कल्पणा चावला सारख्या अनेक मुली जन्माला येतील ...आपल्या भारत देशा मध्येही \"एलन मस्क , सारखे सुपुत्र जन्म घेतील...सगळे काही तुमच्या आईवडिलांच्या हातात आहे आई...आणि आपल्या सामान्यांच्या जीवनात प्रेम,भावना,नातेसंबंध,ह्यांना महत्वाचे स्थान असेल तरी ,.समजा....
चुकले काही,नाही समजले तर म्हणा की,आम्ही आहोतच तुमच्या सोबत ,प्रत्येक परिस्थितीत....मग ती भावनिक असो, वा व्यावहारिक,सामजिक असो वा वैचारिक....!!!

" ओ.के.शुभा राणी.आमची लाडोबा चांगलीच हुशार अन् समजूतदार झाली आहेस हा बाळा.खरेच तुझे विचार ऐकून आता तर मलाच चुकल्यासारखे वाटत आहे.आज माझे डोळे उघडले माझ्याच लेकीने.
तसेच इतरही सगळ्या आईवडिलांचे उघडावेत.
आज पहिल्यांदा एका मुलीने उलट आईलाच खऱ्या जगाची ओळख करून दिली . असं जग जे भव्यदिव्य तर आहेच आणि विश्वास ,आदर आणि प्रगतीचे प्रवेशद्वारही आहे..."

आई सारखी बोलण्याची नक्कल करत शुभा म्हणाली..." येस माय गुड मॉम,असच शहण्यासारख बोलत जा."

आणि शुभाने आईचे लाडाने गालगुच्चे घेतले.आणि आईने शुभाला अतूट विश्वासाच्या उबदार मिठीत घेतले.
©® Sush.

🎭 Series Post

View all